घरबसल्या जन्माचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र कसे काढावे?।। ऑनलाईन बर्थ सर्टिफिकेट कसे काढायचे याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जन्म प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळेमधील ऍडमिशन असो किंवा नवीन आधार कार्ड काढायचे असो किंवा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड वरील जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी डी.ओ.बी अर्थात जन्माचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

त्यासोबतच शासकीय दाखले जसे की रहिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट इत्यादी दाखले काढायसाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र अनिवार्य असते. तर हे जन्म प्रमाणपत्र आपल्याला आपला जन्म ज्या ठिकाणी झाला त्या संस्थेच्या मार्फत मिळत असते. जन्म जर खेडे गावात झाला असेल तर ग्रामपंचायत मार्फत हे जन्म प्रमाणपत्र मिळते.

जर जन्म हा नगरपालिका मध्ये झाला असेल किंवा तालुका च्या ठिकाणी झाला असेल तर नगरपालिका कडून मिळते. तुमचा जन्म हा मोठ्या सीटी मध्ये असा जिल्हा च्या ठिकाणी झाला असेल तर तुम्हाला हे संबंधित विभागाकडून, म्हणजे महानगरपालिका कडून ते मिळते.

तर हे जन्म प्रमाणपत्र घरी बसल्या ऑनलाईन कसे काढायचे? ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो या अगोदर आपण कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड कसे काढायचे याबाबत संपूर्ण माहिती बघीतले आहे. आज आपण ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे हे शिकणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

मित्रांनो जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल वर सर्च करायचं आहे ‘आपले सरकार’. या ठिकाणी आपले सरकार चे पोर्टल ओपन होईल‌. त्यानंतर तुम्हाला आपले सरकारचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे.

यासाठी न्यू युजर वर क्लिक करून तुम्हाला मोबाईल वर ओटीपी पाठवून स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मदिनांक इत्यादी मेंशन करून, तुम्हाला या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड बनवायचा आहे. तुमचा तो यूजर आयडी पासवर्ड क्रिएट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला आपले सरकार पोर्टल च्या मुखपृष्ठावर यायचे आहे.

आणि आपला या ठिकाणी यूजर आयडी टाकायचा आहे. आणि खाली यूजर पासवर्ड टाकायचा आहे. नंतर तुम्हाला खाली कॅपचा दिसेल, तो त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. आणि आपला जिल्हा निवडून तुम्हाला त्या पोर्टल वरती लॉगिन व्हायचे आहे. त्यानंतर एक टॅब ओपन होईल.

त्यानंतर बघा तुम्हाला डाव्या बाजूला काही मेन्यू दिसेल तर हे जे मेन्यू आहेत, ते राज्य शासनाचे विभाग आहेत. तर त्यावर क्लिक करून तुम्ही त्या संबंधित विभागाचे प्रमाणपत्र आहेत, जे दाखले आहेत किंवा जे परवाना आहे ते तिथं तुम्ही त्या डिपार्टमेंट च्या नावावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी काढू शकता.

या ठिकाणी आपल्याला जन्म प्रमाणपत्र काढायचे आहे. तर हे जन्म प्रमाणपत्र आपल्याला ग्राम विकास व पंचायत राज, या विभागातून मिळणार आहे. तर आपण या डिपार्टमेंटला सिलेक्ट करू. कारण या डिपार्टमेंट कडून आपल्याला बर्थ सर्टिफिकेट किंवा डेथ् सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे.

तर हे सिलेक्ट केल्यानंतर बघा या डिपार्टमेंट अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सेवांची यादी दिसेल. यामध्ये बी.पी.एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. अर्थात दारिद्र्य रेषेखालीचा दाखला, तुम्ही या माध्यमातून काढू शकता. मग तुम्ही जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र काढू शकता.

त्यासोबतच विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अर्थात मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही या मार्फत काढू शकता. त्यासोबत घर नमुना, आठ-अ, आणि पगार जर तुम्हाला चालू नसेल तर तुम्हाला निराधार प्रमाणपत्र देखील या ठिकाणी काढता येईल. नंतर या सूचना बघा. या ठिकाणी आपल्याला जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज करायचा आहे.

म्हणून आपण या ठिकाणी जन्मदाखल्यावर क्लिक करू. तेथे तुम्हाला ज्यांचा जन्म प्राप्त काढायचे आहे, त्या व्यक्तीचं तपशील या ठिकाणी भरायचा आहे. तर प्रथम तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव आणि बाळाचे संपूर्ण नाव, जन्मदिनांक तुम्हाला या ठिकाणी मेंशन करायचे आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे.

हि जी माहित तुम्ही भरत आहे, हि तुमचे जे ग्रामसेवक आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. आणि ग्रामसेवक तुम्ही ज्या ठिकाणी जन्मदिनांक मेंशन केले, त्या जन्मदिनांक वर जाऊन, तुमचं जे सर्टिफिकेट आहे, जी नोंद आहे. त्यावर ते बघून तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट ईशू करणार आहे.

त्यासाठी जन्मतारीख तुमची व्यवस्थित या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर बघा तुमचा ॲप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी सब्मिट होईल. आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करा अशी सूचना मिळेल. तेव्हा तुम्हाला मित्रांनो ऑनलाइन २४ रुपये पे करायचे आहे. हे पेमेंट तुम्ही एटीएम कार्ड, पेटीएम, नेट बँकिंग, फोन पे, गुगल पे मार्फत देखील करू शकता.

नंतर तुमचा फॉर्म हा व्यवस्थित सब्मिट होऊन जाईल. आणि तुम्हाला फॉर्म भरल्याचा अप्लिकेशन नंबर मिळेल. तो अप्लिकेशन नंबर तुम्हाला सेव करायचा आहे. मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म आहे, तो तुमच्या ग्रामसेवकाकडे अग्रेषित केले जाईल. साधारणतः सात दिवसांमध्ये ग्रामसेवकाला यावर ऍक्शन द्यायचे असे निर्देश आहे

. ग्रामसेवक तुमची नोंद ऑनलाइन बघून तुम्हाला या ठिकाणी तुमच जे बर्थ सर्टिफिकेट आहे, हे सात दिवसांमध्ये ईशू करतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आपले सरकार पोर्टल वर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी होम पेज वर डाउनलोड झालेलं दिसेल. तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे.

डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची कलर झेरॉक्स मारायचे आहे मित्रांनो. तर हे सर्टिफिकेट जे आहे, हे कम्प्युटर जनरेटेड असल्यामुळे तुम्हाला यांच्यावर कुठल्याही प्रकारचे सही व शिक्का घ्यायची गरज नाही. याला लॅमिनेशन करून ठेवायचा आहे.अशा प्रकारे तुम्ही देखील, जसं आता आपण काढले तसं तुम्ही देखील तुमच्या घरी बसून हे काढू शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

5 thoughts on “घरबसल्या जन्माचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र कसे काढावे?।। ऑनलाईन बर्थ सर्टिफिकेट कसे काढायचे याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

  1. सांगली सिव्हिल हॉस्पिटल

Comments are closed.