सरकारी नियमानुसार आपल्या जागेत किती मजली बांधकाम करता येते?।। किती स्क्वेअर फुट चे बांधकाम करता येते याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे? ।। FSI म्हणजे काय? ।। FSI कसा कॅल्क्युलेट करायचा? यासंबंधीची ही पूर्ण माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण जर आपल्याला एखादे बांधकाम करायचं असेल तर सरकारी नियमानुसार आपण आपल्या जागेमध्ये किती फुटाचे बांधकाम करू शकतो किंवा किती मजली बांधकाम करू शकतो. ते कसं ठरवलं जातं? त्या साठी कोणती पद्धत वापरली जाते? त्यासंबंधीची पूर्ण माहिती पाहणार आहोत.

यामध्ये आपण FSI वरून आपल्या बांधकामाचे क्षेत्र किती असणार हे कसं ठरवलं जातं ते पाहणार आहोत. यासंबंधीची पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. जेव्हा आपण पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे आपल्याला ५0 ते ६0 मजली इमारती पाहायला मिळतात.

पण जर आपण सांगली, सातारा, अमरावती या सारख्या ठिकाणी असलो तरी आपल्याला १५ ते २० मजली जास्तीत जास्त पाहायला मिळतात. पण जर आपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा सर्वसाधारण ठिकाणी बघितले तर जास्तीत जास्त चार ते पाच मजली इमारती आपल्याला पाहायला मिळतात.

आणि आपल्याला कारण सांगितले जाते की ते चार मजली पेक्षा किंवा पाच मजली पेक्षा जास्त बांधकाम करायला परवानगी नाही किंवा येथे या पेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही. शासनामार्फत आपल्याला एक मर्यादा ठरवून दिलेली असते. किती जागे मध्ये किती बांधकाम करायचं ते आपल्याला ठरवून दिले जाते.

यासाठी काय केलं जातं तर FSI कॅल्क्युलेशन केल्या जाते. FSI म्हणजे नक्की काय ते सुरुवातीला समजून घेऊया: समजा, आपल्याला एखाद्या जागेमध्ये बांधकाम करायचे असेल तर त्यावेळी आपल्याला संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते म्हणजेच आपल्याला जेथे बांधकाम करायचे आहे त्यासाठी आपल्याला तेथे परवानगी घ्यावी लागते.

मग शासन ठरवते की तुम्ही या ठिकाणी बांधकाम करू शकता किंवा नाही किंवा तुम्ही येथे किती बांधकाम करू शकता. जर समजा तुम्ही दहा हजार स्क्वेअर फुटाचे परमिशन घ्यायला गेलात व नियमानुसार तुम्हाला जर त्या ठिकाणी आठ हजार स्क्वेअर फूट बांधकाम करता येत असेल तर तसं तुम्हाला तिथे सांगितले जाते.

की तुम्हाला या जागेमध्ये आठ हजार स्केअर फुट बांधकाम करता येते. तर मग हे कसे ठरवले जाते. तर यासाठी आपल्याला FSI कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. तर FSI म्हणजे काय? तर आपल्या बिल्डिंगचा जो परिसर आहे आणि आपल्या जमिनीचा एरिया आहे म्हणजेचच जमिनीचे क्षेत्रफळ या दोन्ही च प्रमाण ठरविलं जाते यालाच काय म्हणतात FSI.

FSI=Floor space Index. तर यावरून आपल्याला काय करायचे असते की ज्या बिल्डिंगच आपण बांधकाम करणार आहोत त्याचा FSI आपल्याला शासनामार्फत दिला जातो. या एफएसआय वरून आपल्याला आपल्या बांधकामाचा एरिया ठरवायचा असतो.

म्हणजेच आपल्याला जर एफएसआय दिला आणि आपल्या जमिनीचा एरीया यांचा गुणाकार करून आपण आपल्या बांधकामाचे क्षेत्रफळ ठरवतो. आता आपण FSI कॅल्क्युलेशन कसं केल जातो ते पाहू आणि FSI वरून आपल्याला किती स्क्वेअर फुटाचे बांधकाम करता येते किंवा किती मजली बांधकाम करता येतं ते आपण कसं ठरवायचं त्याची माहिती घेऊया.

जर समजा आपल्याला एखाद्या बांधलेल्या बिल्डिंगचा FSI काढायचा झाला तर काय करायचं बिल्डिंगचा जो एरिया असेल तो बघायचा. जर समजा, १०००० स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे तर जमिनीचे क्षेत्रफळ किती आहेत तर समजा आहे २००० स्क्वेअर फुट तर काय करायचं.

