12 वी नंतर काय ? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालक या सर्वांना पडतोच. सर्वाचे मन इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याचे असते. बदलत्या काळानुसार निर्माण होत असलेल्या नवनवीन संधीचा फायदा जर का अपलयला घ्यायचा असेल तर अशाच काही संधी आपण आज पाहुयात. की ज्यातून आपण लाखो-करोडो रुपये कमवू शकता.
1. डिफेन्स सेक्टर : जर तुम्ही साहसी आहात, तर तुम्ही आर्मी, नेवी, एअरफोर्स, जावून देशाचं रक्षण करू शकता. 12वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, य कोर्स मध्ये भाग घेवू शकता. येथे स्पर्धा असते पण मेहनत केली तर य क्षेत्रात चांगले करिअर घडू शकते.
2.मीडिया करिअर : मिडियाचे 3 भाग पडतात. जर्नालिझम, फिल्म अँड टेलव्हिजन, ऍनिमेशन VFX हा सुद्धा एक पर्याय आहे. जर्नालिझम 12वी नंतर तुम्ही हे करीअर निवडू शकता. बॅचलर ऑफ मार्स मीडिया हा प्रवेश मराठी मध्ये सुधा उपलब्ध आहे याची माहिती तुम्ही काढा. किंवा बॅचलर ऑफ आर्ट हे करीअर तुम्ही निवडू शकता.
यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह असले पाहिजे. पुढे तुम्ही पत्रकार, टीव्ही पत्रकार, जर्नालिझम, लेखक, रिसर्चअर, आणि चॅनल प्रॉडयुसर असे अनेक करिअर निवडू शकता. आणि यात इंवेस्टमेंट देखील कमी असते. फिल्म अँड टेलव्हिजन हे सेक्टर ॲक्टर आणि ॲक्ट्रेस साठी आणि डायरेक्ट पुरतेच मर्यादित नसून यात अनेक बाबी आहेत.
तुम्ही हा कोर्स करून यातले बारकावे देखील शिकू शकता. ऍनिमेशन VFX काही वर्षांपासून हे करिअर खूप नावाजलेले करिअर आहे. सहसा हॉलिवूड, बॉलिवूड आणि ग्राफिक्स चित्रपटांमध्ये ऍनिमेशन VFX चा वापर केला जातो. बऱ्याच हॉलिवूड चित्रपटांचे बारकावे हा मुख्य सोर्स म्हणून यासाठी पहिला जातो. तुम्हाला माहित असेल काही वर्षांपूर्वी अवतार हा मराठी चित्रपट आला होता. ऍनिमेशन VFX ने जबरदस्त यात काम केलं होत भारतील कंपन्यांचा ऍनिमेशन VFX मध्ये जबरदस्त वाटा आहे. 12वीच्या कोणत्याही शाखेनंतर तुम्ही हा कोर्स करू शकता.
3.वेब डिझाईन अँड डेव्लपर : तुम्हाला स्वतः ला जर स्वतः ची वेब डिझाईन अँड डेव्लपर कंपनी सुरू करायची असेल तर तुम्ही 12वी सायन्स नंतर (bsc, bsc कॉम्प्युटर, किंवा bsc आयटी) हे कोर्स करू शकता. वेबसाईट ही आता प्रत्येक बिझनेसची गरज झालेली आहे. तेव्हा करिअरच्या दृष्टीने मोठा स्कॉप तुम्हाला यातून मिळू शकतो. तुम्ही मोठ्या कंपनीत काम करू शकता किंवा स्वतः चा बिझनेस ॲप सुरू करू शकता.
4. फॉरेन भाषा: तुम्ही जर भाषांचे चाहते असाल आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्यात इच्छुक असाल तर 12वी नंतर फॉरेन भाषेचा कोर्स देखील तुम्ही करू शकता. त्या कोर्स मध्ये वेगवेगळ्या लेबल्स असतात त्या पूर्ण करून तुम्ही सदर भाषेत पारंगत होवू शकता. यानंतर भारतीय दूतवासात सरकारी नोकरी किंवा स्वतः चे क्लासेस देखील तुम्ही सुरू करू शकता.
5. ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट: सदा सर्वकाळ चालणारा व्यवसाय म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट. 12 वी नंतर चांगल्या संस्थेतुन तुम्ही हा कोर्स करू शकता. यानंतर तुम्ही ट्रॅव्हल एजंट किंवा स्वतः ची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकता. यात मराठी उद्योजकांसमोर अनेक उदाहरणे आहेत, केसरी, व्हीना वर्ल्ड, यांसारख्या मराठी उद्योजकांच्या कंपन्या यक्षेत्रात मोठ नाव कमवत आहेत. हा कोर्स केलेवर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त भांडवल लागत नाही. फक्त योग्य रिसर्च आणि योग्य नेटवर्क मुळे तुम्ही या बिझनेस मध्ये उत्तम अर्करण करू शकता.
6. कॅबिन क्रू अँड एअर होस्टेस: बहुतेकांचे गैरसमज आहे की हा कोर्स फक्त मुलींनाच करता येतो पण अस नाहीये अनेक मुले देखील या व्यवसायात आहेत. 12वी सायन्स नंतर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्युट मधून कॅबिन क्रू अँड एअर होस्टेस चा कोर्स करू शकता. आणि तुम्ही त्यातून चांगले पैसे देखील कमवू शकता. या पूर्ण कोर्सच्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.