१ सप्टेंबर पासून हे ‘आठ’ नियम बदलणार ।। सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

Uncategorized

सप्टेंबर महिन्यांपासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जन जीवनावर होणार आहे. एपीफ पासून ते चेक क्लिअरिंग पर्यन्तचे सगळे नियम आणि बचत खात्यावरील व्याजपासून सिलिंडर चे सगळे दर, कार ड्रायविंग, गूगल, अमेझॉन सारख्या सेवांपर्यन्तच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. 1 सप्टेंबर पासून काय काय बदल होणार ते पाहूया.

1. युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अकाऊंट मध्ये पैसे क्रेडिट होणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने म्हणजे ईपीएफओने ईपीएफ खातेधारकांना १ सप्टेंबर २०२१पासून आधार नंबर युएनएन नंबरशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.

2. चेक क्लीअरन्स : रिझर्व्ह बँकेने चेक क्लीअरन्स संदर्भात एक नवा नियम केला आहे. जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यास सुरुवात केलीय.

बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. विशेष म्हणजे RBI ने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी लागू करू शकते.

धनादेश देण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबद्दल माहिती द्यावी लागेल अन्यथा तुमचा चेक नाकारला जाईल. या नियमामुळे ज्येष्ठ नागरिक जे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत, त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. ऍक्सिस बँक पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करणार आहे.

3. पीएनबीच्या सेव्हिंग अकाऊंट वरील व्याज घटणार आहे : पीएनबी बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक 3 टाक्यांवरुन घालवून 2.90 टक्के एवढा करण्यात आला आहे.

4. घरगुती गॅस सिलेंडर चा दर : सप्टेंबरमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात बदल होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता LPG चे दर वाढू शकतात. जुलै महिन्यापासून सातत्याने घरगुती सिलेंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो. यापूर्वी 18 ऑगस्टला सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली होती. तर जुलै महिन्यात एलपीजीचा भाव 25.50 रुपयांनी वाढला होता.

5. कार इन्श्युरन्सच्या नियमात बदल: मद्रास हायकोर्टाने एक निर्णय जाहीर केला आहे की १ सप्टेंबरपासून कोणत्याही नवीन वाहनाचा विमा हा त्याचा बंपर टू बंपर विमा असला पाहिजे. हा इन्श्युरन्स ५ वर्षांच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, प्रवासी आणि वाहन मालक यांना कव्हर देणाऱ्या विम्या अतिरिक्त विमा असणार आहे. बंपर-टू-बंपर इन्श्युरन्स वाहनाच्या त्या भागालादेखील कव्हर देतो ज्याचा समावेश सर्वसाधारणपणे विमा कंपन्या आपल्या विम्यात करत नाहीत.

6. ओटीटी अँप सबस्क्रिपशन महागणार आहे : १ सप्टेंबरपासून भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन महाग होणार आहे. युझर्सला या सब्स्क्रिप्शनच्या बेस प्लॅनसाठी ३९९ रुपयांऐवजी ४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ युझर्सला १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागती तर ८९९ रुपयांमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये डिस्नी+हॉटस्टार अँप सुरू करता येईल. तसेच या सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल.

7. डिझेल आणि पेट्रोल च्या किमती वाढल्यामुळे अमेझॉन वरील शॉपिंग महागणार आहे: १ सप्टेंबरपासून अमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे. कंपनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानें लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. अशा परिस्थितीत ५०० ग्रॅमच्या पॅकेजसाठी ५८ रुपये द्यावे लागतील. रीजनल कॉस्ट ३६.५० रुपये असेल.

8. बनावट अँड्रॉइड अँप सुद्धा 1 सप्टेंबर पासून बंद होणार आहे: गुगलचे नवे धोरण १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत चुकीच्या आणि बनावट कंटेंटला प्रमोट करणाऱ्या अँपवर १ सप्टेंबरपासून निर्बंध लागू होती. गुगलने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, अँप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापर्यंत वापरण्यात न आलेल्या अपना ब्लॉक करण्यात येईल. गुगलकडून गुगल प्ले स्टोअर्सच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर बनवण्यात येत आहे.