बक्षीस पत्रामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्ती कशी करायची? आणि बक्षीस पत्र जर रद्द करायचं असेल तर ते कस करायचं? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

बक्षीस पत्रामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्ती कशी करायची? आणि बक्षीस पत्र जर रद्द करायचं असेल तर ते कस करायचं? उत्तर: आता पहिल्यांदा आपण दुरुस्त कस करायच हा प्रश्न बघू. सर्व साधारणत: तुमच्या कोणत्याही कराराची नोंदणी करण्यापूर्वी आपण त्या कराराची माहिती त्या इंडेक्स टू ची माहिती ही योग्य प्रकारे भरलेली आहे किंवा नाही. हे पुन्हा एकदा निश्चित पणे आपण ते तपासावे.

जेणे करून त्या करारामध्ये काही चूक असेल तर तर त्या कराराच्या नोंदणी पूर्वी आपल्याला ती चूक दुरुस्त करता यावी.मात्र काही वेळेला काळजी घेऊन सुद्धा जर आपल्याला नोंदणीकृत करारामध्ये काही चूक राहून गेल्यास तर त्याच्या करिता त्या चुकांच्या दुरुस्ती करता चूक दुरुस्ती पत्रक करणे हा एक उत्तम पर्याय किंवा उपाय आहे.

जेव्हा कोणत्याही नोंदणीकृत करारामध्ये किंवा नोंदणीकृत कराराच्या इंडेक्स टू मध्ये काही तांत्रिक किंवा क्लरिकर चुका होतात तेव्हा त्या चुका दुरुस्त करण्याकरिता बक्षीस पत्र किंवा कोणत्याही करारामध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्ती जिथे मूळ करार नोंदणीकृत झालेला आहे त्याच रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये चूक दुरुस्ती पत्रक अर्थात डीड ऑफ करेक्शन याची नोंदणी करू शकतात आणि या डीड ऑफ करेक्शन द्वारे आधीच्या नोंदणीकृत करारामध्ये म्हणजे मूळ करारामध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर ह्या डीड ऑफ करेक्शन ने त्या चुकांची दुरुस्ती होते.

बक्षीस पत्र रद्द कस करायच? उत्तर : आत्ता बक्षीस पत्र किंवा खरेदी खत याचा जर आपण कायदेशीर दृष्टीने विचार केला तर बक्षीस पत्र आणि खरेदी खत याची ज्या क्षणी नोंदणी होते त्याच क्षणी ती मालमत्ता एकाकडून दुसऱ्या कडे हस्तांतरित होते. त्याची मालकी एका कडून दुसऱ्या कडे जाते त्यामुळे बाकी जसे करार असतात,

उदा. लिव्ह अँड लायसन्स करार असेल, लिज चा करार असेल, साठे करार असेल म्हणजे असे करार ज्याने मालकी हस्तांतरित होत नाही. असे करार जर आपल्याला रद्द करायचे असतील तर ते आपण रद्द लेख किंवा डीड ऑफ कॅन्सललेशन ह्या द्वारे करू शकतो. मात्र बक्षीस पत्र किंवा खरेदी खत जिथे मालमत्तेचे हस्तां तरण होवून गेलेलं आहे.

तिथे त्याच रद्द लेख किंवा दीड ऑफ कॅन्सललेशन करणे हे योग्य पर्याय ठरत नाही. त्याच्या करिता एकतर आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयाचा आदेश किंवा ते रिव्हर्स करण्याकरिता म्हणजे बक्षीस पत्र आणि खरेदी खतानी जे झालेलं आहे ते जर आपल्याला उलट करायचं असेल तर ते उलट करणार बक्षीस पत्र किंवा खरेदी पत्र नव्याने आपल्याला करावं लागेल.

जे झालेलं आहे ते बक्षीस पत्र किंवा खरेदी खत हे आपल्याला डीड ऑफ कॅन्सललेशन द्वारे रद्द करता येणार नाही. म्हणून बक्षीस पत्र किंवा खरेदी पत्रक करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचा दहा वेळा विचार करावा कारण एकदा का त्याची नोंदणी झाली की ते रद्द करणे हितक सोप्प काम नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.