आपल्या स्वतःच्या जागेमध्ये विनापरवाना घराचं किंवा दुसरं कुठलं बांधकाम करता येतं का? ।। खोदकाम करून एका प्लॉटमध्ये माती दुसऱ्या प्लॉटमध्ये टाकली, तर त्याला रॉयल्टी माफ आहे का? ।। वडिलोपार्जित मालमत्ता वारसांव्यतिरिक्त त्रयस्थाला दिली तर काय होईल? ।। सत्तर वर्षाच्या माणसाने खरेदी-विक्रीचा व्यवहार केला तर तो वैध ठरेल का? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

कायदा लोकप्रिय शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपल्या स्वतःच्या जागेमध्ये विनापरवाना घराचं किंवा दुसरं कुठलं बांधकाम करता येतं का ? उत्तर : या प्रश्नाचं सहजपणे उत्तर नाही असा आहे, कारण कोणताही कायदेशीर बांधकाम करण्याकरता आपल्याला दोन मुख्य गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजेच ज्या जमिनीवर ते बांधकाम करायचा आहे त्या जमिनीची कायदेशीर मालकी किंवा तत्सम कायदेशीर अधिकार

आणि दुसरी गोष्ट जे बांधकाम करायचे आहे त्या बांधकामाच्या अनुषंगाने अकृषिक म्हणजे NA आणि बाकी सगळ्या बांधकाम आणि तत्संबंधी परवानग्या. या दोन्ही गोष्टींची पूर्तता होत नाहीत तोवर ते बांधकाम पूर्णतः अधिकृत किंवा कायदेशीर आहे असं म्हणता येत नाही. केवळ जागेची मालकी आपली आहे म्हणून आपण त्या जागेमध्ये आपल्या मर्जीने आपल्याला पाहिजे तसं बांधकाम करू शकत नाही.

आपली जागा ज्या संबंधित संस्थेच्या अधिकार क्षेत्रात येत असेल तर ते ग्रामपंचायत असेल,नगरपरिषद असलेली, महापालिका असेल, एमएमआरडीए असेल किंवा इतर कोणताही जे अधिकार क्षेत्र आहे. त्या अधिका-याचे अधिकार आहे त्या संबंधित संस्थेकडून आपल्याला बांधकामाची परवानगी घेणं हे अत्यंत गरजेचं किंबहुना बंधनकारक आहे.

जोवर अशा सक्षम संस्थेकडून आपण परवानगी घेत नाही तोवर त्या बांधकामाला अधिकृत किंवा कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही आणि ते बांधकाम अनधिकृत बांधकाम ठरतो. सहाजिकच अशा अनधिकृत बांधकामाविरोधात तोडकाम, पाडकाम, किंवा इतर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता ही कायम असते.

म्हणून जरी आपली स्वतःची मालकीची मालमत्ता असेल तरीसुद्धा त्यावर बांधकाम करण्यापूर्वी जर NA परमिशन लागत असेल तर NA परमिशन, बांधकाम परमिशन लागत असेल तर बांधकाम परवानगी हे सगळं घेऊन मगच आपण आपलं बांधकाम करावा म्हणजे आपलं काम आहे ते पूर्णतः अधिकृत आणि कायदेशीर होईल आणि त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता किंवा धोका उरणार नाही.

खोदकाम करून एका प्लॉटमध्ये माती दुसऱ्या प्लॉटमध्ये टाकली, तर त्याला रॉयल्टी माफ आहे का? उत्तर : एखाद्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतात मातीचा खोदकाम केलं आणि ती माती जर त्याच रोडवर वापरली त्यात जमिनीच्या तुकड्यावर सपाटीकरण करतात मध्ये वापरली तर त्या उत्खननाकरिता वापरली तर रॉयल्टी किंवा स्वामित्वधन आता आकारण्यात येणार नाही.

मात्र याच्याकरता जे बंधन आहे ते म्हणजे त्या उत्खननातून निघालेल्या मातीचा वापर त्या जमिनीच्या तुकड्यावर होन आवश्यक आहे. सहजपणे जर आपण एका ठिकाणची माती खोदून दुसऱ्या ठिकाणी टाकत आहे, तर त्याच्या वापराचे वापराची जमीन बदलयामुळे आपल्याला या शासन निर्णयाचा आणि त्यामध्ये रॉयल्टी माफ झाल्याचा फायदा घेता येणार नाही.

कारण त्या शासन निर्णयामध्ये मालक एक असून जमिनीचा तुकडा एक असणं हे बंधनकारक आहे म्हणजे एखाद्या मालकाने आपल्या एका जमिनीतली माती खोदून त्याचा वापर आपल्याच दुसरीकडे च्या जमिनीत केला तरीसुद्धा त्यांना रॉयल्टी मधले माफी किंवा सवलत मिळणार नाही कारण त्या मातीचा वापर त्याच ठिकाणी करणं हे बंधनकारक आहे.

वडिलोपार्जित मालमत्ता वारसांव्यतिरिक्त त्रयस्थाला दिली मग ते मृत्युपत्र असेल किंवा करार असेल तर काय होईल? उत्तर : आता यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या माणसांनी मालमत्तेचे हस्तांतरण केलेला आहे ते कोणाला केलेला आहे याच्या पेक्षा बाकीची कायदेशीर तरतुदींची पूर्तता झालेली आहे किंवा नाही हे अधिक महत्त्वाचा आहे.

आता एखाद्या व्यक्तीला वडलोपार्जित मालमत्तेमध्ये समजा दहा टक्के १०% हक्क असेल किंवा हिस्सा असेल आणि त्याने त्याचा तो 10% हिस्सा किंवा हक्क मृत्यूपत्राने किंवा कराराने वारसाव्यतिरिक्त त्रयस्थाला दिला असेल तर केवळ हे हस्तांतरण वारसा व्यतिरिक्त त्रयस्थाला दिला असेल या एकाच कारणामुळे तो व्यवहार करार किंवा हस्तांतरण बेकायदेशीर ठरू शकत नाही.

जर त्या हस्तांतरणामध्ये बाकी काही कायदेशीर त्रुटी असतील म्हणजे हक्क किंवा हिस्स्यापेक्षा जास्त मालमत्ता दिली असेल, करार नोंदणीकृत नसेल किंवा बाकी काही कायदेशीर तरतुदींची पूर्तता झाली नसेल तर त्या हस्तांतरणाला आव्हान देऊन ते रद्द करून घेता येऊ शकेल. मात्र केवळ आणि केवळ वारस असताना दुसऱ्याला मालमत्ता दिली या एका कारणास्तव कोणत्याही हस्तांतरणाला आव्हान देऊन त्यामध्ये यश येण्याची शक्यता ही अत्यंत धुसर आहे .

सत्तर वर्षाच्या माणसाने खरेदी-विक्रीचा व्यवहार केला तर तो वैध ठरेल का? उत्तर:  आता मागच्या प्रश्न सारखाच तिथे सुद्धा त्या माणसाचं वय हा मुद्दा गौण आहे. आपल्याकडे कायद्यानुसार प्रत्येक सज्ञान आणि जो बौद्धिक इतर दृष्टीने सक्षम आहे, अशा व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार आहे. म्हणून केवळ करार करणाऱ्या व्यक्तीचे वय काय आहे याच्यावरन त्या कराराची वैधता किंवा अवैधता, संकटात येऊ शकत नाही किंवा ठरवू शकत नाही.

एकदा का मनुष्य सज्ञान झाला का म्हणजे अठरा वर्ष किंवा 21 वर्षे त्यांनी पूर्ण केले. तो जर भौतिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल तर त्याला योग्य ते करार करायचा पूर्ण अधिकार आहे. मग एखाद्या माणसाचं वय वर्ष 70 झालं म्हणून त्याचा करार करण्याचा अधिकार नाहीसा होत नाही. जोवर तो बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे आपण कोणता करार करतोय हे त्याला कळतं.

त्याला वेड लागलेलं नाहीये किंवा बौद्धिक दृष्ट्या अक्षम नाहीये. तर अशा कोणत्याही व्यक्तीचा करार हा केवळ त्या कारणामुळे अवैध ठरणार नाही. जर मनुष्य अज्ञान असेल आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याने केलेल्या कराराला आव्हान देऊन तो रद्दबातल ठरवत येऊ शकतो. मात्र एखाद्या माणसाचा केवळ वय जास्त आहे

म्हणून त्याने केलेल्या करारावर त्या एकाच मुद्द्याच्या आधारे प्रश्नचिन्ह लावता येत नाहीत आणि त्यात केवळ एकाच मुद्द्याच्या आधारे जर आपण असे आव्हान देण्याचा विचार करत असाल तर अशा आव्हानाला यश येण्याची शक्यता ही निश्चितपणे कमी आहे. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.