भाड्याच्या घरात राहणारा आमदार तुम्ही पहिला आहे का? होय हे खरं आहे सर्वांचे आदरणीय शेतकरी नेते ‘आ. बच्चू कडू’ यांचा जीवनप्रवास !!

लोकप्रिय शेती

नामदार, आमदार, नेते म्हटलं की त्यांच्या कडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन बनला आहे, एक समज तयार झाला आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासात या दृष्टिकोनाला छेद करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा, या गैरसमजाला दूर करत, त्याला खोट ठरवणार एक व्यक्तिमत्त्व, असा एक आमदार आहे माती शी नाळ आणि जनसेवेला आभाळ मानणाऱ्या या व्यक्ती च  नाव आहे नामदार बच्चू कडू.

जी माणसे यांना भेटतात यांची काम करण्याची पध्दत पाहतात, ती माणसे कोणत्याही जातीची असो, धर्माची असो व कोणत्याही पक्षाची असो बच्चू भाऊंचे चाहते बनतात, त्यांच्या प्रेमातच पडतात. कारण संपूर्ण महाराष्ट्राला आपला मतदार संघ मानणारा, त्यांच्या साठी काम करणारा एकमेव नामदार म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा तालुका चांदुर बाजार, जिल्हा अमरावती येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. इंदिरा कडू व बाबाराव कडू असे त्यांच्या आईवडिलांची नावे आहेत.

एकूण सहा मुले आणि पाच मुली असलेल्या बाबाराव आणि इंदिरा कडू यांचे बच्चूभाऊ हे दहावे अपत्य आहेत. आईवडिलांनि त्यांचे नाव ओमप्रकाश ठेवले तर त्यांच्या मामांचे ते खूप लाडके त्यांचे नाव बच्चू असे ठेवले. आणि संपूर्ण महाराष्ट्राला बच्चू भाऊ मिळाले, आजोबांपासूनच घराचा व्यवसाय हा म्हशी संभाळून दूध विकणे हा होता, हा वसा आणि वारसा मिळालेले बच्चू भाऊ कॉलेज ला जाऊ लागले.आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थांच्या प्रश्नांवर लढणारा एक नेता भेटला.

कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी ची निवडणूक बच्चूभाऊ लढले ती त्यांची पहिली निवडणूक होती. आणि तिथे ते निवडुन देखील आले, पुढे शैक्षणिक जीवन संपल्यावर बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी लढू लागले. पण एक नुकतंच कॉलेज संपलेले नवख पोरग एवढीच त्यांची ओळख पुढाऱ्यांना वाटायची. पण श्वासात आंदोलन भिडलेला हा तरुण शेतकऱ्यांसाठी लढू लागला. एका वर्षी अमरावती जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे हफ्ते थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केले.

यावेळेस बच्चूभाऊ यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनानाने सर्वांनाच घाम फोडला, हे आंदोलन होत बँकेत सुतळी सुतळी बॉम्ब फोडून केलेलं अभिनव आंदोलन या तरुण आंदोलकाच्या आंदोलनानाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत मिळाले. या घटनेमुळे परिसरात बच्चूभाऊ यांच्या नैत्रुत्वावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.

घरून मिळलेल्या सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद याचा वापर करून त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली. आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावाच्या देखील समस्या सोडवू लागले. त्याचदरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणूकितही बच्चू कडू निवडुन आले. त्यावेळी सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली, शौचालय योजनेचा एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी त्यावेळी उघडकीस आणल्याने  राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला च त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होऊ लागले, अपंग बांधवांसाठी च्या सायकली च्या महत्वाच्या प्रस्तावाबाबत त्यांच्यावर कुरखोडीचे राजकारण झाले, त्यानंतर स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.

यानंतर अपंग, वृद्ध, विधवा,आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटना काढली. १९९९ साली विधानसभा निवडणुकित अचलपूर विभागातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी महाराष्ट्र भर अनेक गाजवणारी आंदोलने केली त्यांचा जोरावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत मतांनी विजय झाला. परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी आहे असे त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते यांना सांगून ठेवले व आपले समाजकार्याचे काम चालू ठेवले.

२००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वर्षे ते अपक्ष आमदार म्हणून निवडणूक आले. मतदार संघ, जात-पात, धर्म याचा विचार न करता कोणताही लाभ नसताना बच्चूभाऊ कडू संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी जे प्रभावी कार्य  करतात त्याला तोड नाही. अपंगांच्या प्रश्नसाठी मागच्या वर्षी त्यांनी दिल्लीमधील महाराष्ट्र सदरच ताब्यात घेतले, शेवटी केंद्रासरकारला देखील नमते घेत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. आजच्या महाराष्ट्रात स्वतः मतदार संघ सोडून, दिव्यांग, विधवा, अबला, अनाथ आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चूभाऊ हे एकमेव नेते आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला उमेदवारी देऊन त्यांनी शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेगळ्या व लोकशाही पद्धतीने वेधून घेतले. २०१९ साली महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि महा आघाडीचा जन्म झाला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले, यामध्ये आनंदाची बाब म्हणजे शेतकरी पुत्र  दिव्यागांचा तारणहार बच्चूभाऊ कडू यांना जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास, शालेय शिक्षण महिला व बालविकास, इतर मागासवर्ग.

सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व  कामगार  कल्याण या खात्यांचा राज्यमंत्री पदी नियुक्ती झाली. आपल्या मंत्रिपदाची शपथ घेताना देखील त्यांनी एक वेगळी छाप सोडली, आपल्या मंत्रिपदाचा जनतेला पुरेपूर फायदा व्हावा म्हणून बच्चूभाऊ जीवाचं रान करताना दिसुन येतात. त्यांच्यात कधीच आमदारकीचा किंवा आज असलेल्या  मंत्रिपदाचा अविर्भाव किंवा डामडौल दिसला नाही. ते शेतकरी बांधवाना, दिव्यांगांना आपल्यातील एक वाटतात असा नेता म्हणजे महाराष्ट्राला अभिमानाची बाब आहे.