सातोशी नाकामोटो हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? किंवा बिटकॉईन हा शब्द कधी ऐकलाच असेल. कारण 2 ट्रीलीयन डॉलर इंडस्ट्रीचा बिटकॉइन हा खूप मोठा भाग आहे. असे असून देखील बिटकॉइन बद्दल एक प्रचंड मोठं गूढ कायम आहे ते म्हणजे बिटकॉईनची सुरुवात करणारे सातोशी नाकामोटो हे काय आहे? ते दिसतात कसे? चला तर मग जाणून घेऊ..
मुळात बिटकॉईन म्हणजे डिजिटल करन्सी, म्हणजे या करन्सीची प्रत्यक्ष नाणी किंवा नोटा नसतात सगळं काही ऑनलाईन असतं. तसं 100 पैसे मिळून एक रुपया तयार होतो तसा 10 कोटी सातोशी होवून 1 बिटकॉइंन तयार होतो. सातोशी हे नाव आले या बिटकॉइनचा शोध लावणाऱ्या किंवा सुरुवात करणाऱ्या सातोशी नाकामोटो यांच्यावर 2009 मध्ये त्यांनी बिटकॉइन करन्सी नोंद केली.
सातोशी नाकामोटो हे टोपण नाव म्हणजे हे खोटं आहे. काहींच्या मते या शोधामागे एकापेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात आणि म्हणून हे नाव घेण्यात आले. आता पुन्हा एकदा या सातोशी नाकामोटो बद्दल चर्चा सुरू आहे पुन्हा एकदा एका व्यक्ती आपण सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केला. एका व्यक्तीने हा दावा केला पण यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. तर कॅनेडियन बिटकॉइन एक्सपर्ट हे नाकामोटो असल्याचं एका बहुचर्चित डॉक्युमेंट म्हटलं होतं. पण त्यांनी स्वतः त्याचा इन्कार केला. आतापर्यंत अनेकदा असे दावे करण्यात आलेले आहेत. आपणास सातोशी नाकामोटो दावा ऑस्ट्रेलियातले कम्प्युटर शास्त्रज्ञनी केला होता.
तसेच अनेक लोक एलॉन मस्क हेच सातोशी नाकामोटो या नावाचा चेहरा असल्याचा दावा मस्क यांच्या एका कर्मचाऱ्यांनी केला होता. पण ही गोष्ट फेटाळून लावली. तर नाकामोटो या नावामागचा चेहरा समोर न आल्याने याबद्दल कुतूहल आहेत, पण त्याहीपेक्षा मोठे कुतुहल आहे ते या नाकामोटोच्या प्रचंड संपत्तीमुळे. जर या व्यक्ती अजूनही त्यांच्या बिटकॉइंन वॉलेटचा ताबा असेल तर या बिटकॉइंसच आजच मुल्य एकूण 69 अब्ज डॉलरच्या घरात.
यानुसार, सातोशी नाकामोटो आजच्या घडीला जगातील 20 व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती असू शकते आणि कदाचित म्हणूनच या व्यक्तीने आपली गुप्त ठेवलेले आहे. कारण व्यक्ती कोण आहे? हे सापडलं तर ती कोण आहे? त्यांचे आयुष्य कसा आहे? चारित्र्य कसा आहे? या सगळ्या गोष्टींचे छाननी होईल आणि याचे परिणाम बिटकॉइन वरती होतील. एकूणच बिटकॉईनचे सध्याच मूल्य हे गुगल पेक्षा देखील जास्त आहे आणि यामध्ये इतकी मोठी भूमिका बजावणारा माणूस कोण आहे? हे आपल्याला माहिती नाही.
अनेकांच्या मते, या व्यक्तीची ओळख गुप्त असल्याने बिटकॉइन बद्दलचे आकर्षण कायम आहे आणि आणि करन्सीची ताकद अजूनही टिकून आहे.
पण ससेक्स विद्यापीठाच्या फायनान्सच्या प्राध्यापक अलेक्झांडर यांचा मत आहे की, सातोशी नाकामोटोच्या रहस्यामुळे क्रिप्टो करेंसीमुळे अर्थव्यवस्थेच्या कामात कसा अडथळा निर्माण होऊ शकतो ? यासारख्या अधिक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष विचलित होतं.