असे 10 भारतीय ब्रँड जे भारतीय आहेत हे खूप कमी लोकांना माहिती आहे ।। जाणून घ्या अशा ब्रॅंड्सबद्दल महत्वाची माहिती !

अर्थकारण शैक्षणिक

आज सर्व भारतीयांचा चिनी वस्तूंचा वापर कमी करण्याकडे कल आहे. आज चिनी वस्तू भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून प्रत्येक भारतीय हा त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या वापर करतोच आहे. पण काही असे भारतीय ब्रँडस् आहेत जे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या डंका वाजवत आहे. त्याच ब्रँडस् विषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

▪️ रॉयल एनफिल्ड : तर आपल्या सर्वांची आवडती रॉयल एनफिल्ड म्हणजेच बुलेट पासून तसं बघितलं तर रॉयल एनफिल्ड ही एक ब्रिटिश कंपनी होती. सध्या त्याची मालकी आयशर या वाहने बनवणारे कंपनीकडे आहे. रॉयल एनफिल्डची सुरुवात 1891 साली उद्योजक बॉक्स स्मिथ आणि अल्बर्ट यांनी केली होती. 1949 ला मद्रास मोटर्सने इंग्लंडमधून बाईक्स इम्पोर्ट करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये रॉयल एनफिल्डचा समावेश होता. नंतर 1956 ला रॉयल एनफिल्ड भारतात असेंबल व्हायला लागली. पण जून 1970 ला रॉयल एनफिल्डची इंग्लंड मधील उत्पादन बंद पडले. त्यामुळे त्याचे उत्पादन भारतात झपाट्याने वाढले. आणि भारतातून रॉयल एनफिल्ड युरोप आणि इंग्लंडमध्ये निर्यात व्हायला लागल्या. अशातच त्या वेळेची ट्रॅक्टर आणि वाहने बनविणाऱ्या आयशर या कंपनीने रॉयल एनफिल्ड विकत घेतली. चेन्नई मध्ये बनणाऱ्या रॉयल एनफिल्डचे आज भारतात 900 तर जगात 600 स्टोअर आहेत.

▪️ एमआरएफ (MRF): आपल्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, एमआरएफ (MRF) हा ब्रँड. एमआरएफ म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी. आज टायर इंडस्ट्री मध्ये अग्रेसर आहे. एमआरएफ ला सुरू करणारे मेमन यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पण आज त्यांची कंपनी जगभर आपल्या टायरमुळे जगप्रसिद्ध आहे.

▪️ अमुल: तर अशा तऱ्हेने आपले लिस्टमध्ये पुढचा ब्रँड आहे, अमुल अमुलचा फुल फॉर्म आनंद मिल्क युनियन लिमिटेड. अमुल भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. दिवसाला 90 कोटी रुपये कमावणाऱ्या अमुल ब्रँडने भारताचे नाव जगभरात रोशन केले आहे.

▪️ कॅफे कॉफी डे: तर पाचव्या क्रमांकावर असणारा, कॅफे कॉफी डे हा ब्रँड तुम्हाला विदेशी वाटत असेल मात्र हा ब्रँड पूर्णपणे भारतीय आहे. 1996 सली सुरू झालेली सीसीडी (CCD) आज भारतभर पसरत आहे. भारताच्या 28 राज्यात सीसीडीचे 1534 पेक्षाही जास्त आउटलेट आहे. फेमस फॉरेन ब्रँडचे स्टारबक्स कॉफी, विंग कॉफी, आणि असे बरेच ब्रँड सुध्दा सीसीडीचे काही उखाडू शकले नाही. आणि आज सीसीडी जगभरात झपाट्याने पसरत आहे.

▪️ टाटा ग्रुप : तर आपल्या लिस्ट मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे, टाटा ग्रुप टाटा ग्रुप ही अशी प्रायव्हेट कंपनी आहे. जी प्रत्येक फील्डमध्ये पसरलेली आहे. रतन टाटांचे नेतृत्वाखाली ही कंपनी यशाची शिखरे चढत आहे. तुम्ही टायटन या कंपनीच्या घड्याळ बद्दल ऐकून तर असालच. टायटन हा ब्रँड सुद्धा टाटा कंपनीचाच एक भाग आहे. टायटन हा ब्रँड जगभरातील प्रसिद्ध ब्रँड पैकी एक ब्रँड आहे. आज जगभरात टायटनच्या वॉचचा वापर होताना दिसत आहे.

▪️ जग्वार कार: सातव्या क्रमांकाचा ब्रँड सुद्धा टाटा ग्रुप चा एक पार्ट आहे. जेव्हा पण आपण (jaguar car) जग्वार कार च नाव ऐकतो. तेव्हा तो आपल्याला एक विदेशी ब्रॅण्ड वाटतो. पण 2008 साली रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीकडून विकत घेतला. जग्वार प्रीमियम कार साठी प्रसिद्ध असून आज जगभरातील कार प्रेमींची एक ड्रीम कार आहे.

▪️ भारती एअरटेल : आपल्या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे, भारती एअरटेल भारतीय एअरटेल एक भारतीय कंपनी असून आज तिने जगभरात पाय रोवले आहेत. ही भारतीय मल्टिनॅशनल टेलिकम्युनिकेशन कंपनी भारता सोबतच 20 अन्य देशात तिची सेवा देते. तसेच भारतीय एअरटेल जगातील चौथ्या क्रमांकाची सबस्क्रायबर बेस असणारी कंपनी आहे.

▪️ थंमस् अप : तर आपल्या लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे, फेमस सॉफ्ट ड्रिंक कंपनी थंमस् अप पहिले तर थंमस् अप एक भारतीय ब्रॅंड होता. पण याची वाढती लोकप्रियता बघून सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका-कोलाने थंमस् अप ला विकत घेतले. पण आज ही थंमस् अप जगभरात फेमस आहे. तर आपण नऊ असे भारतीय ब्रँड बघितले. जे जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.

▪️ ऍलन सोली (Allen Solly ) : त्यांच्या कपड्यांचे वर्णन ‘फ्रायडे ड्रेसिंग’ किंवा आकर्षक ऑफिस वेअर असे केले जाते. ऍलन सोली ही आदित्य बिर्ला समूहाची उपकंपनी आहे आणि मदुरा गारमेंट्स अंतर्गत परवानाकृत आहे.

▪️ पीटर इंग्लंड (Peter England) : भारतातील सर्वात मोठ्या पुरूषांच्या कपड्यांपैकी एक, पीटर इंग्लंडचे नाव इंग्रजी आहे, मात्र प्रत्यक्षात, हा आदित्य बिर्ला नुवो लिमिटेडचा विभाग असलेल्या मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइलचा भाग आहे.

त्यासोबतच कपडे क्षेत्रातही असे अनेक ब्रँड आहेत कि जे आपल्याला विदेशी वाटतील मात्र ते भारतीय आहेत. तुम्हालाही असे काही ब्रॅण्ड्स माहित असतील तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा !