१०-१२ वीचे ओरिजिनल मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे?।। डिजिलॉकर चा वापर कसा करायचा जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला गूगल वरती यायचे आहे आणि गूगल वरती आल्यानंतर टाइप करायचे आहे डी जी लॉकर. डी जी लॉकर सर्च करायचे आहे. गूगल वरती डी जी लॉकर सर्च केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पहिली वेब साईट तुम्हाला दाखवेल डी जी लॉकर. डी जी लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब साईट वरती तुम्हाला यायचे आहे.

तर इथे आल्यानंतर गेट स्टार्टटेड या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. इथे गेट स्टार्टटेड या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशा प्रकारचा इंटर्फेस तुम्हाला दिसेल ज्यामधे तुम्हाला तुमचे अकाऊंट क्रिएट करायचे आहे. तर आपण क्लिक करूयात.

क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अकाऊंट क्रिएट करावे लागेल त्यासाठी आधार कार्ड वरती जे फुल नेम आहे तुमचं पूर्ण नाव आधार कार्ड वरच आहे तसे तुम्हाला तिथ तुम्हाला टाकायचे आहे आणि आधार कार्ड वरच नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकायची आहे.

जन्म तारीख टाकल्यानंतर तुमचं मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर 6 डीजिट पिनकोड तयार करायचा आहे तुम्हाला. कोणता ही पिन तुम्ही 6 डीजिट टाकायचा आहे.

ईमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. इथे तुमचं अकाऊंट क्रिएट होणार आहे आणि अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉगीन करायचे आहे. त्यासाठी ऑप्शन खाली आहे साईन इन. साईन इन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता.

आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर इथ टाकल्यानंतर तुम्हाला 6 डीजिट सेक्युरिटी पिन टाकावा लागेल. तर आपण आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकला त्यानंतर 6 डीजिट सेक्युरिटी पिन जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. 6 डीजिट सेक्युरिटी पिन टाकल्यानंतर साईन इन करायचं. मोबाईल वरती तुम्हाला ओ टी पी येईल जो मोबाईल नंबर तुम्ही इथे दिलेला होता.

त्या मोबाईल नंबर वरती ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी आपण इथे टाकून घेऊयात आणि सबमिट करूयात. आता आपण प्रॉपरली इथे लॉगीन झालेलो आहे. प्रॉपर लॉगीन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल ज्यामधे संपूर्ण सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील.

तर आता हे लोडींग होतंय. लोडींग झाल्यानंतर इथ तुम्हाला भरपूर सर्व्हिसेस दिसतील. यामधे गेट इश्यूड डॉक्युमेंटस् या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जो पांढऱ्या बॉक्स मधे दिलेला आहे गेट इश्यू डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथ भरपूर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस इथे तुम्हाला दिसतील ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत.

त्यानंतर तुम्हाला खाली यायच आहे आणि एज्युकेशन या ऑप्शन मधे महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा तिसरा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता या तिसऱ्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील.

पहिला ऑप्शन आहे दहावीचं मार्कशीट दुसरा ऑप्शन आहे दहावीचं बोर्ड सरटिफिकेट, तिसरा ऑप्शन आहे बारावीच मार्कशीट आणि चौथा ऑप्शन आहे बारावीच बोर्ड सरटिफिकेट. तर आपल्याला जे हवं आहे ते तुम्ही काढू शकता. तर त्यासाठी आता आपण दहावीचं मार्कशीट तुम्हाला काढून दाखवतो. पहिला ऑप्शन जो आहे तो दहावीचं मार्कशीट या ऑप्शन वरती आता मी क्लिक करतो.

दहावीचं मार्कशीट काढताना लक्षात ठेवा काही गोष्टी तुम्हाला तिथं द्याव्या लागणार आहे. तर इथ पाहू शकता तुमचं नाव इथ ऑटोमॅटिकली आले आहे. आता तुम्हाला वर्ष द्यायचं आहे, इयर. इयर मधे तुम्हाला काय टाकायचं आहे जेव्हा तुम्ही पास झाला होता दहावी. दहावीची परीक्षा पास झालेल्याच इयर तुम्हाला इथ टाकायचं आहे.

इथ वर्ष टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. या गोष्टी तुम्हाला तुमचं दहावीचं बारावीच रीसिट असेल त्या रीसीट वरती तुम्हाला इथ सीट नंबर सुद्धा मिळेल किंवा बोर्ड सरटिफिकेट मार्कशीट वरती सुद्धा भेटेल. तर ही माहिती नीट व्यवस्थित टाकायची आहे त्यानंतर इथ लक्ष द्या एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे एक्झाम सेशन.

