बचत गट भाग-3 ।। बचत गटाचे उद्योग कोणते किंवा बचत गटाने कोणते कोणते उद्योग करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

स्वयंसाहाय्यता म्हणजे बचत गटाचे उद्योग कोणते किंवा बचत गटाने कोणते कोणते उद्योग करावे: उद्योगाची वर्गवारी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे केली जाते. जसे की निर्मिती उद्योग, सेवा उद्योग आणि व्यापार.

१) निर्मिती उद्योग: ज्या उद्योगांमध्ये कच्चा मालाचे रूपांतर पक्या मालात होते आणि हे रूपांतर यंत्राच्या साहाय्याने किंवा मनुष्यबळाच्या साह्याने केले जाते त्याला निर्मिती असे म्हणतात. उदाहरणार्थ मसाला तयार करणे, मेणबत्ती तयार करणे, अगरबत्ती तयार करणे असे उद्योग करू शकतो.

2) सेवा उद्योग: या उद्योगात ग्राहकांना एखादी सेवा नफ्याच्या हेतूने पुरवली जाते अश्या उद्योगांना आपण सेवा उद्योग म्हणतो. उदाहरणार्थ पोळी भाजी केंद्र. हे उद्योग आपण सेवा उद्योगांच्या मार्फत करू शकतो.

3) व्यापार: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह म्हणजेच बचत गट मोठ्या बाजारपेठेतून होलसेल दरामध्ये माल खरेदी करतो आणि तो माल किरकोळ म्हणजेच रिटेल दरा मध्ये नफा मिळविण्याच्या हेतूने विकतो त्याला व्यापार असे म्हणतात. उदाहरणार्थ किराणा दुकान, कपड्याचे दुकान, खत व बी बियाण्याचे दुकान इत्यादी.

या वर्गीकरणा अंतर्गत बचत गटातील महिलांना खलील उद्योग करता येतील: भाजी विक्री केंद्र सुरू करणे, पोळी भाजी केंद्र सुरू करणे, रेशन दुकान चालवणे, लग्नकार्याचे साहित्य भाड्याने देणे, लग्न कार्याच्या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट घेणे, कुकुट पालन करणे, बंदिस्त शेळी पालन करणे, सेंद्रिय खत निर्मिती करणे, झेरॉक्स सेंटर चालवणे आणि असे बरेच उद्योग आहेत जे आपण बचत गटाच्या अंतर्गत करू शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.