एखाद्या दिवाणी दाव्याचे आपल्याला समन्स मिळाले तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणत्याही न्यायालय मध्ये जेंव्हा दिवाणी दावा दाखल होतो तेव्हा त्या दाव्या मधील प्रतिवादींना त्या दाव्याच्या कामकाजा करता हजर राहण्याकरता म्हणून समन्स पाठवण्यात येते. असे समन्स मिळाले की काय करायचं? असतं प्रत्यक्षात ते कामकाज कसं चालतं? कुठल्या कुठल्या पर्याय आपल्याकडे असतात? याची आपण या लेखाद्वारे थोडक्यात माहिती घेऊ.

सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कोणताही दावा एकदा दाखल झाला की त्या दाव्या मधील प्रतिवादींना त्यांचं म्हणणं मांडण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. तो अधिकार वापरता यावा म्हणून कोणत्याही दाव्याच्या सुनावणीला आणि कामकाजाला हजर राहण्याकरता त्या प्रतिवादींना समन्स पाठवण्यात येते. आता असे समन्स जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण त्या दाव्याच्या कामकाजा करिता उपस्थित राहणं हे अपेक्षित असते. मात्र दिवाणी न्यायालय मध्ये किंवा दिवाणी दाव्या करता एखाद्या प्रतिवादीला स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेलच असं नाही. सर्वसाधारणतः दिवाणी दाव्यामध्ये प्रतिवादी हा स्वतः, त्याच्या प्रतिनिधीमार्फत किंवा वकिलामार्फत सुद्धा त्या दाव्यामध्ये हजर होऊ शकतो.

स्वतः हजर व्हायचं म्हणजे स्वतः तिथे न्यायालयात जायचं, प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत हजर व्हायचं म्हणजे आपल्या तर्फे आपला प्रतिनिधी किंवा आपण ज्यांचा वकालतनामा सही केलेला आहे असे वकील साहेब आपल्या तर्फे त्या न्यायालयामध्ये हजर होतात. आता काही वेळा असं होतं की आपल्याला समन्स मिळतं त्याची तारीख येते आणि आपण दरम्यानच्या काळात वकिलाची नेमणूक केलेली नसते, किंवा आपला वकील तिथे उपलब्ध नसतो किंवा आपल्या वकीलाच्या नेमणुकी करता काही कालावधी हवा असतो. अशा परिस्थितीत त्या समन्स मध्ये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला त्या न्यायालयामध्ये हजर राहून आपण आपल्याला वकील नेमणुकी करता कालावधी मिळावा असा अर्ज करू शकतो आणि बहुतांश वेळेला आपल्याला वकिलाच्या नेमणुकी करता म्हणून कालावधी हा निश्चितपणे मिळू शकतो.

आपल्याला समन्स मिळाल्या नंतर काय करावे? : जेंव्हा आपल्याला समन्स मिळतं तेव्हा त्या समन्स बरोबर दावा आणि त्यासोबत जोडलेली सगळी कागदपत्र मिळणं अपेक्षित असतं. बहुतांश वेळेला आपल्याला या कागदपत्रांसकट सगळ्या प्रति मिळतात पण काही वेळेला जर आपल्याला समन्स बरोबर कागदपत्र मिळाले नसतील, तर आपण जेव्हा न्यायालयात हजर व्हाल तेव्हा न्यायालयाच्या निदर्शनास आपण हे आणून दिलं पाहिजे. न्यायालयास सांगावे की मला दावा किंवा कागदपत्र किंवा दोन्ही समन्स बरोबर मिळालेले नाही. ती कागदपत्र पुरवण्याचे आदेश किंवा निर्देश वादीला देण्यात यावेत याबद्दल न्यायाधीश करतील. कारण जोवर आपल्याकडे दावा आणि त्याला जोडलेली कागदपत्रे उपलब्ध होत नाही तोवर त्या दाव्याला आपण जबाब किंवा कैफियत देणं हे जवळपास अशक्य आहे.

