‘Work from home’ करताय ? या चुका आवर्जून टाळा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

करोनामुळे आपण सगळेच काही काळापुरते का होईना चार भिंतींच्या आत कैद झालो होतो. करोनाने कही क्षणातच हसत्या-खेळत्या माणसांना मास्कच्या बुरख्याआड जाण्यास भाग पाडलं. लहान-मोठा, गरीब- श्रीमंत असा कोणताही भेद करोनाने केला नाही. करोनामुळे Work from home चं कल्चर सगळीकडे रुजवलं आहे. गेले जवळपास दोन वर्षांपासून प्रत्येकजण Work from home शी बांधला गेला आहे. अशा वेळी काही टिप्स वापरुन तुम्ही हे काम सुसह्य बनवू शकता.

काम करताना तुम्ही लॅपटॉप स्वत:पासून किती लांब ठेवता हे देखील महत्त्वाचं आहे. खरं तर तुमच्या आणि लॅपटॉपमध्ये जवळपास एक हाताचं अंतर असणं गरजेचं असतं. यापेक्षा जवळ लॅपटॉप ठेवत असाल तर अनेक आजारांना आमंत्रण देत आहात हे नक्की.

लॅपटॉपवर सतत काम करुन हात आखडले जातात. अनेकदा बोटं सुंद होणं, खांद्यांवर ताण येणं असं घडताना दिसतं. अनेकदा यामुळे कारपल टनल सिंड्रोम या सारखे आजार जडण्याची शक्यता असते.

Does work from home really work?

 

हे घडू नये म्हणून टाईपिंग करताना मधून मधून हात आणि बोटांचं स्ट्रेचिंग करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय टाईप करताना हात, खांदे बोटं यावर अनावश्यक ताण येत नाही ना, याची काळजी घ्या.

हाताप्रमाणेच स्क्रीनशी जास्तीत जास्त वेळ जोडलेली गोष्ट म्हणजे डोळे. लॅपटॉपवर काम करताना डोळे जळजळणे, डोळे थकणे, सतत पाणी येणं हे प्रकार तुमच्या आमच्यासोबत अनेकदा घडतात.

अनेकदा हा प्रकार वाढत जाऊन Computer vision syndrome ची लक्षणं दिसू लागतात. हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरुन नजर हटवून इतर कोणत्याही गोष्टीकडे थोडावेळ पाहा. अनेकदा स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याची शक्यता असते.

 

59% employers in India not in favour of 'work from home', says report

अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्सचा वापर करावा. यामुळे कोरडेपणाची तक्रार कमी होऊन इतर डोळ्यांचे विकार टाळता येतात. लॅपटॉपवर काम करताना पाठीला मानेला योग्यप्रकारे आधार देण्याची गरज असते. नाहीतर अनेकवेळ एकाच स्थितीत राहून तेथील मांसपेशी आखडण्याची शक्यता असते.

अनेकदा हा प्रकार वाढत जाऊन सर्वायकल स्पॉडियालयटिसकडे झुकू लागतो. हे होऊ नये यासाठी खांद्यांना सतत एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ न ठेवतात. मधून मधून सैलपणा द्यावा. अथवा ब्रेकमध्ये हलक्या बोटांनी केलेला मसाजही यावेळी फायदेशीर ठरू शकतो. तसेच वाकून न बसता पाठीला योग्य तो आधर देऊन बसणं कधीही योग्य आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.