५ पुस्तके जी तुमचं आयुष्य बदलून टाकतील !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

यश मिळवून देणारी पाच पुस्तके: भगतसिंग द ग्रेट इंडियन फ्रीडम फायटर भगतसिंग त्यांच्या फाशी च्या दिवशी लेननची बायोग्राफी वाचत होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणातही ते पुस्तक वाचत होते. ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांनी म्हटले होते की ‘एखादा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याप्रमाणे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो’,

बाबासाहेबांची लायब्ररी सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी होती, ज्यामध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त पुस्तके होती. महात्मा गांधीजींनी जेलमध्ये असताना अनेक पुस्तके वाचली अशा महान लोकांचे कितीतरी उदाहरणे देता येतील. जे पुस्तके वाचत असत हे सर्व लीडर्स पुस्तकप्रेमी होते लक्षात ठेवा.

(Leaders are Readers) लीडर्स आर रीडर्स पुस्तकांइतका प्रामाणिक मित्र कोणीही नाही. पुस्तके आपले ज्ञान वाढवतात, आपली विचार करण्याची क्षमता वाढवतात त्यामुळे तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला असे पाच पुस्तक सांगणार आहे ज्यांना वाचल्यानंतर तुमचे आयुष्य बदलून जाईल.

पुस्तक नंबर.1 (Rich Dad Poor Dad) रिच डॅड पुअर डॅड : या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी. लेखक म्हणतात की त्यांचे दोन वडील होते त्यांचे एक वडील शिकलेले होते त्यांच्याकडे (PHD) पीएचडी होती पण ते आयुष्यभर गरीबच राहिले म्हणून लेखक त्यांना पुअर म्हणतात आणि लेखकांचे दुसरे वडील जास्त शिकलेले नव्हते पण खूप श्रीमंत होते म्हणून म्हणून लेखक त्यांना रिच म्हणतात.

आता प्रश्न हा आहे की एकाच व्यक्तीचे दोन वडिल कसे असू शकतात तर ऍक्च्युली जे गरीब वडील म्हणजे पुअर डॅड ते लेखकांचे वडील आहेत आणि रिच डॅड हे लेखकांच्या मित्राचे वडील आहेत. ज्यांना श्रीमंत बनायचे आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. पैशाने पैसा कसा कमावता येतो आणि श्रीमंत बनण्याची कला या पुस्तकातून शिकायला मिळेल. हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करायला शिकवेल आणि पैसा आणखी पैसे कमवण्यासाठी कसा वापरावा हे देखील तुम्ही यामध्ये शिकता.

पुस्तक नंबर.2 (The Power of Your Subconscious Mind) द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड : या पुस्तकाचे लेखक डॉ .जोसेफ मर्फी लेखकाने तुमच्याच असलेल्या शक्तीबद्दल म्हणजे सबकॉन्शस माईंडच्या शक्तीबद्दल सांगितले आहे. तुमच्या अवचेतन मनाची शक्ती एवढी अफाट असते, की तुम्ही विचार करू शकत नाही.

तुमच्या मध्ये असलेल्या या शक्तीचा वापर कसा करावा हे तुम्हाला शिकवणे आणि तुमच्यातील शक्तीचा परिचय करून देणे हे या पुस्तकाचे उद्देश आहे. (The law of attraction) द लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यानुसार ज्या बद्दल आपण विचार करतो तेच आपण आपल्या आयुष्यात (attract) अट्रैक्‍ट करतो.

हे पुस्तक वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा आरोग्य सुख आणि ज्या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात आणि हे सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्यातील सबकॉन्शस माईंड तुमची मदत करेल. हे पुस्तक तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुमच्यातील सबकॉन्शस माईंड चमत्कारिक शक्तीच्या मदतीने तुमचे ध्येय यश संपत्ती आरोग्य सर्व काही प्राप्त करू शकाल.

पुस्तक नंबर.3 (The Secrets) द सिक्रेट्स : हे पुस्तक Rhonda Byrne ह्या लेखिकेने लिहिलेले आहे.आधी द सीक्रेट नावाची फिल्म निघाली होती आणि नंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याच्या 30 मिल्लियन कॉपिज विकल्या गेल्या आणि हे पुस्तक 50 भाषा मध्ये ट्रान्सलेट केले गेले आहे. हे पुस्तक (The law of attraction) द लॉ ऑफ अट्रॅक्शन वर आधारित आहे.

द लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम. या पुस्तकांमधील द लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे आणि याचा वापर तुमच्या आयुष्यात कसा करावा. सुख, पैसा, आरोग्य, प्रेम आणि यश या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी कसा करावा हे शिकवले आहे. द लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार आपण जे विचार करतो. तेच तुमच्या आयुष्यात घडते.

तुमचे विचार येतात, म्हणजेच आपण आपल्या विचारांचे मदतीने जे पाहिजे ते म्हणू शकतो आणि जे हवे ते आकर्षण करू शकतो. भगवान बुद्धांनी सुद्धा हेच सांगितले होते. तुम्ही ते विचार करता तेच तुम्ही बनतात. ह्या पुस्तकात हा नियम डिटेल मध्ये शिकवला आहे. तुम्ही हे बुक वाचल्यानंतर प्रॅक्टिकली ट्राय करून बघून शकतो तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस कराल ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होईल.

पुस्तक नंबर. 4 (How to win friends and influence people) हाऊ टू विन फ्रेंडस अंड इन्फ्ल्यून्स पीपल : “मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा, या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी हे आहेत, जर तुम्हाला बेटर रिलेशनशिप पाहिजे असेल, लोकांना मॅनेज करायचे असेल आणि अशी इच्छा असेल की तुम्ही लोकांचे फेवरेट बनावे, तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक जबरदस्त माहितीने भरलेले आहे.

ह्या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही लोकांना आपले करू शकतात आणि लोकांच्या आवडीचे व्यक्ती बनू शकता, तुम्ही जर लोकांमध्ये इंट्रेस घ्याल तर फक्त दोन महिन्यात तुम्ही अधिक मित्र बनू शकतात आणि तुम्ही लोकांना तुमच्यात इंट्रेस घ्यायला लावाल, तर तेवढेच मित्र बनायला तुम्हाला दोन वर्षे लागतील, हे पुस्तक तुम्हाला लोकांचे मन जिंकायला शिकवेल, तुमचे कोणतेही काम लोकांकडून करून कसे घ्यावे यामध्ये शिकायला मिळेल.

पुस्तक नंबर 5: (The 7 Habits of Highly Effective People) द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल : अति प्रभावकारी सात लोकांच्या सवयी ‘हे पुस्तक लिहिले आहे स्टीफन कोव्ये यांनी. हायली इफेक्टिव्ह लोकांचे कॅरेक्टर चांगले असते अशा लोकांचे इतरांसोबत रिलेशनशिप चांगले असते, ते आपल्या फॅमीली सोबत, नातेवाईकांसोबत मित्रांसोबत, एकदम चांगले राहतात.

तर एक हायली इफेक्टिव व्यक्ती कसे बनावे हे तुम्हाला या पुस्तकातून शिकायला मिळेल. ज्यांना इफेक्टिव लोकांच्या 7 सवयी माहिती करून घ्यायचे आहेत आणि ज्यांना एक कॉमन लाईफ जगायची नाही, जीवनात काहीतरी मोठे करायचे आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.

त्यामध्ये 7 सवयी सांगितले आहे: 1.Be Proactive याचा अर्थ आहे सक्रिय होणे. 2. कोणत्याही गोष्टीचा शेवट लक्षात घेऊन सुरुवात करा. (Begin with the End in Mind). 3. सर्वात महत्त्वाची काम सर्वात आधी करा. (Put First Things First). 4. नेहमी जिंकण्याबद्दल विचार करा.(Think Win-Win).

5.आधी दुसऱ्यांना समजून घ्या आणि नंतर तुमचे म्हणणे त्यांना समजावा. (Seek First to Understand, Then to Be Understood). 6. समन्वय साधा (Synergize). 7. स्वतःला नेहमी तयार ठेवा. (Sharpen the Saw). मित्रांनो हे पाच बुक्स तुमचा आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता ठेवतात यांना नक्की वाचा. आणि आजचा लेख तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.