1 जानेवारी 2022 पासून या नियमांमध्ये बदल, नवीन वर्षापासून आपल्या खिशावर काय परिणाम होईल, जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

1 जानेवारी 2022 पासून नियमांमध्ये बदल : नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होणार आहे. पुढील महिन्यात जे नियम बदलणार आहेत. त्यापैकी एलपीजी सिलिंडर, बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किंमतीशी संबंधित नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्‍ही तुम्‍हाला या नियमांबद्दल (Changes from 1 January 2022) जे तुमच्यावर खोलवर परिणाम करू शकतात.

डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलतील: भारतीय रिझर्व्ह बँक RBI च्या नवीन गाइडलाइन्सच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२२ पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या किंवा झोमॅटो सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केल्यास ग्राहकांना २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची डिटेल्स टाकावी लागणार आहे. जर ग्राहकांना वारंवार डिटेल्स टाकायची नसेल तसेच यापासून दूर राहायचे असेल तर आपल्या कार्डला टोकोनाइज करण्यासाठी प्लॅटफॉर्मला मंजुरी द्यावी लागणार आहे.

मार्च २०२० मध्ये आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या माहितीनुसार, हे पाऊल सिक्योरिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांच्या कार्डची डिटेल्सला व्यापाऱ्यांकडून सेव्ह करण्यापासून रोखले जात होते. परंतु, यावर्षी सप्टेंबर महिन्यात रेग्युलेटरी बॉडीने सिक्योरिटी आणि सेफ्टीत सुधारणा करण्यासाठी कार्ड टोकनोयझेशन ग्राहक मंजुरी सोबत असेल.

यासाठी अतिरिक्त फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशनची गरज पडणार आहे. टोकनायजेशन कार्ड डिटेल्सला एक यूनिक अल्गोरिदम जनरेटेड कोड किंवा टोकन सोबत रिप्लेस करण्यास मदत करते. यावरून कार्ड्सच्या डिटेल्सला एक्सपोज शिवाय ऑनलाइन शॉपिंग होते.

काय बदल होणार : ग्राहक १ जानेवारी २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची डिटेल्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सेव्ह करू शकणार नाहीत. ग्राहकांना प्रत्येक वेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना कार्ड डिटेल्स टाकावे लागणार आहे. परंतु, ग्राहकांना वारंवार नंबर टाकण्यापासून दूर राहायचे असेल तर ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या कार्डला टोकन करण्यासाठी मंजुरी देता येईल.

ग्राहकांना मंजुरी मिळाल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्ड नेटवर्कला आपल्या गजरेनुसार अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन सोबत डिटेल्स एन्क्रिप्ट करण्यासाठी म्हटले जाईल. एकदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एन्क्रिप्टेड डिटेल्स मिळते. यानंतर ग्राहक आगामी ट्रान्झॅक्शनसाठी कार्डला सेव्ह करू शकता.

लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फक्त मास्टरकार्ड आणि विसा प्रोव्हाइड कार्ड्सला टोकन करू शकतो. त्यामुळे अशी शक्यता आहे की, अन्य फायनान्शियल सर्विसेजच्या कार्ड्सला लवकरच टोकन केले जाऊ शकते. आरबीआयच्या नवीन गाइडलाइनचे पालन क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्हीसाठी असणार आहे.

नवीन गाइडलाइन्स इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनवर लागू होणार नाहीत. फक्त डोमेस्टिक कार्ड आणि ट्रान्झॅक्शन आरबीआयच्या नवीन गाइडलाइन्समध्ये येतील. ग्राहकांना कार्ड टोकनाइजेशनसाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना सहज ओळखता यावे यासाठी टोकेनाइज्ड कार्डचे अखेरचे ४ डिजिट दिसेल.

ATM मधून पैसे काढणे महागणार आहे : नवीन वर्षात ATM मधून पैसे काढणेही महाग होणार आहे. RBI ने एटीएमबाबतही नवे नियम केले आहेत. याअंतर्गत ग्राहकांना आता एका मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँका त्यांच्या एटीएम शुल्कात 5% वाढ करणार आहेत. आता एटीएम मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला 21 रुपये शुल्क भरावे लागेल. यासोबतच ग्राहकांना स्वतंत्रपणे जीएसटीही भरावा लागणार आहे.

पोस्ट ऑफिसशी संबंधित हे नियम बदलणार आहेत : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आपल्या ग्राहकांसाठी नियम बदलले आहेत. मर्यादा संपल्यानंतर बँक आता 1 जानेवारीपासून रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी खातेदारांकडून शुल्क आकारेल. म्हणजेच आता 10 हजार रुपये काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागणार आहे.

Google च्या अनेक ऍप्स साठी नियम बदलतील : पुढील महिन्यापासून गुगलचे अनेक नियम बदलले जात आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. हा नवीन नियम सर्व Google सेवा जसे की Google Ads, YouTube, Google Play Store आणि इतर सशुल्क सेवांवर लागू होईल. तुम्ही पुढील महिन्यापासून RuPay, American Express किंवा Diners कार्ड वापरत असल्यास, तुमचे कार्ड तपशील Google द्वारे सेव्ह केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, 1 जानेवारी 2022 पासून, तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल.

एलपीजी सिलेंडरच्या किमती : एलपीजी सिलिंडरच्या किमतीही दर महिन्याला बदलतात. पुढील महिन्यासाठीही तेल कंपन्या गॅस सिलिंडरची किंमत ठरवणार आहेत. अशा परिस्थितीत यावेळी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होते की नाही हे पाहावे लागेल.

आता बँक लॉकरची जबाबदारी ग्राहकांची नाही : सगळ्यात सकारात्मक आणि मोठा बदल १ जानेवारीपासून लागू हेणार आहे. आतापर्यंत बँक लॉकरमध्ये सामान ठेवण्याची जबाबदारी ही ग्राहकांची होती. मात्र,असे होणार नसून, फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार,RBI लॉकरसंबंधिन नवे नियम जारी केले आहे.आता कोणत्याही बँकेमध्ये आग,चोरी,डाका किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे बँक ग्राहकांच्या लॉकरचे सामान गायब झाले तर, बँकेला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. मात्र ग्राहकांच्याच बेपर्वाईने लॉकरमधील सामानाचे नुकसान झाले तर, बँक कोणतीही जबाबदारी घेणार नाही.

स्विगी झोमॅटोवरुन जेवण मागवणेसुद्धा महागणार : हल्ली सर्वचजण किंवा खवय्ये नेहमीच वेगवेगळ्या हॉटेलमधील पदार्थांची चव चाखण्यासाठी तसेच थोडं चेंज म्हणून ऑनलाईन फूड डिलीवरी करतच असतात. मात्र अ‍ॅपवरुन फूड ऑर्डर करण्यासाठी केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी या दोन फूड डिलीवरी अ‍ॅपवर ५ टक्के टॅक्स लावला आहे.

हा नवा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे.केंद्रिय वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार,अ‍ॅप कंपन्यांना रेस्टोरंटप्रमाणेच ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा फायदा नाही मिळणार.अनेक दिवसांपासून फूड डिलीवरी अ‍ॅपच्या सेवांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी होत होती.ज्याला १७ संप्टेंबरच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या नव्या व्यवस्थेला देशभरात १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येत आहे.

ऑनलाईन ऑटो राईडवरही जीएसटी भरावा लागणार : स्टार्टअपद्वारे पुरवल्या जाणार्‍या परिवहन सेवेवरही 5% GST लागू होईल. जर ऑटोरिक्षा चालक ऑफलाईन पद्धतीने सेवा देत असेल तर जीएसटी लागू होणार नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.