एक्झाम सेशन मधे टाकताना मार्च मधे पास झाला असाल तर एम ए आर टाकायचा फक्त, जर तुम्ही ऑक्टोंबर मधे पास झाला असाल तर ओ सी टी टाकायचा आहे, जर तुम्ही फेब्रुवारी मधे पास झाला असाल तरी एम ए आर च टाकायचा आहे. तर आपण एम ए आर टाकलेला आहे म्हणजेच मार्च म्हणजे एम ए आर टाकायचं त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला ५०० ६०० किंवा ७०० पैकी पडले ते मार्क्स तुम्हाला तिथं टाकायचे त्यानंतर तुम्हाला गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे

गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर आपले डॉक्युमेंट् जे आहे ते रेडी झालेलं आहे असा तुम्हाला हिरव्या रंगामधे एक मेसेज खाली दाखवेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा वरती यायच आहे आणि वरती आल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतील.

डाव्या साइड ला जे तीन डॉट्स ऑप्शन आहे त्याचावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचं इथे इश्यू डॉक्युमेंट्स मधे जे डॉक्युमेंट् आहे ते रेडी झालेलं आहे. पाहू शकता क्लास एक्स मार्कशीट पी डी एफ चा ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथ. एक पी डी एफ चा ऑप्शन आहे. पी डी एफ या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमची पी डी एफ आहे जी तुम्हाला डाऊनलोड झालेली दिसेल.

ही पी डी एफ डाऊलोड झालेली तुम्ही सेव्ह करू शकता. अशाच प्रकारे तुमचं बोर्डाच पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच बोर्डाच इथ सरटिफिकेट तुम्ही काढू शकता. तर सेम प्रोसिजर मधे तुम्हाला सेम करायचं आहे. गेट इश्यू डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती जायचं आहे. इथ गेल्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला सांगितला होता मी दुसरा ऑप्शन जो आहे त्यावरती जायचं आहे.

तर इथ पाहू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड दुसरा ऑप्शन जो आहे तो दहावीचं पासींग सरटिफिकेट म्हणजेच त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो. इयर इथ टाकायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे, एक्झाम सेशन मार्च ऑक्टबर जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स जे असतील ते टोटल मार्क्स टाकायचे आहेत आणि गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

डॉक्युमेंट्स तयार झालेत सेम आपण सांगितल्या प्रमाणे पुन्हा तिथं जायचं आहे, पाहू शकता क्लास एक्स पासींग सरटिफिकेट म्हणजेच दहावीचं इथ बोर्ड सर्टिफिकेट तयार झालं. आता आपल्याला पुन्हा बारावीच जर इथ काढायचं असेल तर सेम प्रोसीजर आहे. सेम तुम्हाला खाली जायचं तिसरा ऑप्शन आहे बारावीच मार्कशीट तुम्हाला सेम इथ जेव्हा बारावी पास झाला त्याच इयर, सीट नंबर एक्झाम सेशन मार्च ऑक्टबर असेल तो टाकायचा आहे.

त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथ मार्क्स टाकायचे आहेत. मार्क्स टाकल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते टोटल मार्क्स त्यानंतर गेट डॉक्युमेंट्स ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसीजर तुम्हाला इथ दिसत असेल पी डी एफ वरती क्लिक करायचं आहे तुमचं बारावीच मार्कशीट तयार झालेलं आहे. सेम आता आपल्याला बारवीच बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच पासिंग सरटिफिकेट काढायचं असेल तर तुम्हाला पुन्हा dash बोर्ड वरती यायच आहे.

डॅश बोर्ड वरती आल्यानंतर इथ चौथा ऑप्शन त्यानंतर इथ सेम इयर, सीट नंबर एक्झाम पास कधी झाला त्याच इथ सेशन आणि ते सेशन टाकल्यानंतर टोटल मार्क्स किती पडलेत, टोटल मार्क्स जे असतील जे मार्क्स तुम्हाला पडले असतील ते मार्क्स तुम्हाला इथ टाकायचे आहेत आणि ही सगळी माहिती गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सेम इश्यूड मधे जायचं आहे इथे तुमचे चारही डॉक्युमेंट्स जे आहेत ते क्लिअर झालेले आहेत. पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाऊलोड करू शकता आणि बाकीचे डॉक्युमेंस् सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड हे तुम्ही ड्रायव्हिंग लायसेन्स ए टू झेड इथून काढू शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.