आज आपल्या भारताची लोकसंख्या ही जवळपास 145 कोटी आहे. जो जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो. असे असले तरी भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. भारतात असे कित्येक लोक आहेत जी लहान मोठा व्यवसाय करून भारताचा विकासाला हातभार लावत आहेत. तसे तर आपल्या भारत देशात बिजनेस करून करोडपती हे फार सोपे आहे, कारण फक्त पाचशे रुपयेचे प्रॉडक्ट वीस हजार लोकांना विकून तुम्ही करोडपती होऊ शकता, अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त चालणारे 10 बिझनेस कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणारा आहोत.
◆ बेकरी बिजनेस : भारतातील सर्वात जास्त चालणारे व्यवसायांपैकी येत आहे. या व्यवसायामध्ये पेस्ट्री, बिस्किटे आणि विविध स्वादिष्ट केकचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या घरात किंवा एखाद्या शॉपमध्ये ऑनलाइन किंवा बेकर्सला विकू शकता. जर तुम्ही घरबसल्या विक्रीचे दुकान सुरू केले तर तुम्हाला व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. या व्यवसायामध्ये तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये लावून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमावता येतील.
◆ मसाल्यांचा व्यवसाय : मित्रांनो मसाल्यांचा व्यवसाय हा देखील आपल्या भारतात अतिशय उत्कृष्ट चालणारा बिझनेस म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या देशाची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे. येथे प्रत्येक राज्य आणि प्रत्येक शहरात वेगवेगळे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. या खाद्यपदार्थांना स्वादिष्ट बनवण्यासाठी मसाल्याचा वापर केला जातो. त्याच बरोबर भारताच्या जवळपास प्रत्येक घरांमध्ये आपल्याला खाद्यमसाला पाहायला मिळतील, अशाच परिस्थितीत कमी खर्चात सर्वाधिक व्यवसाय सुरू करायचा असेल तर मसाल्यांचा व्यवसाय करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक गिरणी आणि स्थायी मसाल्याची आवश्यकता असेल. जिथे एक ते दोन लाख रुपये लावून तुम्ही महिला 50 हजार रुपयांपर्यंतकमावू शकता.
◆ रेडिमेड कपड्यांच्या बिझनेस : रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय हा तुम्हाला तर माहितीच असेल, जो वर्षभर न थांबता चालणारा बिझनेस आहे. फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील निम्मी लोकसंख्या आज रेडिमेट कपड्याचा वापर करत आहे. यावरून तुम्ही या व्यवसायाचा अंदाज लावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शहरी भागात किंवा जिथे जास्त गर्दी होते अशा ठिकाणी एक शॉप आणि रेडिमेड कपड्यांची गरज लागेल, तसे तर हा व्यवसाय तुम्ही फक्त एक लाख रुपये लावून करू शकता. परंतु जर तुम्हाला तुमचे शॉप जास्त डेव्हलप करायचे असेल तर तुम्ही पाच ते दहा लाख रुपये लावून महिना एक लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.
◆ सुपर मार्केट : सुपर मार्केट हा बिझनेस भारतात सर्वात जास्त चालणारे व्यवसाय पैकी एक आहे. तो टिकावू सर्वाधिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या जवळच्या सोसायटी आणि मोठ्या ठिकाणी चालवू शकता. यामध्ये तुम्ही किराणा सामान, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला इत्यादी विकू शकता. ज्यामध्ये तुम्हाला तर रोज मोठा नफा होऊ शकतो. सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपये इन्वेस्टमेंट करून बिजनेस मधून महिन्याला 50-60 हजार रुपये कमवू शकता आणि पुढे तुमचा हा नफा वाढू शकतो.
◆ मेडिकल शॉप : मेडिकल शॉप हा भारतातील एक असा व्यवसाय आहे ज्यात तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करुन जास्त पैसे कमवू शकता. कारण हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही 24 तास करू शकता. यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये इन्वेस्टमेंट करावी लागेल ज्यातून तुम्ही तर महिन्याला 60 ते 80 हजार रुपये कमवू शकता.
◆ जनरल स्टोअर : जनरल स्टोअर हा भारतातील एक असा व्यवसाय आहे जो गावापासून ते शहरापर्यंत सर्व छोट्या-मोठ्या भागात आपल्याला पाहायला मिळतो. दररोज लागणाऱ्या उदरनिर्वाहाच्या सर्व वस्तू आपल्याला जनरल स्टोअरमध्ये भेटतात. त्यामुळे वर्षाच्या बारमध्ये सर्वात जास्त चालणारे व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. स्टोअर ओपन करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन लाख रुपये इन्वेस्टमेंट करावे लागेल. ज्यातून तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 ते 40 टक्के म्हणजेच 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता.
◆ रेस्टॉरंट : रेस्टॉरंट हा भारतात जास्त चालणारे व्यवसाय पैकी एक आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीला या व्यवसायात किती पैसा आहे? याबद्दल माहिती असेल. तर मित्रानो सध्या किती लोकांना दररोज घराबाहेर जाऊन खायला आवडते, त्यामुळे हा व्यवसाय कधीही बंद होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेवणाची योग्य चव द्यावी लागेल. सुरुवातीला तुम्हाला काही चांगले कामगार आणि स्वयंपाक करू शकणारे लोक लागतील. जे तुमचा रेस्टॉरंट व्यवसाय चालू शकतील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला चार ते पाच लाख रुपये पेमेंट करावी लागेल त्यातून तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 ते 40 टक्के म्हणजेच 2 ते 3 लाख रुपये कमवू शकता.
◆ फिटनेस सेंटर : हा व्यवसाय भारतात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या ओळखला जातो. ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला चांगला इन्कम जनरेट करू शकता. जिम किंवा फिटनेस सेंटर सुरू करणे सोपे नाही परंतु जर तुम्ही कठोर परिश्रम करण्यास तयार असाल तर हा बिझनेस तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. एक जिम ओपन करण्यासाठी तुम्हाला 7 ते 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागेल. त्यातून तुम्ही प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयांचा नफा कमवू शकता.
◆ केटरिंग : केटरिंगचा व्यवसाय सध्या भारतात खूप ट्रेडिंगला आहे. जो तुम्ही लग्न समारंभ, पार्टी किंवा इतर अनेक मोक्याच्या ठिकाणी सुरू करू शकता. केटरिंग कमीत-कमी गुंतवणुकीत सुरू करणे जितके सोपे आहे तितकेच तुम्हाला चांगले स्वयंपाकी आणि काही भांड्याची आवश्यकता लागेल. केटरिंगचा व्यवसाय तुम्हाला सुमारे एक ते दोन लाख रुपये इन्वेस्टमेंट करावी लागेल यातून तुम्ही तीस हजारापर्यंत मार्जिन कमावू शकता.
◆ चहा-कॉफी बिझनेस : आपला भारत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. जितला जवळपास प्रत्येक व्यक्ती त्याच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या सेवनाने करत असतो. त्यामुळे त्यांची किंमत कधीच कमी होणार नाही. हा व्यवसाय तुम्ही स्टार्टअप म्हणून ही करू शकता. ज्यामध्ये चहाचे दुकान सुरू शकता. चहा-कॉफीचे बिझनेस करण्यासाठी तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये इन्वेस्टमेंट करावे लागेल त्यातून तुम्ही प्रत्येक महिन्याला जवळपास पन्नास हजार रुपये कमवू शकता.
तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त चालणारे बिझनेस कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. यापैकी तुमचा बिझनेस कोणता? आणि तुमच्या मते भारतात सर्वात जास्त चालणारा व्यवसाय कोणता आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.