न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी पूर्वतय्यारी कशी करावी? काय आहेत महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

”युद्धाची तयारी हे सुद्धा एक प्रकारचे युद्धच आहे हे.” ही ओळ युद्धशास्त्राचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा ती गोष्ट करण्या-करता त्याची तयारी आपण जी तयारी करतो ती सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून हे तत्त्व म्हणून जरी युद्धशास्त्रात असलं तरी ते तत्त्व आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अवलंबू शकतो. या गोष्टीचा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात निश्चितपणे फायदा सुद्धा होतो. आता न्यायालयामध्ये जाणं, दावा दाखल करणं हे सुद्धा एक प्रकारचे आव्हान किंवा युद्धच आहे. जेव्हा आपण त्या युद्धाला सज्ज होत असतो, तेंव्हा आपण जेवढी तयारी चांगली करू तेवढी आपल्या विजयाची खात्री काही टक्‍क्‍याने वाढत जाते. जर काहीही तयारी नसताना तुम्ही कोणत्याही गोष्टीला सामोरे गेलात तर यश किंवा अपयश हा केवळ नशिबाचा भाग ठरतो.आपली काहीच तयारी नाहीये त्यामुळे जे होईल त्यांना सामोरं जाणं एवढेच आपल्या हातात असते.

या लेखामद्धे आपण न्यायालयात जाण्यापूर्वी काय तयारी केली पाहिजे या दृष्टीने महत्वाचे घटक समजून घेऊ. सर्वसाधारणपणे पाहिलं तर दावा दाखल केल्यानंतर जश्या गोष्टी घडत जातात, तसतसे ते प्रकरण चालवला जाते. हे काहीसं तर्कहीन आणि चुकीचं आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणास्तव कोर्टामध्ये जायचं असतं, त्याच्या आधीच आपण काय काय होऊ शकेल आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार याचा एक आराखडा किंवा नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आराखड्याप्रमाणेच सगळं होईल असं नाही, पण किमान काय काय होऊ शकेल यावर आपण विचार करून त्याची तयारी करणं हे अत्यंत गरजेचे आहे.  चला तर मग पाहू त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची तय्यारी आपण न्यायालयात जाण्यापूर्वीच केली पाहिजे.

न्यायालयात जाने टाळणे : पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयात जाणं टाळता येईल का याची चाचपणी करणे. बरेचदा जेव्हा न्यायालयात लोक जातात तेव्हा दर वेळेला ते तितकंच गरजेचं असतं असं नाही. काही वेळेला गैरसमज, काही वेळेला इगो, काही वेळेला दुखावलेल्या भावना यामुळे न्यायालयामध्ये जाण्याचा तडकाफडकी किंवा टोकाचा निर्णय घेतला जातो. वकील साहेबांनी आपल्या पक्षकाराची आणि विरोधी पक्षाची या दोघांची समजूत काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.  बरेचदा अशा प्रयत्नांना यश येते. बरेचवेळा दाव्यातील दोन्ही पक्षांची समेट घडून येते.  समोरासमोर बसून व्यवस्थित शांतपणे चर्चा करून हे प्रश्न सुटू शकतात, म्हणून कोर्टात जाण्यापूर्वी ही गोष्टच टाळता येईल का याचा विचार करणे देखील आवश्यक ठरते. असे झाल्यास दोन्ही पक्षांचे वेळ व पैसा दोन्ही वाचतो.

आपली नेमकी मागणी काय आहे हे स्पष्ट करणे : जेंव्हा एखादा व्यक्ति न्यायालयात जाण्याचे ठरवतोच, तेंव्हा सर्वप्रथम आपली मागणी काय आहे याबद्दल सविस्तर अभ्यास करणे आवश्यक ठरते. न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायदालनात चालवल्या जातात, त्यामुळे आपल्याला नक्की काय हवं आहे हे अगोदर ठरवणे आवश्यक ठरते, जेणे करून पुढील मुद्द्यासाठी आपली तय्यारी सोपी ठरते. आपली मागणी पोटगी संबंधी आहे, घटस्फोटा संबंधी आहे, हक्कासंबंधी आहे, आपल्या अधिकारा संबंधी आहे की इतर कोणती आहे हे आपण स्पष्ट ठरवणे आवश्यक आहे. कारण या सर्व मागण्या व त्यासंबंधी प्रकरणे हे वेगवेगळ्या न्यायालयात चालवले जातात.

