आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासासाठी महत्वाचा असा ई-पास (E- PASS) कसा काढायचा याबद्दल महत्वाची माहिती या लेखातून जाणून घ्या !

प्रवास बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

गेल्या लॉक डाऊन च्या काळात राज्य सरकारने आपत्कालीन किंवा अत्यावश्यक परिस्थितीमध्ये प्रवासासाठी, ई- पास सक्तिचा केला आहे. त्यामुळे आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवास आता ई-पास असला तरच करता येणार आहे. ई-पास साठी पोलीस विभागाकडून covid19.mhpolice.in ही लिंक देण्यात आलेली आहे.

या लिंकवरून संबंधितांनी पास साठी अर्ज करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. याशिवाय जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन देखील ई-पास मिळवता येणार आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे.

अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. हा ई-पास कसा काढायचा या संदर्भात माहिती पाहुयात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध अधिकाधिक कठोर केलेले आहेत. यामध्ये अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या वर कायदेशीर कारवाई तर केली जाणार आहे.

त्या शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी एका जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी आता पास बंधनकारक करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून हे पासेस दिले जात आहेत. covid19.mhpolice.in हे जर आपण आपल्या कंप्युटर वर टाईप केलं तर ही माहिती आपल्यासमोर उपलब्ध होते.

आणि हा आहे covid-19 ई-पास फोर इंटरेस्टेड अँड इंटर डिस्ट्रीक्ट ट्रॅव्हलिंग. यामध्ये सुरुवातीला बारा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना बघूनच आपल्याला पुढे आप्लाय करावा लागतो आहे. कारण यामध्ये संपूर्ण माहिती ही खरी आणि व्यवस्थित माहिती भरणे अपेक्षित आहे.

यामध्ये आपला फोटो देखील लागणार आहे. त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट्स देखील द्यावे लागणार आहेत. म्हणजे आपल्या गाडीचा क्रमांक काय आहे? किती प्रवासी आपल्या बरोबर प्रवास करणार आहेत? आपण कुठल्या कारणासाठी एका जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यामध्ये जाणार आहात?

त्याच बरोबर बाजूला एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो की, त्यानंतर तुम्ही हा संपूर्ण आपला फॉर्म फिल्ल करता. फॉर्म भरता त्यानंतर एक टोकन नंबर मिळतो. आणि हे टोकन नंबर च्या सहाय्याने आपल्याला इथे पास हा उपलब्ध होतो. पास डाउनलोड करावा लागतो. आणि इथेच पास ची सध्याची स्थिती काय आहे? हे कळत.

सुरुवातीला आपण बघुया की हा पास आपण कसा अप्लाय करायचा? हा पास कसा भरायचा? अप्लाय फॅर पास हेअर इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ऑप्शन तयार होतो. तो म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? इथे ऑप्शन आहे हो किंवा नाही.

आता सध्या आपण नाही हे ऑप्शन बघुया. इथे सबमिट करायचे आहे. हे केल्यानंतर पुढे एक फॉर्म आपल्याला दिसतो आहे. त्यामध्ये जिल्हा म्हणजे आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहोत? याबद्दलची माहिती येथे आपल्याला क्लिक करुन ही भरायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर काय आहे?

वाहनाचा प्रकार काय? म्हणजे आपली चार चाकी आहे? की प्रायव्हेट कार आहे? सेव्हन सीटर आहे का? किंवा पब्लिक बस आहे का? या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसाठी शेतकऱ्यांची जी काम आहेत, त्यासाठी देखील ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

खाली बघितले तर आपला ईमेल आयडी देखील यामध्ये आहे. ईमेल आयडी द्यायचा आहे. त्याचबरोबर प्रवासाचा अंतिम ठिकाणाचा पत्ता, म्हणजे आपल्याला नेमकं जायचं कुठे आहे? याची माहिती द्यायची आहे. त्याचबरोबर आपण परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात का? या संदर्भातील माहिती येस किंवा नो या स्वरूपात द्यायची आहे.

प्रवासाचे सुरुवातीचं ठिकाण कुठला आहे? शेवटचा ठिकाण कुठला आहे? आपला वाहन क्रमांक काय आहे? आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या साठी प्रवास करणार आहात त्या प्रवासात कारण काय? म्हणजे आपण अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करत आहे का?

आपण पब्लिक सर्व्हन्ट आहात, एखाद्या जवळच्या नातेवाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी आपण जात आहात, कोणाच्या लग्न कार्यात जात आहात, किंवा इतर काही कारणं आहेत. ही कारणं इथे आपल्याला भरणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखे पर्यंत आपला प्रवास आहे? ही माहिती द्यावी लागणार आहे.

त्याचबरोबर मगाशी जसं आपण म्हटलं की, प्रवासाचे कारण आहे ते इथे आपल्याला थोड विस्तारून द्यायचं आहे. नेमका कुठल्या कारणासाठी आपण प्रवास करत आहात? सध्याचा आपला पत्ता काय आहे? तो द्यायचा आहे. आणि प्रवासाचा अंतिम ठिकाण काय आहे? ते देखील आपल्याला येथे काढवायचं आहे.

त्याचबरोबर आपल्या बरोबर आपण एकटेच आहात, आपण दोघे आहात, आपल्या बरोबर किती जण प्रवास करत आहेत?याची माहिती पण द्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कंटेनमेंट झोन मध्ये आहात का? कारण सध्या कोरोणाचा काळ आहे. आपण सुपर स्प्रेडर देखील असू शकता. त्यामुळे आपण कंटेनमेंट झोन मध्ये आहात का?

ही माहितीदेखील इथे आपल्याला करणं अत्यंत बंधनकारक आहे. तिथे जर आपण माहिती भरली नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग प्रश्न उरतो की या सोबत कुठलेही कागदपत्र आपण द्यायची आहेत? आपला फोटो देखील येथे आपल्याला अपलोड करावा लागणार आहे.

त्याची साईज २०० kb च्यावर नसावी. त्याचबरोबर इतर काही महत्वाचे डॉक्युमेंट देखील आपल्याला इथे जोडावी लागणार आहेत. याचाच अर्थ एखाद्या मेडिकल कार्ड असेल, कंपनीचा कार्ड, आधार कार्ड असेल ही माहिती इथे देणे गरजेचे आहे.
आपण मेडिकल इमर्जन्सी साठी जर जात आहात.

जर वैद्यकीय उपचारासाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी जात आहात, तर इथे आपल्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट आपण तंदुरुस्त आहोत हेदेखील देणे गरजेचे आहे. किंवा आपण कुठल्या कारणासाठी जात आहोत यासाठी मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला जोडणे गरजेचे आहे.

एवढी सगळी माहिती आपण भरल्यानंतर येथे सबमिट ऑप्शन येतं. इथे सब्मिट केल्यानंतर आपला फॉर्म, आपली माहिती ही सब्मिट होते. त्यानंतर जे अधिकारी, ज्यांची नेमणूक या संपूर्ण पास वितरणासाठी करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून आपल्या माहितीची खातरजमा केली जाते.

आपली माहिती बरोबर आहे की नाही, हे तपासले जाते. आणि जर अधिकाऱ्यांना वाटलं की अमुक अमुक व्यक्तीला प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी, तर त्यांना हा पास मिळतो. याच वेबसाईटवर पास हा डाऊनलोड करायचा. आणि महत्वाच म्हणजे ज्या वेळेस आपण प्रवास कराल

त्या वेळेस सॉफ्ट आणि हार्ड कॉपी ही दोन्ही आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे जिथे पोलीस अडवतील तिथं त्यांना हे पास दाखवायचा. तरच आपला प्रवास हा सुखकर होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक लोकांनी बाहेर पडू नये. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.