आपल्यावर सतत जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे ? जाणून घ्या महत्वाचे ५ नियम ज्याद्वारे आपण त्या जळणाऱ्या लोकांपासून दुःखी होणार नाहीत !

लोकप्रिय शैक्षणिक

आपल्यावर जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे? मित्रांनो जेव्हा आपण आयुष्यात प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की काही लोक आपल्यावर जळू लागले आहेत, आपला द्वेष करु लागली आहे आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा ह्या लोकांमध्ये आपला जवळचा मित्र असतो

किंवा आपल्या घरातला एखादा नातेवाईक असतो यामुळे आपल्या मनस्ताप होतो आणि अशा लोकांबरोबर कसे वागायचे हे समजत नाही आज मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला अशा लोकांना सामोरे जाण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मनस्ताप होणार नाही.

१. जळूवृत्तीचे मूळ कारण आहे कमतरता : जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या मध्ये असे काय तरी दिसते जे त्याला हवे असते पण त्याच्या मध्ये नसते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या बद्दल द्वेष निर्माण होतो ती आपल्यावर जळायला लागते. उदाहरण समजा दोन मित्र आहे दोघेही व्यवसाय करतात पण त्या दोघांमधल्या एका मित्राचा व्यवसाय खूप जोरात चालतो तो खूप पैसे कमवतो, मग तो बंगला घेतो,

गाडी घेतो आणि दुसऱ्या मित्राचा व्यवसाय अजिबात चालत नाही आता पहिल्या मित्राचे यश बघून आनंद होण्या ऐवजी दुसरा मित्र त्याच्यावर जळायला लागतो त्याचा राग राग करतो. कारण त्याला असे वाटते आपल्या कडे काहीतरी कमी आहे म्हणून आपला व्यवसाय चालत नाही.

मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता जळूवृत्ती निर्माण होण्याचे मूळ कारण आहे कमतरता. त्यामुळे तुम्हाला जर असा अनुभव आला की लोक तुमच्यावर जळू लागली आहे. तेव्हा खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे,कारण याचा अर्थ तुम्ही आयुष्यात प्रगती करत आहात तुम्ही असे काही करत आहात ते बाकीचे करत नाही.

२. खूपच त्रास होत असेल तर जळणार यांना सडेतोड उत्तर द्या : मित्रांनो कधीतरी अशी वेळ येते आपली सहनशक्ती संपते समोरच्याचे वागणे मर्यादा सोडते. तुम्ही कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, विषय टाळायचा प्रयत्न केला तरी समोरचा तुम्हाला त्रास देणे थांबवत नाही. अशा वेळेस उत्तम पर्याय त्याला सरळ सरळ उत्तर देणे.

हा इथे एक गोष्ट स्पष्ट करतो तुम्ही रागात असतांना उत्तर देऊ नका अशाने तुमचे नाते तुटू शकते. तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा समोरच्याला समजून सांगा तुझे असे वागणे मला पटत नाही याचा मला त्रास होतो. उदाहरण समजा तुमच्या ऑफिस मधला एखादा सहकारी बॉस समोर नेहमी तुमच्या चुका काढत असेल

तेव्हा त्या सहकाऱ्याला एकांतात घेऊन सांगा तुझी असे नेहमी बॉस समोर माझ्या चुका काढतो ते मला अजिबात आवडत नाही अशांनी आपल्या दोघांचे संबंध बिघडू शकतात आणि मला बिघडवायचे नाही. मित्रांनो जेव्हा समोरच्याला पण जाणीव करून देतो की आपल्याला त्याच्या मुळे त्रास होतोय तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा आदर सुद्धा करत असतो.

३. स्वतःच्या काही मर्यादा आखून घ्या : मित्रांनो आपल्या आयुष्यात काही मर्यादा आखून घ्या कोणाचे किती जवळ जायचं, कोणाला गोष्टी शेअर करायच्या, कोणा बरोबर किती बोलायचं, कोणाला किती बोलून द्यायचं याची काहीतरी स्वत:साठी लिमिट सेट करून ठेवा. शेवटी हे तुमचे आयुष्य आहे कोणी पण याव आणि तुम्हाला टपली मारून जावं अशी अवस्था होऊ देऊ नका

यासाठी नेहमी स्वतःची उंची वाढवत राहा ती कशी वाढवाल जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून जास्तीत जास्त स्वतःची प्रगती करून. मी तुम्हाला गर्विष्ठ व्हायला सांगत नाहीये,मी तुम्हाला स्वाभिमानी व्हायला सांगत आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वतःची पर्सनॅलिटी ठेवता समोरचा तुमचा अपमान करायच्या आधी दहा वेळा विचार करतो मनातल्या मनात जळत राहिल तो भाग वेगळा पण तो तुम्हाला त्रास देणार नाही.

४. प्रेमळ आणि जिवाभावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा : मित्रांनो ह्या जगात तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही त्यामुळे आयुष्यात काही अशी लोकं नेहमी असणार की तुमचा द्वेष करतील तुमचा राग राग करतील. त्यामुळे सदर त्या लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या जिवाभावाच्या प्रेमळ नात्यांकडे फोकस ठेवा. या जगात अनेक चांगले लोक आहे जी प्रेमळ आहे, पॉझिटिव आहे,

अशा लोकांवर आपली वेळ आणि एनर्जी खर्च करा आपल्या मनाला सवय असते दहापैकी नऊ लोकांनी आपले अभिनंदन केले ना आपला फोकस त्या नऊ लोकांकडे नसतो त्या एकाने माझे अभिनंदन का केले नाही इकडे असतो आणि त्याचा विचार करून आपण स्वतःलाच त्रास करून घेतो म्हणून म्हणतो तुमचा फोकस नेहमी चांगल्या नात्यांकडे ठेवा.

५. अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका : मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला चांगली वागणूक मिळत नाही कारण समोरचा तुमच्यावर जळत असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे तुमच्या मध्ये नाही. समोरच्यामधे कमतरता आहे

त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून तो असा वागत आहे म्हणून अशा गोष्टी मनाला लावून घेऊ नका.मला माहिती आहे तेवढे सोपे नाही पण वास्तवता हीच आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका.

मित्रांनो परत एकदा त्या पाच गोष्टी बघूया : १. जळूवृत्तीचे मूळ कारण आहे कमतरता २. खूपच त्रास होत असेल तर जळणार यांना सडेतोड उत्तर द्या. ३.स्वतःच्या काही मर्यादा आखून घ्या. ४. प्रेमळ आणि जिवाभावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा. ५.अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “आपल्यावर सतत जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे ? जाणून घ्या महत्वाचे ५ नियम ज्याद्वारे आपण त्या जळणाऱ्या लोकांपासून दुःखी होणार नाहीत !

Comments are closed.