ATM कार्ड धारकाच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांना मिळू शकते 20 लाखांपर्यंतची रक्कम. अगदी क्वचितच लोकांना आहे याबद्दल माहिती.

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आपल्या खातेदारांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये अकाउंट, कर्ज, डेबिट कार्ड याविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र बँकेकडून दिला जाणार्‍या अशा काही सुविधा आहेत ज्या विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. यापैकी एक सुविधा म्हणजे बँकेकडून दिला जाणारा मोफत विमा. होय तुम्ही बरोबर वाचलं!! मोफत विमा!! या विमा बद्दल सांगायचं झालं तर हा विमा अकाउंटच्या माध्यमातूनच नाही तर SBI ATM कार्डच्या माध्यमातून दिला जातो. वीस लाखांपर्यंतची रक्कम आपल्याला याद्वारे मिळू शकतो, ते ही अगदी फ्री. या लेखामद्धे आज आपण याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत.

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि त्या अनुषंगाने ही बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. यातील अनेक सुविधा सर्वसामान्य लोकांना माहीत असतात परंतु बऱ्याचशा सुविधा असतात त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. हा लेख लिहण्याचा आमचा उद्देश हाच आहे की सर्व लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचावी आणि त्याचा लाभ गरजवंतांना मिळावा. आता आपण पाहू की हा नेमका कोणता विमा आहे? तर मिळालेल्या माहितीनुसार या विम्याला ‘कॉम्प्लिमेंटरी विमा कव्हर’ असे म्हणतात.  या विम्याच्या माध्यमातून तुम्हाला वीस लाखांपर्यंत कव्हर मिळू शकते. विशेष म्हणजे या विमा साठी आपल्याला कुठेही अर्ज भरावा लागत नाही, कारण हा विमा आपल्याला डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड बरोबरच फ्री लागू झालेला असतो. वेगवेगळ्या डेबिट कार्ड प्रकारांवर वेगवेगळ्या विमा कव्हर मिळतो आता आपण पाहू की आजच्या घडीला कोणत्या कार्ड वर किती विमा कव्हर लागू आहे.

SBI गोल्ड मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड :  पहिला प्रकार आहे sbi गोल्ड मास्टर कार्ड किंवा विजा कार्ड. रस्ते अपघातासाठी २ लाखांचा विमा कव्हर या कार्डवर लागू असतो. तसेच हवाई अपघातासाठी ४ लाखाचा विमा कव्हर लागू असतो. यामध्ये रास्ते अपघात म्हणजे रस्त्यावर झालेला अपघात, (रस्त्यावर गाडी चालवताना वगैरे झालेला अपघात) आणि हवाई अपघात म्हणजे विमानात प्रवास करत असताना झालेला अपघात.

SBI प्लॅटिनम मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड : ATM चा दूसरा प्रकार आहे sbi प्लॅटिनम मास्टर किंवा व्हिसा कार्ड. या डेबिट कार्डवर विम्याची रक्कम ही गोल्ड कार्ड पेक्षा अधिक आहे. या कार्डवर रास्ते अपघातासाठी ५ लाख रुपये तर हवाई अपघातामद्धे मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला मिळू शकतो.

SBI सिग्नेचर मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड : ATM कार्डच्या या तिसर्‍या प्रकारात सर्वाधिक रक्कम ही मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला मिळू शकते. या प्रकारामध्ये रस्ते अपघातामद्धे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला १० लाख रुपये तर हवाई अपघातामद्धे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला २० लाख रुपये इतकी रक्कम विमा स्वरुपात मिळू शकते.

इतर बँकच्या ATM कार्डवर देखील असतो विमा : मित्रांनो आत्तापर्यंत आपण SBI मधील काही प्रकारच्या ATM कार्ड संबंधी माहिती आत्ता वाचली. SBI मध्ये मिळणार्‍या इतर ATM कार्ड जसे की RuPay कार्ड, किंवा इतर बँकेतून मिळणार्‍या ATM कार्ड वर देखील हा विमा लागू असतो. यामध्ये बँक आणि ATM कार्ड यांच्यावर अवलंबून रु. ५० हजार ते रु. २ लाख इतकी रक्कम कार्ड धारकाच्या अपघाती मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांना मिळू शकते. तसेच अपघातामद्धे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास देखील विम्याची रक्कम ही त्या कार्ड धारकस मिळू शकते. त्यामुळे आजच आपल्या बँकेशी संपर्क साधून याबद्दल अधिक माहिती मिळवा.

या आहेत काही अटी : आपल्याला या विम्याचा क्लेम मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता देखील करावी लागते. यामध्ये पहिली अट अशी आहे की अपघाती मृत्यू होण्याच्या आधी ९० दिवसात आपले डेबिट कार्ड एकदा तरी वापरलेले असावे. मग ते कुठेही वापरले गेले असू शकते ( एटीएम मशीन मध्ये, POS मशीन मध्ये किंवा ऑनलाइन शॉपिंग साठी).  इथे नव्वद दिवस मोजताना आर्थिक वर्षाचे गणित लक्षात तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तसेच विमान अपघाताबाबत दुसरी अट अशी की, विमानाच्या तिकीटाचे पैसे हे त्या ATM कार्ड द्वारे भरले गेले पाहिजे.

सर्वात महत्वाची अट म्हणजे, अपघात झाल्यापासून ९० दिवसांच्या आतमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी क्लेम साठी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सर्व महत्वाचे कागदपत्र (जसे की वारस प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र इ.) हे अपघात झाल्यापासून ६० दिवसांच्या आतमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

भारतामध्ये व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, माइस्ट्रो कार्ड, रुपे कार्ड असे विविध ATM/डेबिट कार्ड विविध बँकद्वारे आपल्या ग्राहकांना दिले जाते. जवळपास सर्वच कंपन्या कमी जास्त प्रमाणात आपल्या ग्राहकांना हा अपघाती विमा देतात, परंतु याबाबतची लोकांना माहिती नसल्या कारणाने याबाबत खूप कमी प्रमाणात क्लेम होतात. या गोष्टीमुळे बरेच गरजू लोक हे आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहतात. त्यामुळे आजच आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता. पुढे गरजेच्या वेळी या पैशांची मदत कुटुंबीयांना होऊ शकते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा