प्रत्येक स्त्रीच्या आपल्या नवऱ्याकडून असणाऱ्या या ५ अपेक्षा तुम्हाला माहित आहेत का? ।। नवरा बायकोमध्ये भांडण होऊ नये असे वाटत असेल तर ह्या ५ गोष्टी नक्की विचारात घ्या !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

जश्या नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षा असतात तश्याच बायकोच्या देखील नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात. कुणा दुसर्‍याच्या बागेत लाडाने वाढवलेले पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि संसार वेल फुलवते ती म्हणजे पत्नी. माहेरच्या लाडात उगवलेली सरिता स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या सर्व गुणदोषांसकट स्वतःच्या पोटात घालूनही संथ वाहणारी नदी म्हणजे पत्नी. कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन करूनही सर्व कर्तव्य निमूटपणे पार पाडून कुटुंबासाठी झटते ती म्हणजे पत्नी. प्रेम, त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे सुद्धा पत्नी.

संसार, अपत्य, कुटुंब या सर्वांना जिने वाहून दिलेला असतो ती म्हणजे पत्नी. ती कुणाची आई, कुणाची सून, कोणाची काकू, तर कोणाची आत्या असते. परंतु ती नवऱ्याची अर्धांगिनी असते. मित्रांनो आयुष्यभर कुटुंबाची काळजी घेणाऱ्या बायकोच्या फक्त पाच अपेक्षा नवर्याकडून असतात. त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे.

1. सन्मानाची वागणूक : पदरी पडलेल्या प्रतीकृती प्रियकराला जसा जbसा आहे तसा, स्वीकारून त्याच्या खुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या प्रेमळ प्रेयसीची म्हणजेच पत्नीची एक नेहमी इच्छा की, आपल्या नवऱ्याने आपल्याला सन्मानाची वागणूक द्यावी. तिचेही काहीतरी अस्तित्व आहे त्याचे नवऱ्याने भान ठेवून साथ द्यावी.

प्रत्येकच गोष्टी पुरुषी अहंकार न आणता स्वतः वरून तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार करावा. कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये बरेचदा ती कायम उपेक्षित राहिलेले असते. परंतु पतीच्या चार गोड शब्दांनी ती सर्व कटू गिळून घेऊन संसारासाठी सज्ज होत असते. म्हणून नवऱ्याने तिला सन्मानाची वागणूक द्यावी ही बायकोची पहिली अपेक्षा.

2. दोषा सोबतच गुणाकडे सुद्धा लक्ष द्यावे : मित्रांनो जी व्यक्ती काम करते, जी व्यक्ती निर्णय घेते, तीच व्यक्ती सोबत असते. वर्षानुवर्षे गॅरेज मध्ये लावलेल्या गाडीचा तुम्ही कधी अपघात झालेला पाहिला आहे का? पत्नी मध्ये निर्णय घेताना आणि संसार करताना अनेक दोष पुढे येतात आणि यामुळे ते खूपच उपेक्षित ठरू शकते किंवा कधीकधी झालेली सुद्धा असू शकते. परंतु तिची अपेक्षा ही सुद्धा असते की ती चांगल्या कामाचे कौतुक करावे. चार कौतुकाचे शब्द तिच्या मनाला आनंद देणारे ठरतात. यामध्ये त्या घरातील स्त्री नेहमी आनंदित राहते.

3. भांडणांमध्ये दोघांनीही एक एक पाऊल मागे घ्यावे : ज्या घरातील नवरा-बायको स्वतःच्या चुका मान्य करून स्वतः कबूल करतात, त्या नवरा बायकोचे प्रेम कधी संपत नाही किंवा कमी होत नाही. नातं टिकवणं ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नवरा कितीही चुकीचा असला तरी चूक ही तीच समजली जाते. नेहमी नवऱ्याकडून भासवले जाते की, तूच चुकीची आहेस. नेहमी माघार बायकोनीच नाही तर कधीकधी नवऱ्याने ही माघार घ्यावी. हीच एक साधी अपेक्षा पत्नीकडून केली जाते. अर्थात पुरुषी अहंकार जर बाजूला ठेवला तरच हे शक्य होते.

4. मुले आणि समाज यांच्यापुढे अपमान करू नये : जगातील प्रत्येक नवरा बायकोचे कमी-अधिक भांडण होत असते आणि हे सुद्धा तेवढेच खरे आहे की हे भांडण श्रीखंड सारखं आंबट-गोड असतं. एका पत्नीला भांडणाची किंवा अपमानाची जास्त भीती वाटत नाही परंतु, अपमान हा स्वतःच्या मुलांसमोर आणि समाजासमोर झाला तर ती गर्भगळीत होते.

एक स्त्री शारीरिक त्रासा पेक्षा जास्त मानसिक खच्चीकरण होते. अनेक वेळा तर इतरांवरूनच नवरा-बायकोचे गैरसमज होतात. अशावेळी तिला समजून घेऊन चर्चा करणे अपेक्षित असते. काहीवेळा तर नवऱ्याने बायकोला भांडावं किंवा ती कशी चुकीचे आहे हे जगाला ओरडून सांगावं अशीही अपेक्षा करणारे आपलेच असतात. परंतु काही वेळा इतरांच्या पती-पत्नी च्या नात्यांत हस्तक्षेप करण्याने संसार धुळीस मिळण्याची भीती जास्त असते. अशावेळी संयम आणि धीर असायला हवा. संयमाने आणि धीराने गैरसमज दूर करायला हवे तिच तर खरी परीक्षा आहे.

5. दुःख आणि आजारपणा : असं म्हणतात पत्नीचा खरं रूप हे नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसते तर नवऱ्या चा खरा स्वभाव पत्नीच्या आजारपणात दिसतो. जेव्हा पत्नी आजारी पडते तेव्हा संपूर्ण घराचा चक्रच थांबलेलं सर्वांनी अनुभवलं असेल. पत्नीच्या आजारपणात आणि तिच्या दुःखात जगातील सगळ्यात जास्त कुणाच्या आधाराची गरज असेल तर तर ती व्यक्ती म्हणजे नवरा.

अशावेळी तिला नवऱ्याचा हात हातात हवा असतो. सतत घरासाठी आणि संसार यासाठी झटणाऱ्या त्या गृहलक्ष्मी ला अशावेळी पतीने जर जोपसले तर ती आयुष्यभर समाधानी होते. तिच्या असण्याला, तिच्या अस्तित्वाला अशा वेळी खरा अर्थ प्राप्त होतो. पत्नी अशी व्यक्ती आहे जिच्या असल्याने आयुष्यात वसंत भरतो आणि नसण्याने फाल्गुन यामधील उदासीनता जाणवते.

नवऱ्याकडून अतिशय माफक अपेक्षा ठेवणारे प्रत्येकाला आणि प्रत्येकासाठी झटणारी आणि काहीही झाले तरी संसाराला जपणारे म्हणजे पत्नी. स्वतः च्या जिवातून एक नवा जीव घडवणारे आणि विश्वाची निर्मिती म्हणजे पत्नी. माहेरच्या उंबरठ्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन संसाराचे आणि सासरचे गोडवे गाणारे थोर स्त्री म्हणजे पत्नी. माहेरी गेल्यावर ही उरात सासरी परतीची धास्ती असणारी सुद्धा पत्नीच. आणि मित्रांनो आयुष्य संपून अनंताच्या प्रवासाला निघतानाही सासरकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून मार्गक्रमण करणारा देह सुद्धा पत्नीचाच.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.