श्रीमंत होण्याचे 7 नियम, जे माहीत असल्याशिवाय आपली संपत्ति कधीही वाढणार नाही.

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

‘द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन’ म्हणजेच बॅबिलॉन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती या पुस्तकात सांगितले गेलेले श्रीमंत होण्याचे सात नियम आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या बचत करण्याच्या सवयी मध्ये नक्कीच सुधार कराल. चला तर मग जाणून घेऊया या कथेची पार्श्वभूमी.

प्राचीन काळात बॅबिलॉन नावाचे जगातील सर्वात श्रीमंत शहर होते. त्या शहरात अगदर नावाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती राहत होता. तो खूप दान करायचा आणि खुल्या हाताने खर्च करायचा. तरी दरवर्षी त्याची संपत्ती वाढतच राहिली पण त्यांचे बालपणीचे मित्र मात्र गरीबच असतात. त्याचे मित्र त्याला विचारतात एकेकाळी आपली परिस्थिती सारखीच होती, आपण सगळे गरीब होतो पण आज तू एवढा श्रीमंत कसा? यावर अगदर म्हणतो, तुम्ही श्रीमंत न होण्याचा कारण हे आहे की तुम्ही संपत्ती जमा करण्याचे नियमांना कधी जाणून घेतले नाही. मी हे नियम अल्गमिज याकडून शिकलो होतो, त्यामुळे मी श्रीमंत झालो.

आपण जीवन जगताना नेहमी इतरांना पैसे देत असतो, कधी किराणा दुकानदाराला, कधी टेलरला, कधी इतर कोणाला. आपल्याला अशा लोकांना पे करावी लागते जो आपल्या गरजा पूर्ण करतात, पण आपण स्वतःला कधी पे करीत नाही. त्यामुळेच आपण गरीब राहतो. अगदर पुढे म्हणतो मला अल्गमिजने सांगितलं होतं की आपल्या कामाचा एक भाग आपण स्वतःसाठी ठेवले पाहिजे जर आपण असे करायला लागलो तर लवकरच आपण श्रीमंतीच्या मार्गावर पुढे जाऊ. आपली कमाई कितीही कमी असो, पण आपल्याला आपल्या महिन्याच्या कमाई पैकी कमीत कमी दहा टक्के भाग तरी बचत करायला पाहिजे.

पहिले स्वतःला ‘पे’ करा आणि वाचलेल्या पैशाने आपली इतर खर्च चालवा आणि बचत केलेल्या पैशाची गुंतवणूक करा. गुंतवणूक करण्यापूर्वी ज्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राची चांगल्या प्रकारे स्टडी करा, ज्यामुळे तुमचा पैसा खूप पटींनी वाढत राहील. या नंतर अगदर ने श्रीमंत होण्याचे सात उपाय आपल्या मित्रांना सांगितले ते काय आहेत हे पाहूया..

१) आपल्या पॉकटला वाढवायला लागा : पहिला उपाय आपल्या पॉकेटला वाढवायला लगा म्हणजेच आपला बँक बॅलन्स वाढवत रहा. आपण पॉकेटमध्ये टाकलेल्या दहा नाण्यांपैकी पैकी नऊ नाणेच बाहेर काढा. म्हणजे तुम्ही तुमच्या 90% कमईवरच तुमचे सर्व खर्च चालवा. अश्या रीतीने लवकरच तुमचे पॉकेट वाढायला लागेल. या उपाय नुसार चालत राहाल तर तुमची पर्स टीआर वाढेलच स्प्बत तुम्हाला बचतीची सवय सुद्धा लागेल.

अगदर पुढे म्हणतो जर तुम्ही एका टोपलीत दररोज दहा अंडे ठेवले व नऊ अंडे बाहेर काढलेत तर काही दिवसांनी त्या टोपलीत खूप सारे अंडे जमा दिसतील. हाच नियम आपल्या पैशाच्या बचत केले गेले तर आपला पोकेट असाच भरला जाईल.

२) खर्च नियंत्रित करा : आवश्यक खर्च व आपल्या इच्छा यांच्या फरकाला समजून घ्या. तुमच्या कमाईने तुमची जेवढी इच्छा पूर्ण होऊ शकते त्यापेक्षा जास्त इच्छा तुमची आणि तुमच्या परिवाराची असते, त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींसाठी पैसा खर्च करायचा आहे त्या सर्व खर्चणा पहिले एका ठिकाणी लिहा, मग त्यातून आवश्यक गोष्टी निवडा. त्यातून त्या गोष्टींना निवडा ज्या गोष्टी तुमच्या 90 टक्के कमाईतून पूर्ण होऊ शकते. बाकी गोष्टींना सोडून द्या आणि त्याचा पश्चाताप करत बसू नका.

३) आपली संपत्ती कित्येक पटीने वाढवा : तिसरा उपाय आपल्या संपत्तीला किंवा आपल्या पैशाला कित्येक पटीने वाढवा. पॉकेट मध्ये असणारा पैसा हा चांगला वाटतो आणि कंजूष लोकांना तर जास्तच. परंतु हा आपल्या कमईला वाढवत नाही. आपल्या कमाईतून बचत करणे ही तर सुरुवात आहे, पण त्या बचतीच्या पैशाने जी कमाई होईल त्यापासून आपण श्रीमंत बनतो. संपत्ती बँकेत किंवा पॉकेटमध्ये असलेल्या पैशाने बनत नाही तर ती संपत्ती ही आपल्या पैशाच्या गुंतवणुकीतून होणार कमाईने वाढते. संपत्तीचा अर्थ अशी गोष्ट जी नेहमीच आपल्या पॉकेट मध्ये पैसे असते. प्रत्येक व्यक्तीची ही इच्छा असते की आपल्या पॉकेटमध्ये नेहमीच पैसा येत असावा, काम करू किंवा कुठे फिरायला जाऊ तरी पैसा येत असावा.

४) आपल्या भांडवलाची रक्षा करा : जर आपण आपल्या भांडवलाची चांगल्या प्रकारे रक्षा केली नाही तर आपली संपत्ती आपल्या हातून निघून जाईल. गुंतवणुकीचा पहिला नियम हा आहे की आपले मूळ धन किंवा भांडवलाची सुरक्षा. तेंव्हा जास्त रिटर्न साठी जोखीम घेणे मूर्खता ठरेल. जेव्हा आपले मूळ धन गमवायची वेळ येत असेल जेआर तुम्ही अशी जोखीम घेत असाल तर कदाचित तुम्ही आपला मूळ धन सुद्धा गमवाल. आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरीने चांगली चौकशी करावी पहिले निश्चिंत व्हा की आपली संपत्ती पूर्णपणे सुरक्षित आहे, मगच गुंतवणूक करा. लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या आशेने चुकीच्या मार्गाने जाऊ नका . कोणत्याही व्यक्तीला कर्ज किंवा उधार देण्यापूर्वी हे जाणून घ्या की तो व्यक्ती उधारीची रक्कम परत करण्यास सक्षम आहे किंवा नाही.

५) आपल्या घराला लाभदायक गुंतवणूक बनवा :  कोणत्या व्यक्तीचा परिवार तोपर्यंत आपल्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही जोपर्यंत की त्याच्या घरी त्याच्या मुलांना स्वच्छ ठिकाणी खेळण्यासाठी जागा राहत नाही, तसेच त्याची पत्नी तिथे सुंदर फुले उगवू शकत नाही. त्यासाठी आपले स्वतःचे घर असायला हवे. आपल्या घराचे आपण मालक असल्याने आपल्याला गर्व तर होतोच आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. तसेच आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये जास्त मेहनत घेऊ लागतो. त्यासाठी प्रत्येकाकडे स्वतःच घर असायला पाहिजे, त्याचा परिवार चांगल्या पद्धतीने राहील हे गरजेचे असते.

६) भविष्यात होणारी कमाई निश्चित करा : प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे बालपणापासून म्हातारपणाकडे जात असते आणि हाच जीवनाचा मार्ग आहे.  आपल्याला भविष्यासाठी योग्य ती व्यवस्था करून ठेवावी लागते. तसेच या गोष्टीची व्यवस्था करायला पाहिजे जरी आपण मरण पावलो तरी आपल्यानंतर आपल्या परिवाराला आराम तसेच आर्थिक मदत होत राहील . ज्याला वाटते की त्याला श्रीमंत व्हायचे तर त्यांनी संपत्ती गोळा करण्याचे नियम शिकावे व आपल्या पैशाची नियमित गुंतवणूक करत राहावी. ज्यामुळे त्याची संपत्ती किंवा पैसा त्याला गरजेच्या वेळी कामी येईल.

७) आपल्या कामाची क्षमता वाढवा :  जर कोणत्याही व्यक्तीला लवकरात लवकर व खूप श्रीमंत व्हायचे असेल तर ते कठीण आहे पण योग्य उपाय करून प्रयत्न केले तर श्रीमंत होणे खूप सोपे होईल. समजा एखाद्या व्यक्तीची पाचशे रुपये कमी व्हायची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल मग तो 5000 कमावण्याचा प्रयत्न करेल, नंतर 50000 असंच करत करत तो श्रीमंत होऊ शकतो. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या कामात एक्सपर्ट बनतो तेव्हा तो पैसे कमवण्याच्या क्षमतेत वाढ करतो. आपल्याकडे जेवढे नॉलेज असेल तेवढाच आपण पैसा कमवू शकतो .आपल्याला जास्त पैसे कमविण्यासाठी जास्त काम करावे लागेल किंवा मार्ग बनवावे लागेल.  

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा