कन्स्ट्रक्शन मधील विविध कामे आणि त्यांची एकके।। बांधकाम कोणत्या एककात ( युनिटमध्ये ) मोजवं?।। कन्स्ट्रक्शन मध्ये केल्या जाणाऱ्या कामांचे मोजमाप घेण्यासाठी जी एकके वापरली जातात त्यांची माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आज आपण बांधकामाकरिता चे मोजमाप घेतले जातात ते ज्या युनिटमध्ये किंवा ज्या एकका मध्ये घेतले जाते त्यासंबंधीची पूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. जेणेकरून आपल्याला बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी या माहितीचा फायदा होईल.

मोजमापाची जी एकके आहेत ती आपण मीटर पद्धती मध्ये जी काही युनिट असतात जसे इंच, फुट यामध्ये पाहणार आहोत. १)पायासाठी मातीतील खोदकाम: आता खोदकाम करण्यासाठी आपल्याला लांबी, रुंदी आणि खोली ही तीन मापे माहिती पाहिजे. ही तीन मापे आपल्याला मिळतात.

त्यामुळे आपल्याला इथे घन मीटर मध्ये याचे मोजमाप करावे लागेल किंवा ब्रास मध्ये सुद्धा आपण याचे मोजमाप करू शकतो. २)खडकामधील खोदकाम: खोदकाम हे कुठलेही असू दे, मातीतील असू दे किंवा खडकातील असू दे. त्याचे मोजमाप आपण घनमीटर मध्ये किंवा ब्रास मध्ये करतो.

३)जागेची स्वच्छता: जागेची स्वच्छता करण्यासाठीची आपण जी जागा मोजतो ती आपण चौरस मीटर मध्ये किंवा चौरस फुटामध्ये मोजतो. ४)सिमेंट काँक्रीट: आता आपण जर सिमेंट काँक्रीट चे बांधकाम पाहिले तर लांबी, रुंदी आणि जाडी किंवा उंची हे तीन घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे मोजमाप करताना नेहमी ते घनमीटर मध्येच करतात.

५)RCC-रेइनफोडस सिमेंट काँक्रीट: ह्या बांधकामाचे मोजमाप सुद्धा घनमीटर मध्येच करतात. ६)DPC-Damp proofing course: यालाच आपण वॉटरप्रूफिंग किंवा ओलावा प्रतिबंध थर असेही म्हणतो. याचे मोजमाप आपण स्क्वेअर मीटर मध्ये करतात.

७)वीट बांधकाम: वीट बांधकाम कुठलेही असू द्या ते घनमीटर किंवा घनफूट मध्ये मोजले जाते. पण समजा पार्टिशन भिंत असेल म्हणजे चार इंच किंवा दहा सेंटीमीटर असेल तर ते स्क्वेअर मीटर मध्ये मोजले जाते. पार्टिशन भिंतही कायमस्वरूपी मोजली जाते.

8)दगडी बांधकाम: कोणत्याही बांधकामात दगडाच्या प्रकार असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा दगडी बांधकाम असू दे ते स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाते. 9)लाकूड काम: लाकूड काम बरेचदा घनमीटर मध्ये मोजल्या जाते आणि काहीवेळा स्क्वेअर मीटर मध्ये मोजले जाते.

समजा जास्त मोठ्या लाकडाला लांबी, रुंदी आणि जाडी हे मोठ्या लाकडाचे मोजले जाते. लांबी, रुंदी, उंची मीटर मध्ये घेऊन त्याचा गुणाकार करतो आणि त्याचं मोजमाप हे घनमीटर मध्ये करतो.

10)रेइंसफोर्टमेंट स्टील: जे आपण आरसीसी मध्ये वापरतो, ते स्टील क्विंटल मध्ये मोजल्या जाते व 1000 किलोच्या वर असेल तर ते टना मध्ये मोजल्या जाते, जास्त असेल तर टना मध्ये मोजतो व कमी असेल तर क्विंटल मध्ये मोजतो. 1 क्विंटल =100 किलो आणि 1 टन =1000 किलो.

११)तारेचे कुंपण: तारेचे कुंपण हे रनिंग मीटर मध्ये मोजतो. कारण कुंपणाला रुंदी, उंची नसते. त्यामुळे कुंपणाची लांबी ही रनिंग मीटरने मोजतात. १२)रोलिंग स्टील शटर: जे आपल्या गाड्याला किंवा दुकानाला शटर असते त्याचे मोजमाप हे sq.m – चौरस मीटर मध्ये केले जाते.

