बार कोडची जन्मकथा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

शाॅपिंग केल्यावर तुम्ही जेव्हां बिलिंग काउंटर वर येता, तेव्हां तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंवर एका कोपऱ्यात ज्या उभ्या रेघा असतात त्या बिलिंग क्लार्क स्कॅन करतो हे तुम्ही पाहिलं असेल. असेल काहीतरी असं म्हणून तुम्ही त्याकडे याआधी दुर्लक्ष केलं असेल, पण ते काय आहे याबद्दल तुमच्या मनांत कुतुहल नक्कीच असणार.

बहुतेक लोकांना वस्तूंवर बार कोड असतात हे माहित असतं, पण त्यांचा शोध कुणी लावला, किंवा त्यांचा विकास कसा झाला आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे, ते मात्र माहित नसतं. चला तर, बार कोड बद्दल जाणून घेऊया.

१९३२ सालापासून दुकानदारांनी विक्री प्रक्रियेचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न म्हणून पंच-कार्ड तंत्राचा उपयोग करून पाहिला, पण ही कल्पना यशस्वी झाली नाही कारण ती खूप महाग तर होतीच, शिवाय फारच क्लिष्ट होती.

१९४८ मध्ये, बर्नार्ड सिल्व्हर या ग्रृहस्थांनी एका प्रमुख फूड कंपनीच्या अध्यक्षांना उत्पादनांची माहिती स्वयंचलितपणे संकलित करण्याबद्दल चर्चा करताना ऐकले. पदवीधर नॉर्मन जोसेफ वुडलँड यांनी, जे त्यांचे ड्रेक्सेल इन्स्टिट्यूटमधील सहाध्यायी होते, रेखीय प्रणाली आणि बुल्स बारकोड प्रणालीचे संशोधन आणि विकास केला, (चित्र पहा) ज्यासाठी त्यांनी माॅर्स कोडचे घटक वापरले.

१९५२ साला पर्यंत त्यांनी बारकोड रीडर बनविला आणि त्यांना बारकोड सिस्टीमचे पेटंट प्राप्त झाले. पाच वर्षांनंतर असोसिएशन ऑफ अमेरिकन रेलरोडस या सिस्टीमचा वापर आपल्या रेल्वेच्या बोगी ओळखण्यासाठी करू लागले. १९६९ पासून जी आज आपल्याला परिचित आहे, ती पहिली खरीखुरी बारकोड सिस्टीम जनरल मोटर्स आणि जनरल ट्रेडिंग कंपनी वापरत होते.

१९७३ मध्ये युनिव्हर्सल प्राॅडक्ट कोड (UPC) विकसित करण्यात आला, ज्यामुळे ह्या सिस्टिमला पहिले खरे यश मिळाले. आणि केमार्ट स्टोअर्ससारख्या बलाढ्य स्टोअर चेनने आपल्या सर्व आउटलेटमध्ये वापरायला सुरुवात केल्यामुळे ह्या सिस्टिमचा अधिक प्रसार झाला. आतां मात्र अधिकाधिक कंपन्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर करू लागल्या.

१९७४ मध्ये रिगलीज च्युइंग गमचे पॅक ही बारकोड सिस्टिम वापरून विकले जाणारे पहिले उत्पादन होते. दहा वर्षांनंतर अमेरिकेमधील ३३ टक्के किराणा दुकानांनी त्यांचा वापर केला. २००४ पर्यंत, देशातील टॉप ५०० कंपन्यांपैकी ८० ते ९० टक्के कंपन्या बारकोड वापरत होत्या. १९९४ मध्ये, QR कोड तयार केले गेले, जे टोयोटाची एक उप कंपनी डेन्सो वेव्हने विकसित केले होते. क्यूआर कोडचे मूळ उद्दिष्ट होते ऑटो पार्ट्स आणि वाहने स्वतः ट्रॅक करणे.

बारकोड तंत्रज्ञान काळानुसार बदलत आहे यात शंका नाही. काही वर्षांनंतर कॅशियरसाठी हाताने धरलेले, बंदूकीसारखे दिसणारे, लाल लेसर बीम फेकणारे स्कॅनर अस्तित्वात आले. त्या लेसर बीमना ‘म्रृत्यूकिरण’ असं नांव पडलं होतं कारण त्या किरणांमुळे कॅन्सर होतो अशी समजूत होती. पुढे त्यात अधिक बदल घडले. तरीही भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तशाच प्रकारचे स्कॅनर अजून देखील वापरले जातात.

आज बारकोड वापरण्याचे नवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. उदाहरणार्थ, आतां बारकोड एका साध्या स्मार्टफोन ॲपमध्ये स्कॅन करणे शक्य आहे. स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर, एखाद्या व्यक्तीच्या गरजेनुसार त्या उत्पादनातील कॅलरी किती आहेत, किंवा ते कोठे बनवले आहे, इत्यादी जवळजवळ कोणतीही माहिती आपल्याला देऊ शकते.

आतां तर मोबाइल मधून देखील बार कोड नियंत्रित केले जाऊ शकतात. उत्पादने जेव्हा असेंब्ली लाईन किंवा पॅकिंग सिस्टिममधून जातात, त्यावेळी वेअरहाऊसमधील मशीन लर्निंगद्वारे त्यांची माहिती आपोआपच गोळा केली जाऊ शकते. ग्राहकांच्या वापरापासून ते अत्यंत स्वयंचलित सिस्टिम पर्यंत बारकोड तंत्रज्ञान इन्व्हेंटरी आणि माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक वरदान ठरत आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.