स्वतःचे घर आणि गाडी घेण्याची योग्य वेळ कोणती ? ।। काय आहे 10-90 रुल ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपलं घर आणि कार आपण केव्हा घेतली पाहिजे? प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं की आपल्या समोर एक सुंदर आणि प्रशस्त घर असलं पाहिजे. आणि घरासमोर एक गाडी असली पाहिजे. आणि म्हणूनच आपण एक केस स्टडी पाहणार आहोत की घर आणि कार घेण्याचा योग्य काळ कोणता असतो. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य असल पाहिजे.

तर हे आर्थिक स्वातंत्र्य असण्यासाठी आपल्या घर आणि कारची किंमत म्हणजेच ज्या आपल्या पर्सनल गोष्टी आहे त्याची किंमत 10% पेक्षा जास्त असू नये. तुमच्या टोटल नेटवर्थच्या 10% पेक्षा जास्त वर ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत. तर यासाठी एक रुल आहे, तो रुल असा आहे 10-90 रुल. म्हणजेच 10%-90% रुल.

जर प्रश्न असा असेल तर 10% घर आणि कार मध्ये तुम्ही गुंतवत असता तर 90% च करायच काय? जर आपण बिजनेसमन असाल तर 90% रक्कम तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये इन्वेस्टमेंट करू शकतात. आणि जर आपण बिझनेस करत नसू तर आपल्याला ही 90% रक्कम बाहेर इन्वेस्टमेंट करायला पाहिजेत. जसं की फंडस्, पॉलिसी, शेअर,अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता.

पण आपण पाहत असतो बरेचशे लोक आहेत की ज्यांना आर्थिक स्वातंत्र्य हे मिळत नसत. कारण की आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात यात ते जास्त इन्वेस्टमेंट करत असतात. काही असे उद्योजक आहेत की त्यांचं टर्नओव्हर 1 करोड आहेत पण त्यांच्याकडे 40 लाख रुपयांची (Fortuner car) आहे. मग कुठेतरी फसलेल असत.

जेव्हा आपण घर किंवा गाडी घेतो तर दर महिन्याला आपल्याला त्याचा मेंटेनन्स काही खर्च द्यावा लागतो, ईएमआय सुध्दा असतात. तर बरेच लोकांना वाटत की हे शक्य आहे का? हे फॉलो करन कठीण आहे पण आपल्याला हे करावं लागेल. जर एखाद्याची नेटवर्थ आपण पाहिली जर 1 करोड आहे आणि जर 10% म्हणजेच 10 लाख रुपये यात आपण चांगल्यातलं चांगल घर किंवा कार घेवू शकत नाही.

तर अशावेळेस तुम्ही एका भाड्याच्या घरात रहा आणि गाडी घ्यायचीच असेल तर ती एखादी (used car) घ्या. आणि आपले सर्व पैसे बिझनेस मध्ये किंवा एका उत्तम गुंतवणुकी मध्ये लावा. आता हे करायच कधी पर्यंत तर तो पर्यंत करा की जो पर्यंत आपण 10-90 च्या सुत्रामध्ये येत नाही. म्हणजेच 10% आपल्या पर्सनल गोष्टी साठी आणि 90% आपल्या बिझनेस साठी किंवा गुंतवणुकी मध्ये. प्रत्येक मराठी माणसासाठी घर हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.

आणि जर आपण हा मार्ग वापरला तर आपण फायनान्सशियली फ्रीडम वर पोहचू. जो व्यक्ती हा मार्ग वापरेल तो नक्कीच यशस्वी होईल. आपण एक उदाहरण पाहुयात मुकेश अंबानी यांच. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 2,40,000 कोटी रुपये आहे. जर त्यांची नेटवर्थ एवढी असेल तर आज ते राहत आहे त्या घराची किंमत साधारण 6000 कोटीच्या आसपास पकडली जाते.

आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मुकेश अंबानी हे भारतातले श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि जगातल्या 19 व्या क्रमांकाचे उद्योजक आहे. तर ह्यांच्याकडे विमान आहे, हेलिकॉप्टर आहेत, बोटी आहेत, गाड्यांची किंमत हे सर्व मिळून साधारण 10,000 कोटींच्या आसपास होते. आणि घर आणि गाड्यांची किंमत आपण एकत्र केली तरी ती त्यांच्या नेटवर्थच्या 4.16% च होती. तर अस करणारे फक्त मुकेश अंबानी नाही, तर जग विख्यात बिझनेसमन आहे वॉरेन बुफेट, बिल गेट्स, अशा लोकांनी हा फॉर्म्युला अवलंबलेला आहे.

तर मराठी उद्योजकांनी सुध्दा हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. बिझनेस मधले सर्व पैसे जर तुम्ही बिझनेस साठी न वापरता पर्सनल गोष्टी साठी वापरत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही जास्तीत जस्ट गुंतवणूक ही बिझनेस मध्ये करा. ह्यात आपण आपल्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार २०-८० किंवा ३०-७० पर्यंत जाऊ शकतात मात्र ह्यात जास्त टक्केवारी हि नेहमी गुंतवणुकीलाच द्यायला हवी.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.