नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
१. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीच्या, पदाच्या आणि माणसांच्या मागे लागला आहात, हे प्रामाणिकपणे लिहून काढा. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. त्यांचे गुण अंगिकारायला सुरुवात करा.
२. तुम्हाला सुचणाऱ्या नवनवीन कल्पना किंवा तुमच्या कामाची पध्दत ही दुसऱ्याची कॉपी आहे का, हा प्रश्न स्वत:ला विचारा. दुसऱ्याची कॉपी करून यश मिळत नसते त्यासाठी तुम्हाला दिसणाऱ्या प्रश्नाला अडचणीला उत्तर कसे शोधता येईल हे बघा आणि त्या दृष्टीने कामाला लागा.
३. दुसऱ्याचे यश, पैसा, संपत्ती पाहून तुम्हाला मत्सर वाटतो का ? का तुम्ही त्यांच्या यशात आनंदाने सामील होता याचे प्रामाणिक उत्तर स्वतःला द्या. उत्तर जर मत्सर वाटतो असे असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये सुधार करण्याची गरज आहे असे समजा.
४. तुम्हाला जे काही अनुभव येत आहेत मग ते यशाचे असो किंवा अपयशाचे त्यांचा तुम्ही कोणता अर्थ लावता, यावर तुमचा आनंद अवलंबून आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या सोबत प्रत्येक घटनेला तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर तुमच्या आयुष्यातील आनंद आणि प्रगती अवलंबून असते.
५. आपण सगळेच जण अनेक प्रकारच्या मतांच्या माहितीच्या गोंधळात जगत आहोत अशावेळी आपल्याला आतून काय वाटतं? याचा शोध घेणं खूप कठीण होऊन जातं. आपल्याला आतून काय वाटतं याला प्राधान्य तुम्हाला द्यावं वाटतं का? असा स्वतःला प्रश्न विचारा.
६. प्रत्यक्ष कृतीला नेहमी महत्व द्या. एखादा विचार, एखादी संकल्पना स्वतः जगून बघा. प्रयोग करायला घाबरू नका. जमलं तर जमलं नाही तर नाही, त्याचं दडपण घेऊ नका पण प्रयोगाची जबाबदारी घ्यायला विसरू नका.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.