आपल्याला कैफियत किंवा जबाब देण्याची मुदत आहे त्या मुदतीत कैफियत दाखल करण्या-करता आपल्याकडे ती कागदपत्र असणे अश्यक आहेत. जेवढ्या कालावधी करता आपल्याला ती कागदपत्रे उपलब्ध नव्हती तेवढी मुदत वाढवून मिळण्याकरता किंवा आपला जो विलंब होईल तो माफ होण्याकरता या गोष्टीचा उपयोग होतो. म्हणून आपल्याला कागदपत्र जर मिळाले नसतील तर ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे.

आता आपल्याला समन्स मिळाल्यापासून आपलं म्हणणं किंवा जबाब देण्यासाठी किती मुदत असते? तर ते साधारण 90 दिवसांची मुदत असते. पण आपल्याला थेट 90 दिवसांची मुदत नियमानुसार मिळत नाही. दिवाणी प्रक्रिया संहिता मधील तरतुदीनुसार पहिल्यांदा समन्स आपल्याला मिळाल्यापासून 30 दिवसांची मुदत असते आणि त्याच्यानंतर 60 दिवसांपर्यंत ची मुदत आपल्याला मिळू शकते. ही मुदत आपल्याला समन्स मिळालेल्या तारखेपासून सुरू होते.  समजा आपल्याला एक तारखेला समन्स मिळाले, पंधरा तारखेला त्याची पहिली सुनावणी झाली. तर आपले 30 दिवस हे  15 तारखेपासून सुरू न होता, 1 तारखेपासून सुरू होत असतात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की पहिल्या तारखेपासून अंतिम मुदत सुरू होते, तर तसं नाहीये. ज्या दिवशी आपल्याला समन्स मिळते त्या दिवशी पासून आपली 90 दिवसांची मुदत सुरू होत असते. आणि त्या मुदतीमध्ये आपण जबाब किंवा कैफियत देणं अपेक्षित असते. आणि समजा त्या मुदतीत आपण जबाब किंवा कैफियत नाही देऊ शकलो तर मुदतीनंतर कैफियत देण्याकरता आधी विलंब माफीचा अर्ज देणं हे अत्यंत आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे .

समन्स मिळाल्या नंतर पुढे काय? :  समजा आपल्याला समन्स बऱ्यापैकी आधी मिळाले. तारखेला आठ-पंधरा दिवसाचा कालावधी असेल तर आपण स्वतः किंवा वकिलाची नेमणूक करून त्या दावा आणि कागदपत्रांचा अभ्यास करून आपला सविस्तर जबाब/कैफियत तयार करावा आणि पहिल्याच तारखेला जबाब आणि कैफियत सह न्यायालयात हजर राहावं .आणि ती दाखल करून टाकावी. उगीचच वेळकाढूपणा करण्याचा तसं काही कारण नसते आपल्याला जर मुदतीत म्हणजे बर्‍यापैकी वेळ असताना संबंधित कागद पत्र मिळाले असतील तर आपण लगेचच जबाब किंवा कैफियत दाखल करून त्या दाव्याचे कामकाज लवकरात लवकर सुरू करून घ्यावं. ते आपल्याला निश्चितपणे फायदेशीर ठरते.

काही वेळा असंही घडतं की, समन्स आपल्याला कोर्ट कामकाजाच्या 1-2 दिवस आधी मिळते. अश्या परिस्थिति स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत त्या न्यायालयात हजर राहून लेखी कैफियत दाखल करण्यासाठी कोर्टाकडून अधिकचा वेळ मागून घ्यावा. जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिवादींना हा अधिकचा वेळ देण्यात येतो. परंतु पुढील दिलेल्या तारखेस आपला जबाब दाखल होईल याची आपण काळजी घेणे न्यायाच्या दृष्टीने योग्य ठरते.

वेळेत कैफियत दाखल न केल्यास? : आपण वारंवार न्यायालयाकडून वेळ घेऊन देखील कैफियत दाखल न केल्यास या घटनेचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळेला आपल्या विरुद्ध आदेश होऊन दावा एकतर्फी चालवला जाऊ शकतो. त्यामुळे आपले नुकसान होण्याची डाट शक्यता आसते. त्यामुळे 90 दिवसांच्या आतमध्ये कैफियत दाखल करणे योग्य ठरते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा