मित्रांनो आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पांड्यमिक परिस्थितीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये गरज पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयडी सेंटर मधील राँक ही 48 इतकी आहे. आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करूया..
◆ रॉलटा : ही कंपनी भारतातील सर्वोत्कृष्ट IT कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. या कंपनीची स्थापना 29 जून 1989 करण्यात आली या कंपनीचे फाउंड हे कमल के सिंह आहेत. रॉलटा कंपनीद्वारे आयटी सर्विसेस सेवा दिल्या जातात. कंपनीकडे जवळपास दीड हजार कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेट्वर्थ 4,861 करोड आहे.
◆ ओरॅकल : ओरॅकल फायनान्स सर्विस लिमिटेड या कंपनीची ओरॅकल कॉर्पोरेशन ही एक साहाय्यक कंपनी आहे. ओरॅकल कंपनीत बँकिंग, इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केट या सेवा प्रदान करते. या कंपनीचे मुख्यालय मुंबई मध्ये असून या कंपनीकडे 8818 कर्मचारी आहेत. कंपनीची एकूण संपत्ती 4735 करोड रुपयांच्या जवळपास आहे.
◆मैनडरी : मैनडरी लिमिटेड कंपनी ही भारतीय इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि आऊटसोर्सिंग कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 18 ऑगस्ट 1999 मध्ये करण्यात आली. या कंपनीचे मुख्यालय भारतातील बेंगलोर बरोबर न्यू जर्सी तसेच अनेक देशांमध्ये ही कंपनी कार्यलय आहे. लार्सन अँड टर्बो या समूहाचा एक हिस्सा आहे. या कंपनीकडे 21, 991 कर्मचारी असून या कंपनीचे एकूण नेट वरती 5156 करोडची आहे.
◆ लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक : लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक डिजिटल कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1996 मध्ये झालेली असून जवळपास 30 देशांमध्ये या कंपनीचे संचालक कार्यालय आहे. पूर्वी या कंपनीचे एल अँड टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड असे नाव होतं. 2002 ते बदलून लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक असे करण्यात आले. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीकडे 31,437 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती 8 हजार 824 करोड आहे.
◆Mphasis: Mphasis ही भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांची एक आहे. कंपनी आयटी कन्सल्टींग बरोबर डीपीयुची सेवा प्रदान करते. Mphasis कंपनीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली. त्याच बरोबर या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. त्या कंपनीकडे 22,239 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती 15,917 करोडपती आहे.
◆ टेक महिंद्रा : टेक महिंद्रा लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या आयटी आणि बीपीओ या सेवा प्रदान करते. टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी स्थित आहे. त्याचबरोबर टेक महिंद्रा कंपनीचे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालय आहेत. टेक महिंद्रा कंपनीकडे 1 लाख 25 हजार 236 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती 37 हजार 353 करोड रुपयांच्या जवळपास आहे.
◆ विप्रो : या कंपनीची सुरुवात अजीम प्रेमजी यांच्या वडिलांनी 1949 मध्ये केली होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अजीम प्रेमजी यांनी 1979 मध्ये वेष्टन इंडिया व्हिजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड म्हणून या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनीतील तेल, धुलाई साबण, कंटेनरची कंपनी म्हणून ओळखली जायची. 1980 मध्ये विप्रो कंपनीने आयटी क्षेत्रात 1982 मध्ये या कंपनीने विप्रो प्रॉडक्ट लिमिटेड हे नाव बदलून फक्त विप्रो लिमिटेड असे ठेवले. विप्रो कंपनीकडे 1 लाख 75 हजार पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीकडे 81 हजार 77 करोड रुपये इतकी संपत्ती आहे.
◆ एचसीएल : ही टेक्नॉलॉजी या कंपनीचे सुरुवातीचे 11 ऑगस्ट 1976 मध्ये शिवनाथ यांच्या द्वारे करण्यात आली. ही कंपनी आयटी सर्विसेस आणि कन्सल्टींग सेवा प्रदान करते. याच कंपनीला हिंदुस्तान कम्प्युटरस लिमिटेड असे संबोधले जाते. याचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ही एक सहाय्याक कंपनी असून या कंपनीचे 32 देशांमध्ये कार्यालय आहे. या कंपनीकडे 1 लाख 59 हजार पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 82 हजार 906 करोड इतकी आहे.
◆ इन्फोसिस : इन्फोसिस लिमिटेड मल्टिनॅशनल IT कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय भारतातील बंगलोर या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठे आयटी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे भारतामध्ये 9 विकास केंद्र आहेत तर जगभरात 30 पेक्षा जास्त कार्यालये आहेत. इन्फोसिस कंपनीची स्थापना 2 जुलै 1971 मध्ये येणार नारायण मूर्ती यांच्या बरोबर यांच्यासह 6 मित्रांनी सुरू केली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या कडून 10,000 रुपये घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. इन्फोसिस कंपनीकडे 2 लाख 42 हजार 371 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही त्यांना 92,968 करोड इतकी आहे.
◆ टीसीएस : या कंपनीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून ओळखले जाते. एक सॉफ्टवेअर सर्विसेस कन्सल्टींग कंपनी आहे. ही जगातील सर्वात जास्त मुल्य असणारी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीचे फाउंडर हेच टाटा आहेत. त्या कंपनीची सुरुवात 1968 मध्ये करण्यात आली. या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्राचा मुंबई या ठिकाणी स्थित आहे. तिथेच कंपनीमध्ये भारतातील अन्य कंपनीचा मुकाबले अधिक कर्मचारी काम करतात. यामध्ये जवळपास 4 लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 1 लाख 21 हजार करोड इतकी आहे.
तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात मोठे 10 आयटी कंपन्या बद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला भारतातील कोणकोणत्या आयटी कंपनी बद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.