तुमचा पगार एप्रिल महिन्यापासून होऊ शकतो कमी ।। वेळीच लावून घ्या बचतीची सवय ।। नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्वाची बातमी ।। जाणून घ्या कसे?

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कोरोना मुळे अनेकांचे रोजगार गेले, काहींचे कामाचे तास कमी झाले तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढलं नाही पण त्यांच्या पगारात कपात जरूर केली. 2021 च्या एप्रिल महिन्यापासून आपल्या पगारात आणखीन एक बदल होणार आहे.

या बदलामुळे तुमच्या माझ्या हातात आत्ता पेक्षा कमी पगार येईल. पण हे असं का होणार आहे? याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने The code on wages bill 2019 मंजूर केल होत ते लागू होणार आहे एप्रिल 2021 पासून. यामध्ये वेतनाची नवीन व्याख्या केली गेली आहे.

कामगारांच्या वेतनासंदर्भात किमान वेतन कायदा 1948, वेतन वाटप कायदा 1936, बोनस वाटप कायदा 1965 आणि समान मोबदला कायदा 1976 असे चार वेगळे कायदे अस्तित्वात आहेत. या चारही कायद्यांचं एकत्रित स्वतंत्र अस्तित्व संपून आता ते एक नवीन कायद्यामध्ये आले आहेत.

सध्या प्रत्येक राज्यात कामगारांना वेगवेगळे वेतन दिले जाते, कामगारांच्या वेतनाच्या व्याख्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत मात्र आता या नव्या कायद्यामुळे कामगारांच्या वेतनाची देशभर एकसमान व्याख्या होईल. आता या नवीन कायद्यात नेमका आहे तरी काय आणि त्याचा आपल्या वेतनावर कसा फरक पडणार आहे या बद्दलची माहिती आपण घेऊयात.

तर आता आपण या सर्व गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया: या कायद्यानुसार कामगारांना देण्यात येणारे भत्ते हे पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकणार नाही आहेत. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराची बेसिक आणि allowances असे वेगवेगळे भाग असतात.

साधारणपणे खाजगी कंपनी मध्ये एखाद्याचं पद जस वाढत जातं तसेच त्याचे भत्ते देखील वाढत जातात आणि बऱ्याचदा हे भत्ते हे पगारातून मिळणाऱ्या रकमेच्या निम्म्यापेक्षा जास्त असतं. बहुदा बेसिक सॅलरी कमी असते आणि भत्ते जास्त असतात. नवीन नियमानुसार बेसिक सॅलरी ही पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागणार आहे.

हा नियम लागू झाल्यानंतर आपलं पगारात बदल होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पगारातून पीएफ कापला जातो, तो आकारला जातो आपल्या बेसिक पगारावर. आणि कापला जाणारा पीएफ देखील त्यामुळे वाढणार आहे, म्हणजे तुमचा जास्त पीएफ कापला जाईल आणि तुमची कंपनी सुद्धा त्यांच्यातर्फे जास्त पीएफ जमा करेल.

जसं पीएफ बद्दल आहे तसेच ग्रॅज्युटी बद्दल सुद्धा आहे म्हणजे समजा जर एखाद्याचा पगार 50 हजार रुपये आहे आणि त्याची बेसिक सॅलरी आहे 15 हजार रुपये तर त्यावर बारा टक्के म्हणजे 1800 रुपये एवढा पीएफ कापला जाईल. हातात येणाऱ्या सध्याचा पगार असेल 48 हजार दोनशे रुपये परंतु आता नवीन नियमानुसार भत्ते हे पगाराच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त राहू शकत नाहीत.

त्यामुळे एखाद्याचा पगार 50000 असेल तर त्याची किमान बेसिक सॅलरी पंचवीस हजार रुपये असावी लागेल म्हणजेच आपल्या हातामध्ये येणारा पगार असेल 47 हजार रुपये तिकडे पहिला पगार 48 हजार दोनशे रुपये होत, तोच आता 47 हजार रुपये येईल म्हणजेच यावरून पाहिले तर बाराशे रुपये कपात होत आहे.

पण याची दुसरी बाजू म्हणजे जरी तुमच्या हातात कमी पगार येत असला तरी रिटायरमेंट नंतर आताच्या तुलनेत तुमच्या हातात जास्त पैसे येतील, कंपनीचे बोलायचं झालं तर खाजगी कंपन्यांना पुन्हा एकदा पगाराची आखणी करावी लागेल, त्याची ठेवण बदलावी लागेल, शिवाय कंपनीतला कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युटी देयक रक्कम सुद्धा वाढणार आहे.

त्यामुळे कंपन्यांसाठी हा वाढीव बोजाअसणार आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर या बदलाचा मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे पण या बदलामुळे जास्त सोशल सेक्युरिटी आणि रिटायरमेंटनंतर जास्त फायदे मिळतील असं तज्ञांचे मत आहे. त्यामुळे बचतीची सवय लावून आपल्या हातात येणाऱ्या रकमेचा योग्य ताळमेळ लावावा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.