आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग ।। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यांचा नक्की अवलंब करा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग ।। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यांचा नक्की अवलंब करा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

सर्व महापुरुषांनी आळसाची निंदा केली आहे. दक्षिण भारतातील थोर संत तिरूवल्लुवर म्हणतात, दीपमाळ कितीही उंच असली तरी आळसामुळे तिचा प्रकाश हा निस्तेज असतो. स्वामी रामतीर्थ यांच्या मते, आळस हा माणसाला जिवंतपणीच मरण यातना देतो.

आळसाचे दुष्परिणा फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर जीवनाच्या अंतापर्यंत भोगावे लागतात हे कटू सत्य आहे, आळसामुळे दारिद्र्य येते. एवढं सगळं होऊनही आपण आळस झटकून त्याला कायमचे दूर करत नाही, तर याच्या दुष्परिणामांसाठी आपणच जबाबदार असणार आहोत.

मित्रांनो असं म्हणतात की आळशी माणूस खुप कमी विद्या म्हणजे खुप कमी ज्ञान गृहन करतो. आणि ज्याला विद्या नसते त्याला खूप कमी धन मिळतं. आणि ज्याला कमी धन मिळतं त्याला खूप कमी मित्र मिळतात.ज्या माणसाला मित्र कमी मिळतात, त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते.

आणि खूप कष्टाने सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे या आळशी पणामुळे आपल्या आयुष्यात खुप मोठे नुकसान होते. आळस हे कोणतही आजार नाही पण लक्षण आहे. आळशी पणामुळे आपल्या आयुष्यात काही मोठी ध्येय साध्य करता येत नाही. हाच आळशी पणा दूर करण्यासाठी पाच सोपे मार्ग आहेत.

आळस पुर्णपणे काढून टाकायचा असेल, तर काय करावे लागेल? आपण पाच अशे मार्ग बघणार आहोत ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवले तर खात्री आहे तुम्हाला आयुष्यात कधीच आळस येणार नाही.

१)आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मोठे लक्ष्य ठेवा: माणसे आळशी का बनतात? कारण त्यांच्या आयुष्यात काहितरी मोठे करण्यासाठी ध्येयच नसतात. ध्येय हीन मनुष्याची स्थिती ही त्या कुत्र्या समान असते, जो कोणतीही गाडी आली की तो कुत्रा त्या गाडी बरोबर दम लागे पर्यंत पळतो.

मग शांतपणे बसून राहतो. परत काही वेळा नंतर दुसरी गाडी आली की त्या गाडी मागे पळतो. तो कुत्रा का पळतो कशामुळे पळतो हे त्याला सुद्धा माहित नसते. ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय नसतात त्या माणसाबरोबर सुद्धा असेच चालू असते. त्याला जर कोणी प्रश्न विचारला की, तू का जगतो? तो उत्तर देईल सगळे जगतात, म्हणून मी जगतो.

त्याला जर विचारले, तुला आयुष्यात काय करायचे आहे? तर तो उत्तर देईल जे सगळे करतील, तेच मी करेल. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा माणूस सुस्त आणि आळशी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात काही मोठे ध्येय नसतात, मोठे लक्ष्य नसतात जे त्यांना काम करण्यासाठी प्रेरीत करतील.

ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय असतात ना, तो माणूस कधीच सुस्तावलेला दिसणार नाही. तो अक्षरशः त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झपाटलेला असतो. त्याला दिवसातले चोवीस तास सुद्धा कमी पडतात. कारण त्याला आयुष्यात काही तरी मोठे मिळवायचे असते. म्हणून तुम्हाला आळस पुर्णपणे घालवायचा असेल तर पुढच्या एक वर्षाचे, पाच वर्षाचे, दहा वर्षाचे ध्येय आजच लिहून ठेवा आणि ते पुर्ण करण्यासाठी कामाला लागा.

२)पौष्टिक अन्न खाणे: मित्रांनो तुम्ही जर तळलेले, मसालेदार पदार्थ खात असाल किंवा जंक फूड जसं की नुडल्स, बर्गर , पिझ्झा असे अन्न खात असाल तर तुमची इच्छा नसतांना सुद्धा आळस येईल. कधीतरी मज्जा म्हणून हे खाणे ठीक आहे, पण अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन

सातत्याने होत असेल तर मग तुम्ही सुस्त व्हाल. म्हणून आळस घालवण्यासाठी तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, फळं, डरा्यफ्रूट्स या गोष्टींवर तुम्ही भर दिला तर तुम्ही नेहमी उत्साही आणि उर्जेनी भरलेले रहाल.

३)प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचे आहे ह्याची यादी बनवा: मित्रांनो तुम्हाला आळस घालवायचा असेल तर रोज सकाळी तुम्हाला दिवसभरात काय काय करायचे आहे याची यादी बनवा. म्हणजे एक प्रकारे दिवसभरात तुम्हाला काय करायचे आहे याची स्पष्टता येईल. यादी मधे भरमसाठ गोष्टी टाकत बसू नका.

पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या केल्याच पाहिजेत अशा पाच ते सहा गोष्टी यादीत लिहा. आणि मग एक-एक करून ते काम पूर्ण करा. लक्षात ठेवा बनवलेल्या यादी मधील (९०%) नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कामे तुम्ही झोपायच्या आधी पूर्ण झालेली असली पाहिजे. अशे केल्याने तुमचा मेंदू सतत ऑक्टिव्ह राहिल.

४)चांगल्या लोकांच्या संगतीत रहा: मित्रांनो तुम्ही हुशार आणि ध्येयशाली लोकांच्या संगतीत रहाल तर तुम्ही आळशी राहुच शकत नाही. लहान मुलं असतात ती सकाळी उठायला कंटाळा करतात, पण तुम्ही जर त्यांना हॉस्टेलला टाकले तर बरोबर ते सकाळी लवकर उठतात, या कारण हॉस्टेल मध्ये मिळालेली संगत.

असे म्हणतात ” जशी तुमची संगत, तशी आपल्या जीवनाला रंगत”. तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफीस मध्ये पण अशा लोकांच्या संगतीत रहा जे प्रामाणिक आहेत आणि ज्यांना आयुष्यात काही मोठे करायचे आहे. त्यांच्या बरोबर राहून तुम्ही सुद्धा त्यांच्या सारखे होण्याचा प्रयत्न कराल. मग आळस तुम्हाला घालवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत रहा.

५)कोणतेही नवीन बदल हळू हळू करा: मित्रांनो काही लोक अशे उत्साही (जोशीले) असतात की त्यांनी एखादा प्रेरक व्हिडिओ पाहिला, एखादे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले की त्यांना खूप (जोश) उत्साह येतो. ते रोज सकाळी आठ वाजता उठत असतील तर ते ठरवतात

दुसऱ्या दिवशी पासून ते एकदम पहाटे पाच वाजता उठनार. दुसऱ्या दिवशी उठतात तर खरे पाच वाजता पण परत तिसऱ्या दिवशी ‘जैसे थे’. म्हणजे ‘पहिले पाढे पंचावन्न’. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ‌कोणताही नवीन बदल घडवून आणायचा असेल तर तो हळूहळू करा.

म्हणजे आठ वाजता उठत असाल तर एक आठवडा सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उठा, नंतर पुढचा आठवडा सात वाजून तीस मिनिटांनी उठा, नंतर पुढचा आठवडा सात वाजून पंधरा मिनिटांनी उठा, आणि असे करत करत पुढे जा. नाहीतर एकदम मोठे बदल करायला जाल तर तुम्हाला आळस येईल, कंटाळा येईल. मित्रांनो हे होते ते पाच मार्ग ज्याचा अवलंब तुम्ही केला तर तुम्हाला आळस कधीच येणार नाही.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

admin

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!