१००००sqft ÷२००० sqft तर आपल्याला उत्तर मिळून जाईल= ५ आपल्या जमिनीचा FSI=5. तर आपल्या बिल्डिंगचा FSI 5 असणार आहे. आता आपल्याला काय करायचं असतं तर FSI हा आपल्याला गव्हर्मेंट कडून दिलेला असतो. त्या FSI वरून आपण किती फुटाचा बांधकाम करू शकतो. ते कॅल्क्युलेशन करायचं.

आता समजा, जर आपण पुण्यामध्ये राहत असेल, व पुण्यामध्ये आपली जमीन असेल व तिथेच आपल्याला बांधकाम करायचे असेल तर पुण्याच्या महानगरपालिकेकडून आपल्याला FSI ठरवून दिलेला असतो. जर समजा आपला FSI 4 ठरवून दिलेला असेल,

तर आपण सर्वप्रथम आपला एरिया किती आहे ते चेक करायचं व त्यानंतर आपल्याला त्या जमिनीवर किती बांधकाम करता येईल ते ठरवायचं. समजा पुणे महानगरपालिकेने आपल्याला FSI ठरवून दिलेला आहे 4 व आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे 2000sqft. तर आपला फार्मूला आहे,

बिल्डिंगचा एरिया÷ 2000 sqft तर आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे 2000sqft ×4 =8000 sqft. म्हणजेच आपण आपल्या जागेमध्ये 8000sqft फुटाचे बांधकाम करू शकतो. या बांधकामामध्ये आपण 2000sqft चे चार भाग करू शकतो. जसे, ग्राउंड फ्लोअर दोन हजार स्केअर फुटाचा, फर्स्ट फ्लोअर,

सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर हे प्रत्येकी दोन- दोन हजार स्क्वेअर फूट याप्रमाणे आपण हे बांधकाम आठ हजार स्केअर फुट मध्ये पूर्ण करू शकतो. म्हणजेच इथे आपल्याला तीन मजली बांधकाम करता येते. जर आपल्याला येथे मजले वाढवायचे असतील तर मजल्याचा जो एरिया आहे तो आपण कमी ठेवायचा.

तुम्ही आठ हजार स्केअर फुट मध्ये तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे बांधकाम करू शकता. फक्त काय आहे की ,जी शासनाचे बांधकामा संबंधीचे नियम असतील त्या नियमांना अनुसरून तुम्ही हे बांधकाम करू शकता. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे FSI याचा फार्मुला तुम्हाला दिलेलाच आहे.

बिल्डिंगचा एरिया÷ जमिनीचे क्षेत्रफळ .जर आपल्याला बांधकामाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपल्याला FSI दिलेला असतो. तो FSI × जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला उत्तर मिळून जाईल. म्हणजेच आपण किती क्षेत्रफळाचे बांधकाम करू शकतो ते आपल्याला मिळून जाईल व आपण आपल्या सोयीनुसार बांधकाम करू शकतो.

समजा जर आपल्याला मोठ बांधकाम करायचं असेल ,पण आपल्याला जर कमी FSI दिलेला असेल तर आपण त्यांचे प्रीमियम टॅक्सेस भरून FSI वाढवून घेऊ शकतो. शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही तो एफएसआय 10%, 20% या पद्धतीने वाढवून घेऊ शकता.

यामध्ये फक्त तुमच्या जमिनीचा आकार ,तुमच्या जमिनीचे आजूबाजूला असलेले रस्ते, त्या रस्त्याची रुंदी, तसेच तुम्ही ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील लोकसंख्या, लाईटची व्यवस्था ,पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा FSI ठरवून दिला जातो.

सध्याच्या काळात बांधकामामध्ये प्रगती होण्यासाठी FSI वाढवून दिले जात आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मजल्याचे बांधकाम करता येते. या पद्धतीचा वापर करून आपल्याला आपल्या जागेत किती स्क्वेअर फुट चे बांधकाम करता येते.

किंवा किती मजली बांधकाम करता येते याचे कसे कॅल्क्युलेशन करायचे किंवा FSI म्हणजे काय ? FSI कसा कॅल्क्युलेट करायचा? यासंबंधीची ही पूर्ण माहिती होती. धन्यवाद.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “सरकारी नियमानुसार आपल्या जागेत किती मजली बांधकाम करता येते?।। किती स्क्वेअर फुट चे बांधकाम करता येते याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे? ।। FSI म्हणजे काय? ।। FSI कसा कॅल्क्युलेट करायचा? यासंबंधीची ही पूर्ण माहिती जाणून घ्या !

  1. खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
    आपले हार्ड कॉपी मध्ये एखादे पुस्तक आहे का?
    असेल तर नाव सांगा व कुठे मिळेल ते पण सांगा

Comments are closed.