१३)RCC स्लॅप: आपण जो आपल्या बिल्डिंग वरती स्लॅप टाकतो तो RCC स्लॅप cu.m- घन मीटर मध्ये मोजायचा असतो. घनमीटर मध्ये मोजण्यासाठी लांबी, रुंदी व जाडी हे स्लॅबच्या मापात घेऊन त्याचा गुणाकार करायचा. त्याचे उत्तर तुम्हाला घनमीटर मध्ये मिळून जाईल.

१४)प्लास्टर रिंग (गिलावा): प्लास्टर रिंग हे sq.m चौरस मीटर मध्ये मोजल्या जाते तर काही ठिकाणी गिलावा ब्रास मीटर मध्ये सुद्धा मोजतात. ब्रास मीटर मोजताना गिलाव्याचे क्षेत्रफळ लक्षात घेतले जाते दहा बाय दहा चा 1ब्रास धरल्या जातो.

१५)दर्जा भरणे: इंग्रजी मध्ये आपण त्याला पैंटिंग असे म्हणतो. बांधकामामध्ये जॉईंट असतात त्या जॉईंट मध्ये फक्त सिमेंट भरल्या जाते हे दर्जा भरण्याचे काम चौरस मीटर मध्ये मोजल्या जाते. १६)कलर काम किंवा रंग काम: कलर काम किंवा रंग काम हे चौरस मीटर मध्ये मोजल्या जाते.

१७)विटा पुरवणे: आपल्या बांधकामासाठी ज्या विटा लागतात त्या विटा प्रति नग मध्ये मोजल्या जातात तुम्ही 1000 नग किंवा प्रतिनग म्हटले तरी चालेल. १८)वाळू, खडी, मुरूम पुरवणे: वाळू आणि खडी हे घनमीटर मध्ये मोजले जाते आणि व्यवहारांमध्ये ब्रास मध्ये मोजतात शासनाची कामे करत असाल तर जास्त करून घनमीटर मध्ये व प्रायव्हेट करा काम करत असाल तर ब्रास मध्ये मोजतात.

१९)सिमेंट: सिमेंट हे प्रती बॅग म्हणजेच पोत्यानुसार मोजल्या जाते एक पोते हे 50 किलोची असते. २०)लाकूड: लाकूड हेसुद्धा घनमीटर मध्ये मोजल्या जाते. व्यवहारामध्ये किलो मध्ये सुद्धा मोजतात. २१) लोखंड: कोणतेही लोखंड असेल ते क्विंटल मध्ये किंवा जास्त असेल तर टणामध्ये मोजतात.

२२)ऑइल पेंट: कोणतेही लिक्विड पेंट हे लिटर मध्ये मोजल्या जाते. २३)भराई: भराई म्हणजे काय तर एखादा खड्डा असेल व त्याच्यात जर आपल्याला मुरूम टाकायचा असेल तर ते घनमीटर मध्ये मोजतात. २४) ड्रेनेज वर्क (प्लंबिंग): प्लंबिंग चे काम करत असताना त्याचे मोजमाप हे प्रति मीटर मध्ये करतात.

२५)ट्रॅप, चेंबर: ट्रॅप किंवा चेंबरच्या कामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे प्रति नगाप्रमाणे वापर केला जातो. २६)किचन सिंक, वॉश बेसिन: हे सुद्धा प्रति नग याप्रमाणे मोजल्या जाते. २७)PVC पाईप / GI पाईप: प्रति मीटर नुसार मोजल्या जाते. २८)कडप्पा किंवा शहाबाद फरशी: कोणत्याही प्रकारची फरशी असू दे ती चौरस मीटर मध्ये मोजतात.

२९)स्करटिंग: म्हणजे काय तर आपण जेव्हा फरशी बसवतो त्यावेळी आपण भिंतीला लागून जी फरशी असते ती थोड्या वर बसतो त्याला स्करटिंग म्हणतात व ती आपण रनिंग मीटर मध्ये मोजतो.

तर या प्रकारची कामे असतात व त्याचे मोजमाप हे युनिट मध्ये केले जाते .सरकारी कामांमध्ये जास्तीत जास्त मिटर, घनमीटर, रनिंग मीटर, चौरस मीटर मध्ये मोजमाप करतात. तर साईट वर इंच, फुट, ब्रास मध्ये मोजमाप केलं जातं. तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही दोन्ही ही युनिट लक्षात ठेवावे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.