आपल्याला आळस का येतो ? ५ कारणे जी आपण नेहमी दुर्लक्षित करतो आणि अजून आळशी बनत जातो ।।जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

आयुष्यात खुप काही करायची इच्छा आहे पण खुप आळस येतो. काही करायची इच्छा होत नाही. असे खुप जण म्हणतात. आळस का येतो? आळस येण्याचे नेमके काय कारण आहेत? आळस येण्या मागचे शास्त्र जर तुम्हाला कळले तर आळस झटकनं सोपं होईल.

आळस का येतो? यामागची ५ कारणं आपण बघणार आहोत. तुम्हाला आळस येत असेल तर हे वाचल्यावर तुम्हाला एक स्पष्टता येईल की नक्की तुम्ही काय केले पाहिजे.आळस येण्या मागचे शास्त्र समजेल. मित्रांनो असं म्हणतात की आळशी माणूस खुप कमी विद्या म्हणजे खुप कमी ज्ञान गृहन करतो.

आणि ज्याला विद्या नसते त्याला खूप कमी धन मिळतं. आणि ज्याला कमी धन मिळतं त्याला खूप कमी मित्र मिळतात.ज्या माणसाला मित्र कमी मिळतात, त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते. आणि त्या व्यक्तीला खूप कष्टाने सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे या आळशी पणामुळे आपल्या आयुष्यात खुप मोठे नुकसान होते.

मित्रांनो एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की माणूस हा दिवसाचे ५ तास हे आळशी पणामुळे वाया घालवतो. पण जर हे ५ तास माणसाने आपल्या प्रगतीसाठी वापरले तर खुप मोठे बदल घडवू शकतो यात काही शंका नाही. पण कारणे समजून घेण्या आधी २ महत्वाच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे.

पहिले म्हणजे आपले मन काम कसे करते. आपले मन हे नेहमी आराम मिळवण्यासाठी धडपडत असते व त्रास टाळत असते. म्हणजेच आपल्याला नेहमी अशीच कामे आवडतात जिथे आराम आहे. आणि आपण अशी कामं टाळत असतो जिथे त्रास आहे किंवा कष्ट आहे.

आणि दुसरं म्हणजे जितकं आपण आपल्या मनाला आणि शरीराला चालना देऊ तितकंच आपलं मन आणि शरीर वेगाने आणि उत्स्फूर्तपने काम करत राहते. मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या आळस हा मुख्य आजार नाही पण ते एक लक्षण आहे.

१)आळस येण्याचे सर्वात पहिलं कारण म्हणजे ध्येयाचा आभाव: जेव्हा माणसाच्या आयुष्यात काही मोठी ध्येय नसतात, अशी ध्येय ज्याला तुम्ही टाळु शकत नाही, अशी ध्येय ज्यांच्यामुळे तुम्ही जगु शकत नाही. अशी ध्येय जी आतून तुम्हाला काम करायला प्रेरणा देतात.

अशी ध्येय जी पुर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद देतात. अशी ध्येय ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खुप मोठे बदल घडेल. जेव्हा अशी ध्येय तुमच्याकडे नसतात तेव्हा तुम्हाला आळस येतो. माणूस दोन प्रकारचे आयुष्य जगतो, एक म्हणजे ध्येयाने झपाटलेले आणि दुसरं परीस्थिती नुसार.

जो माणूस ध्येयाने झपाटलेल्या असतो त्याला त्याची ध्येयच आतून प्रेरणा देतात. तो सातत्याने ती ध्येय पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो.आज पृथ्वीवर फक्त ३% लोक ध्येय ठेवून जगतात आणि म्हणूनच सर्व क्षेत्रात यशस्वी होतात. बाकी ९७% लोक एकदम साधारण आयुष्य जगतात.

२)दुसरे कारण निर्धारित वेळ न ठरवणे म्हणजेच अंतिम मुदत न ठरवणे: मित्रांनो काही लोक ध्येय तर ठरवतात पण त्यासाठी अंतिम वेळ नाही ठरवत. म्हणजेच एक तारिक ठरवून त्या तारखे आधी मी हे काम संपवून टाकेल. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जी १० वर्षा पासून म्हणतात मला हे करायच आहे

पण ते काम काही पूर्ण होत नाही, कारण ज्या वेळेस ते काम करण्याची वेळ येते तेव्हा हा नियम लक्षात ठेवा, आपल्या मेंदूला आरामशीर कामे आवडतात ज्यावेळी त्याला कळते की या कामाची निर्धारित वेळ आहे, निर्धारित वेळेत करायचे आहे, आपल्याला त्रास होईल,

तेव्हा आपला मेंदू आपल्याला आळसा कळे घेऊन जातो. तेव्हा मनात विचार येतात की हे काम आता नको नंतर करु त्या व्यतिरिक्त दुसरे सोपे काम करु. त्यामुळे अनेक लोक आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून दुसरी कामे करतात. तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, जेव्हा आपण आपले एखादे महत्वाचे काम करतो तेव्हा मनात विचार येतो,

थोड व्हाट्सअँप चेक करुन बघू, थोड युट्युब बघू, थोड टी.व्ही. बघू. कारण तुमच्या मनाला आराम आवडतो, आणि तो पुर्ण प्रयत्न करतो तुम्ही ते काम कसं टाळू शकतो. पण असे होत असेल तर तुम्ही तुमच्या मनाला डेडलाईन द्या की तुला हे काम आताच करायचे आहे. तेव्हा कुठे तुमचे मन ते काम करायला तयार होईल.

३)तिसरे कारण आहे आवडीचा अभाव: मित्रांनो विचार करा एक माणूस हायवे वरून चालला आहे, तो पुर्ण वेगाने जाऊ शकतो पण जिथं त्याला जायचं आहे त्याची त्याला आवळच नसेल, तर तो तिथे पुर्ण वेगाने जाईल का? त्याला जिथे जायचे आहे तिथे त्याची जायची इच्छा नसेल तर तो सारखं मागे वळुन बघेल.

गाडी हळू चालवेल आणि विचार करेल कशी या गाडीला परत मागे घेऊन जाऊ. तसेच मित्रांनो आपल्या आयुष्याचे आहे. जेव्हा आपण नावडते काम करतो, तेव्हा आळस सतावतो. अनेक लोक ऑफिस मध्ये काम करतात पण त्यांना त्याच्यामध्ये अजीबात आवड नसते. ते फक्त आणि फक्त पगारासाठी काम करतात. आणि जेव्हा आपण असे काम करतो तेव्हा आळस येतो.

४)चौथे कारण आहे योजनेचा आभाव: ज्या माणसाच्या आयुष्यात काही योजना नसते प्लांनीग नसते त्या माणसाला जास्त आळस येतो. कुठल्याही गोष्टीची योग्य प्लांनिंग नसेल तर तेच काम करण्यासाठी आपल्याला दुप्पट वेळ लागतो.

तेच काम जर पूर्वनियोजन करून केले तर ऐन वेळी होणारी धावपळ देखील थांबते आणि आपला वेळही वाचतो. नियोजन न केल्याने आपण गोष्टी टाळतो आणि म्हणुन आळस घालवायचं असेल तर प्रत्येक कामाचे नियोजन गरजेचे आहे.

५)पाचवे कारण आहे स्वतः बद्दल आदर नसणे: खूप लोक स्वतः चा आदर करत नाही. त्यांच्या कुटुंबातील लोक, आई- वडील त्यांना सांगत असतात की काही तरी जवाबदारी घ्या, काहीतरी चांगले काम करा. पण ते घरातच बसून एका कोपऱ्यात टीव्हि बघत असतात.

त्यांना स्वतः वर अजिबात विश्वास नसल्याने ते नेहमी कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायला तयार होत नाही. ते सतत काम न करण्याचे कारण शोधत असतात. मित्रांनो ही होती ५ महत्वाची कारणे ज्यामुळे तुम्हाला आळस निर्माण होते.

मला खात्री आहे हे कारण समजल्यानंतर तुम्ही तुमचे आळस झटकून टाकाल. आणि तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी कामाला लागाल. आपल्याला लेख कसा वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “आपल्याला आळस का येतो ? ५ कारणे जी आपण नेहमी दुर्लक्षित करतो आणि अजून आळशी बनत जातो ।।जाणून घ्या महत्वाची माहिती !

Comments are closed.