भारतातील ५ सर्वात मोठ्या तोफा ।। आशियातील सर्वात मोठी तोफ: एकदाच चालवली आणि तलाव बनला ! ।। जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती या लेखातून !

प्रवास शैक्षणिक

आशिया खंडातील सगळ्यात मोठी तोफ भारतात आहे हे सुद्धा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नाही, म्हणून भारतातील सर्वात मोठ्या तोफा कुठे आहेत हे पाहूया:

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

1. मेंढा तोफ – देवगिरी किल्लावर मेंढीच्या आकाराची असलेली तोफ आहे जिचं नाव मेंढा तोफ अस ठेवण्यात आल आहे. चारही दिशेला फिरणाऱ्या या तोफेला मागच्या बाजूला मेंढी सारखं तोंड आहे त्यामुळे या तोफेला मेंढा तोफ अस म्हंटले जाते. ही एक अस्सल आणि कलाकृतीने मढलेली ही तोफ आहे. देवगिरी किल्ला काही काळ मुघलांचा किल्ला होता, औरंगजेब त्यावेळी दख्खनचा राजा होता तेव्हा त्याचं या किल्ल्यावर वास्तव्य होत. दौलताबादच खर नाव देवगिरी हा किल्ला यादवांच्या राजधानीचा किल्ला होता. मुस्लीम शासक या तोफेला तोफ खीला खिषल म्हणजे किल्ला तोडणारी तोफ असे म्हणायचे.

2.मलिक ये मैदानी तोफ – ही तोफ निजाम शाही काळात अहमदनगर येथे इसवीसनाच्या 1549 मध्ये तयार झाली. या टोफेला मलिक मैदाने तोफ असे म्हणतात. या तोफेच वजन 55 टन असून निजामशाहीतील राजा पुराण शहा याच्याकडे काम करत असलेला तुर्की सरकार दक्खणी याने तांब, लोखंड आणि जस्ताच्या मिश्रणापासून अहमदनगर येथे ही तोफ बनवली आहे.

या तोफेच तोंड उघडलेल्या मगरीच्या जबड्यासारख आहे. मलिक मैदान तोफेची लांबी 14 फूट 4 इंच असून हीचा व्यास 4 फूट 11 इंच आहे.निजामशहाच्या काळात ही तोफ अहमदनगर मधून परांडाचा किल्ल्यावर नेण्यात आली आणि नंतर दक्षिणेमध्ये नेण्यात आली. सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्या शाह बुरुजावर ठेवण्यात आली आहे.

3.जयबान तोफ – आशिया खंडातील सगळ्यात मोठी तोफ म्हणून ज्या टोफेला ओळखलं जातं अशी ही तोफ दुसऱ्या तिसऱ्या सवाई जय सिह यांनी आपल्या राज्याच्या सौरक्षणासाठी हीची निर्मिती केली होती. जयपूर येथील जयगड या किल्यावर आशिया खंडातील ही सगळ्यात मोठी तोफ आहे. या तोफेचा पल्ला अतिशय लांब आहे आणि त्यामुळे होणार नुकसान खूप भयकारी होत की तोफेच्या उल्लेखाने शत्रुची भीतीने गाळण होत असल्याचं ऐकतो.

ही भली मोठी तोफ बनवण्याकरता इ.स.वी 1720 साली या किल्ल्यावरच विशेष कारखाना तयार करण्यात आला. ही तोफ तयार झाल्यानंतर त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.या तोफेमध्ये दारू ठोसून जेव्हा त्याचा मारा करण्यात आला तेव्हा त्या तोफेच्या गोळ्याने तब्बल 35 km चा प्रवास गाठला होता. तो गोळा जिथे पडला तिथल्या जमिनीमध्ये एक भलं मोठं विवर तयार झालं.

कालांतराने त्या विवरामध्ये पाणी साठत गेलं आणि तिथेच आता मोठा जलाशय बघायला मिळतो. ही तोफ जयगड किल्लावर बनवली गेली त्यामुळे या किल्ल्याच्या नावावरून या तोफच नाव ठेवण्यात आल आहे.या तोफेला जयबान तोफ अस नाव देण्यात आल. आमीरच्या जवळ असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ उभी आहे. अरवली पर्वतरांगांमधील जयगड किल्ल्याच्या डोंगरी दरवाज्याजवळ उभा असलेल्या या तोफेची लांबी 31 फूट इतकी आहे. या तोफेच वजन 50 टन पेक्षा जास्त आहे. या तोफेचा उपयोग आजवर एकही युद्धात करण्यात आला नाही.

4. कलाल बांगडी तोफ – जंजिरा किल्ला हा अजिंक्य राहिला या कलाल तोफेमुळे.या तोफेच वैशिष्ट म्हणजे 360 डिग्री मध्ये म्हणजेच गोलाकार फिरवता येते.कलाल बांगडी या तोफेचा पल्ला 12 km एवढा असून ही तोफ पंचधातूपासून बनवलेली आहे.कितीही ऊन असेल तरीही ही तोफ तापत नाही.ही तोफ इतकी जड होती की ही बोटीने आणणे आवश्यक होत.म्हणून ती तुकड्या तुकड्यात आणून इथे जोडण्यात आल होत.

5.मगर तोफ – ही तोफ परंडा किल्ल्यावर आहे.या तोफेला मगर तोफ म्हणण्याचं कारण या तोफेच्या सुरवातीलाच मगरीच तोंड आहे.तोफेची लांबी 17 फूट असून व्यास सुरवातीला 3 फूट आणि शेवटी 3 फूट आणि तोफ गोळ्याचा छिद्राचा व्यास जवळपास पाऊण फूट आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.