13 अपहरण, 9 खुन………… या मायलेकींच्या कृत्याने उभा महाराष्ट्र हादरला होता

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

स्त्रीच्या अनेक मनोहारी रुपांपैकी एक म्हणजे आईचं रुप. प्रत्येक स्त्रीच्या मनात कुठेतरी मातृत्वाचा ओलावा असतोच. लहान मुल, त्याच्या बाललीला प्रत्येकालाच मोहून घेतात. पण काही अशाही महिला आहेत ज्या एकेकाळी लहानग्यांच्या जीवावर उठल्या होत्या. संपुर्ण देशात ज्यांच्या अमानुषपणाची चर्चा झाली होती त्या गावित बहिणींच्या शिक्षेबाबत नुकतीच बातमी समोर आली.

या दोघी बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. या निकालाने सर्वसमान्य जनतेने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आताच्या पिढीला या मायलेकींबाबत फारसं माहिती नसेल. पण नव्वदीच्या दशकात हे हत्याकांड समोर आल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली होती. या हत्याकांडाची पार्श्वभूमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दोन अयशस्वी लग्नानंतर अंजना गावित या महिला आणि तिच्या दोन मुलींनी चोरी-मारी करत जगायला सुरु केलं.

 

Renuka Shinde-Seema Gavit, who digested the murder of 42 children, will have a future, sisters struggle to avoid hanging | Bombay High Court to Decide on Renuka Shinde Seema Gavit Death Sentence

पाकीट मारी, बॅग पळवणं, दागिने, पैसे यावर हात साफ करणं यात अंजना बाई सह रेणुका आणि सीमा तरबेज झाल्या. लहान मुलांना हत्यार म्हणून पुढे केल्यास चोरी सहज पचली जाते हे यां दोघींना समजलं त्यातूनच पहिला बळी गेला संतोषचा. कोल्हापुर बसस्थानकातून या मायलेकींनी एका भिकारी महिलेचा दिड वर्षाचा मुलगा संतोष याचं अपहरण केलं. या दरम्यान पुन्हा एकदा चोरी करताना सीमा पकडली गेली.

अंजनाबाईने गर्दीचा फायदा घेत संतोषला जमिनीवर आदळले. दुखापत झाल्याने संतोष रडू लागला. त्याचा फायदा घेत तिने सीमाची सुटका करुन घेतली. पण रात्र झाल्यावर तिच्यातील अमानुषपणाला उत आला. सतत रडत असलेल्या संतोषला तिने मारण्याचं ठरवलं. एका क्षणात तिने संतोषच तोंड दाबून त्याला लोखंडी बारवर आपटलं. चिमुकल्या संतोषने तिथेच जीव सोडला.

त्याला तिथेच सोडत या सगळ्यांनी तिथून पळ काढला. विशेष म्हणजे रेणुका आणि सीमा या दोघींनी लहानगी सावत्र बहीण क्रांती हिचाही खुन केला होता. या विकृत माय-लेकींनी आजवर जवळपास 13 लहान मुलांचं अपहरण केलं आहे. तर त्यातील 9 मुलांची अमानुष हत्या केली आहे. त्यात अनेक मुलांचा भिंतीवर आपटून खून केला आहे. तर काहींची गळा दाबून हत्या केली.

अतिशय थंड डोक्याने त्यांनी या सगळ्या हत्या केल्या. त्यापैकी केवळ 7 मृतदेह मिळाले तर उर्वरित 2 मृतदेहांचा अजूनही तपास लागू शकला नाही. तर त्यांच्या तावडीतून जवळपास 4 मुलांचा जीव वाचला. या तिघींनी नऊ महिन्यापासून ते पाच वर्षांच्या बालकांचा अमानुष खुन केला. विशेष या केसच्या संपुर्ण सुनावणी दरम्यान या तिघींच्य चेह-यावरही पश्चातापाचा साधा लवलेशही नव्हता. या दरम्यान अंजनाबाईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रेणुका आणि सीमाची फाशीची शिक्षा योग्य वेळी अंमलबजावणी न झाल्याने रद्द झाली आहे. याबाबतचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “13 अपहरण, 9 खुन………… या मायलेकींच्या कृत्याने उभा महाराष्ट्र हादरला होता

Comments are closed.