पहिला प्रश्न-: आत्या नंतर तिच्या मुलांची किंवा वारसांची नावे सातबारावर किंवा इतर रेकॉर्डवर येतील का? उत्तर-: याचा साधा सोपा आणि सरळ उत्तर होय अस आहे. कारण ज्या अर्थी आत्याच नाव सातबारावर होतं याचा अर्थ त्या आत्याला त्यामिळकती मध्ये काही ना काही हक्क हितसंबंध किंवा हिस्सा असला पाहिजे. आणि जेव्हा सातबारा वरच्या कोणत्याही व्यक्तीचे निधन होतं तेव्हा वारस नोंद करून निधन झालेल्या व्यक्तीच्या जागी त्या व्यक्तीच्या वारसांच्या नावाची नोंद करण्यात येते
किंवा करण्यात येऊ शकते हे झालं सर्वसाधारण परिस्थितीमध्ये उत्तर पण समजा काही स्पेशल केसेसमध्ये उदाहरणार्थ आत्याच नावच चुकून लागलेलं आहे, किंवा आत्याला काही हक्क नसलेल्या जागेमध्ये तीच नाव लागलेलं आहे. किंवा आत्याने तिचा हक्क किंवा हिस्सा क्षेत्र आधीच समजा आपल्याला विकला आहे,
त्याच हक्कासोडपत्र केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींची अभिलेखात मध्ये नोंद करून आत्याचं नाव कमी करायचं राहून गेलेला आहे म्हणजे थोडक्यात काय झालं की आत्याचा जो काही हक्क किंवा हिस्सा होता तो तिने याअगोदरच हस्तांतरित केलेला आहे म्हणजे रितसर वैध नोंदणीकृत करार करून तो हक्क आणि हिस्सा कुणाला तरी देऊन टाकलेला आहे मात्र त्याच्या नंतर त्या कराराच्या अनुषंगाने सातबारामध्ये तिचं नाव कमी होणे अपेक्षीत होतं
ते काही कारणाने राहून गेले आणि मग आत्याचं निधन झालं आणि केवळ तिचं नाव सातबारावर आहे म्हणून जर त्यांच्या वारसांची नावे लागणार असतील तर ते काहीस चुकीच आहे अशा परिस्थितीत त्यांची नावे लागण्याला आपण हरकत घेऊ शकतो किंवा त्यांचे नाव लागल्यानंतर सुद्धा आपण सक्षम महसुली आणि आणि दिवाणी न्यायालयात जाऊन त्यांची नाव कमी करू शकतो.
आपण त्यांना काहीही हक्क हितसंबंध नाही असं सुद्धा ही घोषणा पत्र किंवा असा निकाल आपण दिवाणी न्यायालय मधून निश्चितपणे घेऊ शकतो. थोडक्यात काय की आत्याचा नुसतं नाव आहे किंवा नाही याच्यावर या प्रश्नाचा अवलंबून उत्तर आपण शोधलं तर ते काही चुकीचं होईल आत्याला अधिकार होता किंवा नव्हता ह्या प्रश्नाचा जर आपण उत्तर शोधलं तर मग त्याच्या अनुषंगाने त्या त्यांच्या वारसांची नोंद होणे योग्य किंवा अयोग्य या बाबतीत आपण अधिक अचूक निष्कर्ष काढू शकतो.
दुसरा प्रश्न-: एखाद्या जमिनींची विक्री झाली. ताबा सुद्धा हस्तांतरित झाला. तर त्याच्या नंतर मुळ मालक जे होते त्याच्या नंतर त्यांचे सहहिस्सेदार दावा करु शकतात का? उत्तर-: आता एक लक्षात घेतले पाहिजे दावा करू शकण हे आपल्याकडे फारच सोपं आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्ती विरोधात दावा दाखल करू शकते. कारण दावा दाखल करण्याला आपल्याकडे तसे फारसे काही निर्बंध नाहीये पण खरा प्रश्न आहे की नुस्ता दावा करून उपयोग नाही त्या दाव्यामध्ये यश येऊ शकत का?
यश येण्याची शक्यता किती? हे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे प्रश्न आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या मालमत्तेची विक्री होते त्या विक्री च्या अनुषंगाने ताब्याच सुद्धा हस्तांतरण होत. याच दरम्यान जर खूप कालावधी गेलेला असेल आणि नंतर सहहिस्सेदार आणि त्याला आक्षेप घेतला किंवा दावा दाखल केला तर अशा परिस्थितीमध्ये उशीर जेवढा होत जाईल
सहहिस्सेदार कडून या कोणत्या बाबतीत जेवढी दिरंगाई केली जाईल तेवढी त्या दाव्याला यश येण्याची शक्यता ही कमी कमी होत जाईल बर नुस्ती विक्री आणि ताबा नसेल तर गोष्ट वेगळी पण समजा असे 4 5 व्यवहार झाले, म्हणजे मूळ मालकाने एकाला विकली,
त्याने दुसऱ्याला विकली त्याने अजून पुढे विकाली त्यांनी अजून पुढे विकणे असं जर अनेक वेळा झाले नसेल तर अशा परिस्थिती खूप वर्षांनी जाग्या झालेल्या सहहिस्सेदार हे सगळे व्यवहार अवमानित कारण ते सगळे व्यवहार रद्द करून घेणं आणि आपला मालकी हक्क प्रस्थापित करून ताबा मिळवणं म्हणजे काहीच कठीण आहे म्हणजे थोडक्यात एकंदर विक्री आणि ताबा हस्तांतरण किती वेळा झालेला आहे
त्याला येथील कालावधी लोटल्यावर ते प्रकरण मुदतीत आहे का त्या प्रकरणाची एकंदर बाकीची गुणवत्ता बघता त्यामध्ये यश येण्याची शक्यता किती आहे या सगळ्याचा विचार करून मगच दावा करावा की न करावा याबाबत आपण निर्णय घ्यावा नुसता आपल्याला काहीतरी कळलं आणि त्याला आव्हान द्यायचे म्हणून करू नये,
कारण त्याने तुमचा वेळ पैसा आणि श्रम सगळ वाया जातो म्हणजे मला जर विचारल तर दावा तेव्हाच करावा जेव्हा यश येण्याची शक्यता किमान 50 टक्क्यांपेक्षा जास्त जर वाटत असेल तर दावा करण्यात काही फायदा आहे. अन्यथा उगीचच करायचा म्हणून दावा करू नये.
तिसरा प्रश्न:-: इतर अधिकारातील व्यक्ती जमीन विकू शकते का? उत्तर-: आता इतर अधिकार जो कॉलम असतो त्यामध्ये अनेक व्यक्तींची नावे असू शकतात काही वेळेला वारस नोंदी नंतर मुलींची नावे इतर अधिकारात नोंदवतात. आणि मग त्यांच्या वारसांची नाव तेथे येतात मग काही वेळेला भोगवटादार यांच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्ती किंवा संस्थांचा हक्क किंवा हितसंबंध त्या अधिकारांची नाव इतर अधिकारांमध्ये नोंदवली जातात.
म्हणजे एखादे जमीन गहाण टाकली कर्ज दिलं वहिवाटीचा हक्क असेल असे जे काही हक्क आणि हितसंबंध असतात त्याची नोंद सुद्धा इतर अधिकारात करण्यात येतो म्हणून इतर अधिकारात नाव असलेल्या व्यक्तीचे हक्क नक्की काय याचा जर आपल्याला उत्तर शोधायचा असेल तर त्या व्यक्तीचं नाव नक्की का आणि कसं लागलाय ह्याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल
जर ते नाव वारस म्हणून किंवा भोगवटादार म्हणून किंवा भोगवटदाराचे वारस असा जर लागला असेल तर त्या व्यक्तीला आपल्या अविभाजित हक्क किंवा हिस्सा आहे तो विकता येईल पण समजा त्याला हक्क हितसंबंध मालकी स्वरूपाचं नाहीच आहे म्हणजे एखाद्याकडे जमीन गहाण आहे त्याचं नाव असेल किंवा एखाद्या कडे वहिवाटीचा हक्क आहे त्याचं नाव असेल तर अशा व्यक्तींना ती मालमत्ता किंवा त्यातला कोणताही भाग हा विकता येणार हे जवळपास अशक्य आहे
म्हणून इतर अधिकारात ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचे नाव का आहे? आणि कसा आहे? या प्रश्नाचा जोवर आपल्याला उत्तर मिळत नाही तोवर त्या व्यक्तीचे नक्की अधिकार काय आहे याची स्पष्ट कल्पना आपल्याला येऊ शकत नाही म्हणून आणि त्याचं नाव का लागलंय? कस लागलाय? त्याचा हक्क काय आहे याचा आधी आपण शोध घ्यावा. आणि तो एकदा का शोध लागला की व त्या अनुषंगाने पुढच्या सगळ्या प्रश्नांची उकल ही आपोआप होत जाईल.
चौथा प्रश्न-:हक्कसोडपत्र जर करायचा असेल तर हक्का सोडणाऱ्या व्यक्तीचे नाव सातबारावर असले पाहिजे का? उत्तर-: असं काहीही बंधनकारक नाही म्हणजे ज्या व्यक्तीने हक्कसोडपत्र करायचं त्याचं नाव आणि सातबारावर राहणार आणि मग हक्कसोडपत्र करा असं करण्याची अजिबात आवश्यकता नाही हक्कसोडपत्र म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेत मधील एखादा सहहिस्सेदार किंवा काही सहहिस्सेदार हक्क आणि हितसंबंध इतरांच्या प्रबद्धत सोडून देतात
तेव्हा त्याच्या करता आहे हक्कसोडपत्र केला जातो आणि मी हे अनेकदा सांगितले आहे की महसुल अभिलेखा मध्ये नोंद असणे किंवा नसणे ह्याने मालकी अधिकारावर काहीही फरक होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेत अधिकार आहे किंवा नाही त्याच्या करता आपण सातबारा किंवा इतर अभिलेखन विसंबून राहू नये
उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाची मिळकत आहे आणि त्याला समजा 3 वारस आहे.आणि त्या व्यक्तीच्या निधनानंतर समजा कुणाचीच नावावरून सातबारावर आलेली नाही मात्र दरम्यानच्या काळात दोन वारस आहे ते आपला हक्क हितसंबंध उरलेल्या एका वारसाला पूर्णपणे देऊन टाकायला तयार आहे तर अशा परिस्थितीत आधी त्या सगळ्या तिघांची वारस नोंद करायची तीनहीं नावं लावायची
आणि त्याच्यानंतर हक्कासोडपत्राचा पत्राचा अनुभवण्याचा असाही करता येऊ शकतो. किंवा आधीच हक्क सोड पत्र करून आपण थेट एकाच वारसाचे नाव लावू शकतो यात चूक किंवा बरोबर असा काही नाही.पण जर हक्कसोडपत्र नोंदणी करायचा जर विषय असेल तर सातबारावर नाव असल्याशिवाय नोंदणी होऊ शकत नाही अशी कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
पण जर आपल्याला हक्क सोड पत्र नोंदणी करायचं असेल त्या करता लोक तयार असतील तर केवळ सातबारावर नाव नाही म्हणून आपण तो वेळ दवडू नये आपण हक्कसोडपत्र करून घ्यावा आणि त्याच्या नंतर एकदा सर्वांची वारसनोंद घेऊन हक्कसोडपत्र यावर त्यांची नाव कमी करावी किवा थेट हक्कासोड पत्राच्या आधारे जो एक उरलेला वारस आहे त्याच्याच नावाची नोंद करावी. ह्या दोन्ही पैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता. दोन्ही पर्याय हे तेवढेच कायदेशीर आहेत.