ही पर्यटनस्थळे आहेत पर्यटकांची खास आवडती, तुम्ही कोणतं निवडाल ?
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
थंडीची तीव्रता कमी होत आली की पर्यटकांची पावलं आपोआप पर्यटन स्थळाकडे वळू लागतात. ‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येत असे’ असं म्हटलं आहे ते उगीच नाही. गेली दोन वर्ष आपल्यापैकी प्रत्येकजण घरात बसून कमालीचा कंटाळला आहे.
त्यामुळे घराबाहेर जाऊन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. पण सगळ्यात वेळ खाणारं असतं ते प्लॅनिंग. ट्रीपला जाणं ठरल्यापासून प्लॅनिंगचं भूत जे मानगुटीवर बसलेलं असतं ते काही केल्या उतरत नाही. यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळं.
येत्या काही महिन्यात तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल तर हा स्थळांचा जरुर विचार करा.
रण उत्सव- काठियावाडी संस्कृतीची जवळून ओळख करुन घ्यायची असेल तर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. 38 दिवस वाळवंटात चालणा-या या उत्सवात मोकळ्या हवेसह अनेक व्यंजनाचा आस्वाद घेता येतो. धोर्डो गावाजवळ संपन्न होत असलेल्या या उत्सवात देशातीलच नाही तर परदेशातील अनेक पर्यटक हजेरी लावतात.
रणथंबोर – नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेवर जाण्यास उत्सुक असाल तर हा पर्याय सर्वोत्तम आहे. हा सीझन रणथंबोर अभरण्यास भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो.
कुर्ग – कर्नाटकातील रंगीबेरंगी शहरांपासून दूर हिरवाई अनुभवायची असेल तर कुर्गला भेट द्यायलाच हवी. रोजच्या रुटीनपासून लांब जाऊन थोडावेळ निवांतपणा अनुभवायचा असेल तर कुर्गला जरुर भेट द्या.
कालिम्पोंग- पर्वतराजीच्या कुशीत वसलेलं पश्चिम बंगालमधील हे हिलस्टेशन पर्यटकांच्या खास पसंतीचं आहे. आताचा सीझन हा तिथे भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो.
वायनाड – Gods own country केरळ मधील एक पेक्षा एक प्रेक्षणीय स्थळ आहेत. पण वायनाडची बातच काही और आहे. गुहा, मंदिरं, तलाव या सगळ्यांना वायनाडमध्ये एक्सप्लोअर करता येणं शक्य आहे. त्यामुळे वाट पाहू नका. बॅग पॅक करा आणि या पर्यटनस्थळाचा आनंद घ्या.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.