अ पा क अर्थात अज्ञान पालनकर्ता हा शब्द आपण सातबारा किंवा इतर महसुली अभिलेखांवर आपण अनेक वेळा बघितलेला असेल. काही वेळेला हा शब्द आपल्याला विविध करारामध्ये सुद्धा बघण्यात किंवा वाचण्यात आला असेल. आता अ पा क म्हणजे अज्ञान पालनकर्ता म्हणजे नक्की काय?
तर आपल्याकडे जो गार्डियन्स अँड वॉर्ड ॲक्ट आहे त्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती कायद्याने अज्ञान असते म्हणजे तिचं वय 18 वर्षापेक्षा कमी असतं तेव्हा त्या व्यक्ती करता नैसर्गिक किंवा कायदेशीर अज्ञान पालनकर्ता किंवा गार्डियन हा असू शकतो. आता घरातील मोठे नातेवाईक म्हणजे आई-वडील हे नैसर्गिक गार्डियन असतात.
तर जेव्हा एखाद्या अज्ञान व्यक्ती करता सक्षम दिवाणी न्यायालय एखाद्या व्यक्तीची गार्डियन म्हणून नेमणूक करते त्याला कायदेशीर गार्डियन असे म्हणतात. आता अज्ञान पालनकर्ता आणि त्याचे त्या व्यक्तीच्या मालमत्तेचे संदर्भातले अधिकार हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
आपण अनेकदा अज्ञान व्यक्ती तर्फे अज्ञान पालनकर्ता अर्थात गार्डियन हा विविध स्वरूपाचे करार करत असल्याचे अनेकदा बघितले असेल. मात्र गार्डीयन अँड वॉर्ड ऍक्ट यामधील कायदेशीर तरतुदीनुसार कोणताही गार्डियन किंवा अज्ञान पालनकर्ता हा कोणत्याही अज्ञान व्यक्तीची जी मालमत्ता आहे ती गहाण ठेवू शकत नाही, विक्री करू शकत नाही,
एवढेच कशाला पाच वर्षा पेक्षा अधिक कालापर्यंत ती मालमत्ता लीज वर द्यायचा अधिकारीसुद्धा या गर्डियनला नसतो. असा कोणताही व्यवहार किंवा हस्तांतरण किंवा लिज जर करायचा असेल तर त्याच्या करता सक्षम दिवाणी न्यायालयाची पूर्वपरवानगी असणे हे अत्यंत आवश्यक आहे.
आता समजा एखाद्या आज्ञानपालन कर्त्याने म्हणजे गर्डियनने सक्षम न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता अज्ञात व्यक्तीच्या मालकीची जी मालमत्ता आहे त्याचा व्यवहार केला किंवा हस्तांतरण केलं तर काय होऊ शकत? सर्वप्रथम एक लक्षात घेतले पाहिजे
की गर्डियन अँड वॉर्ड ऍक्ट या मधील कायदेशीर तरतुदीनुसार असा कोणताही व्यवहार जो न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आलेला आहे तो गैर आणि बेकायदेशीर आहे. तसंच ह्याच कायद्यातील पुढच्या तरतुदीनुसार ज्या अज्ञात व्यक्तीच्या मालमत्ते संदर्भात असा व्यवहार झालेला आहे ती व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर अशा व्यवहाराला निश्चितपणे हरकत घेऊ शकते
किंवा असा जो व्यवहार किंवा करार झालेला आहे तो रद्द करून मिळण्याकरता न्यायालयामधे दावा सुद्धा दाखल करू शकते. थोडक्यात काय तर जेव्हा कोणत्याही मालमत्तेवर किंवा कोणत्याही करारामध्ये अज्ञान पालनकर्ता असेल तेव्हा आपण सावधानता बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे.
जर आपण खरेदी करत असलेली जमीन किंवा करत असलेला करार हा एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या वतीने जर एखादा अज्ञान पालनकर्ता म्हणजे गर्डियन जर करणार असेल तर तसा व्यवहार करण्याकरता किंवा तशी मालमत्तेच हस्तांतरण करण्याकरता त्या व्यक्तीने सक्षम न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतलेली आहे किंवा नाही याची चौकशी करणं
हे आपल्या खरेदी करता किंवा आपल्या कराराच्या वैधतेकरता अत्यंत आवश्यक आहे याची खूणगाठ आपण नेहमी बांधून ठेवावी. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण अज्ञान व्यक्तीच्या मालमत्ते संदर्भात व्यवहार करू तेव्हा गर्डियन अँड वॉर्ड ऍक्ट आणि इतर कायदेशीर तरतुदींच पूर्ण पालन झालेला आहे ना याची खात्री करून घ्यावी.
तसे जर पालन करण्यात आलं असेल उल्लंघन झालं असेल तर भविष्यात आपण खरेदी केलेली जमीन किंवा आपण केलेला करार किंवा व्यवहार किंवा हस्तांतरण कायदेशीर अडचणी मधे सापडू शकत हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल
तर जिथे जिथे अज्ञान पालनकर्ता हा करार किंवा व्यवहार किंवा हस्तांतरण करणार असेल तिथे योग्य त्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता झालेली आहे याची खात्री करून घ्यावी आणि जोवर अशी पूर्तता होत नाही तोवर शक्य झालं तर असा करार न करणं हे आपल्या दीर्घकालीन फायद्याचे आहे हे आपण कायम लक्षात ठेवावे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.