“0” FIR म्हणजे काय? “0” FIR ची संकल्पना , तसेच FIR दाखल करण्याची प्रक्रिया..

कायदा

भारत हा जगातील असा देश आहे, जिथे सुसंस्कृत समाजाला सुरक्षा देण्यासाठी आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस आहेत. भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात पोलीस चौक्या आणि पोलीस ठाणे इ. देशभरात कुठेही कोणताही गुन्हा किंवा दुर्घटना घडली की, पोलिस अधिकारी सर्वप्रथम तिथे पोहोचतात आणि कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतात.

तसे, पोलिस कोणत्याही घटनेची आपोआप दखल घेतात आणि लगेच तेथे पोहोचतात. परंतु अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना माहिती देण्यासाठी एफआयआर दाखल करावा लागतो. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला FIR आणि Zero FIR बद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.

कारण तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की एफआयआर आणि झिरो एफआयआरमध्ये काय फरक आहे?
झिरो एफआयआर ही एक अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एखाद्या गुन्हेगारी घटनेचा बळी त्याच्यासोबत गुन्हा घडलेल्या पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदवत नाही.

अशा परिस्थितीत पीडित पुरुष किंवा महिला आपली तक्रार दुसऱ्या पोलीस ठाण्यात करतात, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला नाही. अशा परिस्थितीत स्टेशन प्रमुख पीडितेची किंवा पीडितेची तक्रार नोंदवतात आणि ती तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात पाठवली जाते.

सर्वप्रथम, आपल्या सर्वांना माहीत आहे की निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणामुळे सर्व भारत हळहळला होता, या बलात्कार मुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिह्न उपस्थित झाले होते. निर्भयाच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार जेव्हा, निर्भयाचे नातेवाईक तक्रार नोंदवण्यास पोलिस स्टेशनला गेले तेव्हा पोलीस म्हटले की, हे प्रकरण ज्या ठिकाणी घडल ते ठिकाण आमच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही.

◆”0″ FIR ची संकल्पना :-
दिल्लीमध्ये 16 डिंसेबर 2012 ला निर्भया बलात्कार व हत्याकांड घडले त्यामुळे ” 0″ FIR ची संकल्पना अस्तित्वात आली, न्यायमूर्ती वर्मा यांच्या समितीने काही शिफारशी केल्या त्या नुसार गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करत “0” FIR नियम लागू करण्यात आला.

◆FIR दाखल करण्याची प्रक्रिया :-
झिरो एफ.आय.आर नुसार ज्या ठिकाणी गुन्हा किंवा अपघात घडला आहे, तेथून जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक तपास अहवाल म्हणजे एफआयआर दाखल करण्यात येतो. त्यानंतर तो प्राथमिक तपास अहवाल ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतो त्या हद्दीत पाठवला जातो. त्यामुळे घटनेवर कारवाई करणे सोपे जाते.

◆”O” FIR म्हणजे काय ? :-
झिरो एफ आय आर हा सामान्य एफ आय आर प्रमाणे नोंदवला जातो. फरक इतकाच आहे आहे की, त्याला क्रमांक दिल्या जात नाही त्याला क्रमांक झिरो देण्यात येतो. त्यामुळे हा एफ आय आर झिरो एफ आय म्हणून ओळखला जातो.

◆तपास करण्यासाठी मॅजिस्ट्रेटच्या परवानगीची गरज नाही :-
झिरो एफ आय आर दाखल करण्यात येतो त्यावेळेस स्टेशन प्रभारी यांना मॅजिस्ट्रेटच्या परवानगीची गरज नसते. बलात्कार हत्या अशा प्रकरणात पोलिस स्वतः एफ आय आर नोंदवू शकतात व तपासायला सुरुवात करू शकतात. तसेच याचबरोबर, जेव्हा तक्रार करती महिला असेल तर एखादी महिला पोलीस तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे.

तक्रार ही पोलिसद्वारे लिहिली जावी तक्रार पूर्णपणे लिहिल्यानंतर ती वाचण्याचा अधिकार तक्रारकर्ताला केला आहे. तक्रारीमध्ये नाव पत्ता अशा माहितीशिवाय घटना कधी, केव्हा, कशी घडली हे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली तक्रारदाराची सही असणे आवश्यक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2013 मध्ये आसाराम बापू प्रकरणांमध्ये झिरो एफआयआर दाखल करूनच त्याला अटक करण्यात आले होते.