एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याबाबत माहिती आहे का? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट ही कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. सरकारी ओळखपत्रं म्हणून ही कागदपत्रं महत्त्वाची आहेतच, तसंच कोणतीही महत्त्वाची कामं या कागदपत्रांशिवाय होऊ शकत नाहीत. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही ही कागदपत्र लागतात.

पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याबाबत माहिती आहे का? ही कागदपत्रं आपोआप रद्द होतात की कुटुंबातल्या व्यक्तींना ती रद्द करावी लागतात? असे काही प्रश्न अनेकांच्या मनात येत असतील. जी कागदपत्रं मृत्यूनंतर रद्द करण्याची तरतूद आहे, तिथे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा पुरावा म्हणून डेथ सर्टिफिकेट सादर करावं लागतं.

पॅन कार्ड : इनकम टॅक्स रिटर्न भरत असाल तर पॅन नंबर असणं महत्त्वाचं असत. पॅन नंबर हा डी मॅट, बँक अकाउंटसह लिंक असतो. त्यामुळे मृत व्यक्तीचं पॅन कार्ड डीएक्टीव्हेट करणं महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीचं पॅन कार्ड चूकुन इतर व्यक्तीच्या हाती लागला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आव्हानात्मक प्रसंग उद्भवण्याआधी पॅन कार्ड डीएक्टीव्हेट करणं गरजेचं ठरतं.

इन्कमटॅक्स भरण्यासह इतर आर्थिक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. पॅनकार्ड अनेक अकाउंटशी जोडलेलं असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींने आयकर विभागाशी संपर्क साधून पॅनकार्ड परत करणं आवश्यक असतं. मात्र ते सरेंडर करण्यापूर्वी मृत व्यक्तीची त्या पॅनकार्डशी जोडलेली सर्व बँक खाती बंद करावीत. अन्यथा पॅन रद्द केल्यानंतर ती खाती बंद करण्यात समस्या येऊ शकतात.

आधार कार्ड : आधार क्रमांक ओळख पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. एलपीजी अनुदानाचा लाभ घेताना, सरकारकडून शिष्यवृत्तीचा लाभ घेताना, ईपीएफ खाती असल्यास इत्यादी विविध ठिकाणी आधार क्रमांक उद्धृत करणे किंवा त्याची प्रत देणे बंधनकारक आहे. आधार एक वेगळा ओळख क्रमांक आहे.

विशेष म्हणजे निधनानंतरही हा नंबर कायम असतो. कारण आधार क्रमांक हे आपोआप कुठे अपडेट होत नाही. विशेष म्हणजे, युआयडीएआय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अद्याप मृत्यू नोंदणीशी जोडलेले नाही. मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीच व्यवस्था नाही.

त्यामुळे मृत व्यक्तीचं आधार कार्ड सांभाळून ठेवणं ही कुटुंबियांची जबाबदारी आहे, जेणेकरुन त्याचा गरैवापर होणार नाही. संबंधित मृत व्यक्ती मृत्यूआधी जर आधार कार्डाद्वारे कोणतीही योजना किंवा सबसिडीचं लाभ घेत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यायला हवी.

त्यानंतर मृत व्यक्तीचं नाव त्या योजनेतून रद्दबातलं केल जाईल. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड लॉक केलं जाऊ शकतं. M-Aadhar या अ‍ॅप किंवा UIDAI च्या वेबसाईटद्वारे मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक करता येऊ शकतं. यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर होणार नाही.

मतदार ओळखपत्र / वोटर आयडी कार्ड : मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी कार्ड हे मतदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेलं ओळखपत्र आहे. मृत्यूनंतर मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द करणं महत्वाचं असतं. अन्यथा मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाव रद्द करण्यासाठी स्थानिक मतदान कार्यालयात फॉर्म 7 भरावा लागतो. त्यानंतर वोटिंग कार्ड रद्द होतं. त्या फॉर्म सोबत मृत्युपत्र देखील जोडावे लागते.

पासपोर्ट : पासपोर्टविषयी अशी कोणतीच तरतूद नाही मृत व्यक्तीचे पासपोर्ट रद्द करता येईल किंवा जमा करता येईल. विशेष संबंधित विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला अर्ज देऊन पासपोर्ट रद्द करण्याचीही तरतूद नाही. मात्र पासपोर्टची वैधता, त्याचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा रिन्यू केला नाही, तर तो आपोआपच रद्द होतो.

वाहन चालक परवाना/ ड्रायविंग लायसन्स : मृत व्यक्तीचा वाहन चालक परवाना रद्द आणि जमा करण्याची कोणतीच तरतूद नाही. प्रत्येक राज्य सरकार वाहन चालकाचा परवाना रद्द करणे आणि निलंबित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नियम ठरवत असते. दरम्यान चालक वाहन परवाना रद्द करण्यासाठी तुम्ही थेट आरटीओ कार्यालयात जाऊ शकतात. वारस मृताच्या नावे नोंदणीकृत वाहन त्याच्या / तिच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या राज्य-विशिष्ट प्रक्रियेचीही पुष्टी करू शकतात.

चालक परवानाविषयी अधिकाऱ्यांना सांगितले नाही तर: वाहन चालक परवाना जमा करणे आणि रद्द करण्याचा असा कोणताच कायदा नाही. परंतु त्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण ते संबंधित कार्यालयात किंवा अधिकाऱ्याकडे जमा करावे. दरम्यान आजकाल ऑनलाईन घोटाळा करणारे लोक याचा गैरवापर करतात आणि त्याचा भुर्दंड निर्दोष व्यक्तींना भरावा लागतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याबाबत माहिती आहे का? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

Comments are closed.