योग्य ते न्यायालय निवडणे : जोपर्यंत आपली मागणी काय आहे हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत न्यायालयाची निवड करणे शक्य होत नाही. जर आपली मागणी ही जमिनी संबधी अथवा प्रॉपर्टी संबंधी असेल तर अश्या वेळेला दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागते. आपला अर्ज/दावा हा दिवाणी न्यायालयात दाखल करावा लागतो. एखाद्या व्यक्तिला घटस्फोट हवा असेल तर कौटुंबिक न्यायालयात जावे लागेल, महसुली अभिलेखा संदर्भात काही मागणी असेल तर महसुली न्यायालयात जावे लागेल. पोटगीचा वगैरे असेल तर परत कौटुंबिक न्यायालयात जावे लागेल. सहकारी संस्थांचा विषय असेल तर सहकार न्यायालयात जावे लागेल. ग्राहक म्हणून आपली काही तक्रार असेल तर ग्राहक न्यायालयात दाद मागण्यात येते. त्यामुळे आपल्या मागणी नुसार आपल्याला न्यायालय निवडावे लागते, अन्यथा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे. सोबतच योगी न्यायालय निवडले गेले नाही तर आपली मागणी देखील पूर्ण होणार नाही.

आपले प्रकरण मुदतीत आहे का हे तपासणे : कोणत्याही प्रकरणाचा अभ्यास करताना किंवा दाखल करताना बरेच लोक त्या प्रकरणाच्या गुणवत्तेला किंवा मेरिटला अवास्तव महत्त्व देतात. आता मेरिट किंवा गुणवत्ता महत्त्वाची आहे का तर निश्चित महत्त्वाची आहे, पण जर प्रकरण मुदतीतच बसत नसेल तर ते प्रकरण गुणवत्तेवर कितीही जरी चांगलं असलं तरी त्याचा तसा काहीही उपयोग होत नाही. कारण जर आपल्याला दावा दाखल करायचा असेल तर तो मुदतीत असणे आवश्यक आहे, मुदत बाह्य दावा दाखल करणे शक्य नाही.

कागदपत्र जमा करणे : न्यायालयामध्ये निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे कागदपत्रे. त्यामुळे न्यायालयामध्ये जाण्यापूर्वी आपण आपल्या प्रकरणासंबंधी सर्व कागदपत्र जमा करणे आवश्यक असते. आपल्याकडे सर्व कागदपत्र असतीलच असे नाही, त्यामुळे आपण वकिलांच्या सल्ल्याने कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत त्याची यादी घेऊन ते जमा केले पाहिजे. प्रकरण न्यायालयात दाखल करण्यापूर्वी आपण सर्व कागदपत्र जमा करून घेतले असतील तर प्रकरण सुरू झाल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी वेळ मागून घ्यावा लागत नाही. त्यामुळे आपले प्रकरण वेळेत निकाली लागण्याची शक्यता वाढते.

प्रकरणाची बजबूत बाजू आणि कमजोर बाजू : आपण आपले प्रकरण न्यायालयात दाखल करण्यापूर्वी आपल्या वकिलांशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक असते. या चर्चेमध्ये आपल्या दाव्याची मजबूत बाजू आणि कमजोर बाजू काय आहेत यावर विस्तृत चर्चा करावी. यामुळे आपल्याला आपल्या प्रकरणामद्धे कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावे लागेल याबाबत सुरुवातीपासून माहिती असेल. पुढे आपल्याला प्रकरण चालवताना अडचणी येणार नाहीत.

आपल्या प्रकरणाशी निगडीत इतर न्यायनिवाडे : न्यायालयामध्ये आपल्या प्रकरणाशी निगडीत असलेले बरेच दावे निकाली लागलेले असतात. असे निकाली लागलेले कोणते दावे आपली बाजू मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे असे निकाल आपण आपल्या वकिलांकडून अभ्यासले पाहिजे. या निकलांची पुढे आपल्या प्रकरणामद्धे आवश्यकता येऊ शकते.

साक्षीदार निवडणे : आपल्या प्रकरणासंबंधी योग्य साक्षीदार निवडणे अत्यंत महत्वाचे असते. साक्षीदार हा आपल्या बाजूने बोलणारा असावा, तो कोर्टाने सांगितलेल्या तारखेला कोर्टात हजार राहू शकेल याची खात्री करून घेणे अत्यंत महत्वाचे असते. कित्येक प्रकरणे साक्षीदारांच्या दिलेल्या चुकीच्या साक्षमुळे वेगळ्या दिशेने जातात. त्यामुळे साक्षीदार निवडतणा आपल्या वकिलांशी चर्चा करून, साक्षीदाराशी चर्चा करून निवडणे फायदेशीर ठरते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा