2021 मध्ये भारतीय नागरिकांनी स्विस बँकेत जमा केले 30,500 कोटी रुपये. ही सर्वच रक्कम ‘ब्लॅक मनी’ आहे का?

अर्थकारण आंतरराष्ट्रीय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

2021 मध्ये भारतीयांनी स्विस बँकांमध्ये खूप पैसा जमा केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतीयांनी स्विस बँकांमध्ये 50 टक्के जास्त पैसे जमा केले आहेत. 2021 मध्ये भारतीयांनी 3.83 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 30 हजार 500 कोटी रुपये स्विस बँकांमध्ये जमा केले. ही रक्कम 14 वर्षांतील सर्वाधिक आहे. दुसरीकडे 2020 बद्दल बोलायचे झाले तर भारतीयांनी या वर्षी फक्त 20 हजार 700 कोटी जमा केले होते. 2006 मध्ये स्विस बँकेत भारतीयांच्या सर्वाधिक 52 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या.

पैसे जमा करण्यात भारत 44व्या स्थानावर : 

सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंड म्हणजेच स्विस नॅशनल बँकेने (SNB) जारी केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, स्विस बँकेतील भारतीयांचे बचत खाते आणि जमा खात्यात जमा असलेली रक्कम ही 4800 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतीय अनेक माध्यमातून स्विस बँकांमध्ये पैसे जमा करतात. यामध्ये बँका, ट्रस्ट, रोख आणि ग्राहकांच्या ठेवींचा समावेश आहे. स्विस नॅशनल बँकेने म्हटले आहे की 2022 च्या अखेरीस भारतीय ग्राहकांवर 30,839 कोटी रुपयांचे दायित्व होते. स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्याच्या बाबतीत भारत 44 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या बाबतीत ब्रिटन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

स्विस बँकेतील सर्वच रक्कम ‘ब्लॅक मनी’ आहे का? 

स्विस बँकेत भारतीयांचा जमा झालेला पैसा हा काळा पैसा नाही. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ, पण आधी स्विस बँका काय आहेत हे समजून घेऊ. स्वित्झर्लंडमध्ये 400 पेक्षा जास्त बँका आहेत. या सर्व बँकांना स्विस फेडरल बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्याच्या कलम 47 अंतर्गत बँक खाती उघडण्याचा अधिकार आहे. या बँकांनी गुप्तता काटेकोरपणे पाळली. त्यानुसार स्वित्झर्लंडमध्ये कोणी गुन्हा केला नसेल तर बँक त्या व्यक्तीच्या खात्या बाबत कोणतीही माहिती कोणत्याच सरकारला देत नाही. स्विस सरकारला देखील नाही.

स्विस बँक खाती सर्वात सुरक्षित मानली जातात. बँकेतील सामान्य कर्मचाऱ्यांनाही हे खाते कोणत्या व्यक्तीचे आहे, याची माहिती नसते. या संदर्भात स्विस बँकेने हा काळा पैसा नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यामध्ये भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतर लोकांनी स्विस बँकेत इतर देशांतून पाठवलेल्या पैशांचाही समावेश आहे. 

काळ्या पैशांबाबत सरकारने कडक केले आहेत नियम :

याबाबत कर तज्ञांचे मत देखील असे आहे की हा सर्व पैसा काळा पैसा नाही. काही पैशांचा स्रोत माहीत नसला तरी काळ्या पैशाबाबत भारत सरकारने नियम कडक केले आहेत. सध्या, आयकर रिटर्न भरताना, लोकांना लिबरालाइज्ड रेमिटेंस स्कीम (LRS) अंतर्गत त्यांच्या परदेशी व्यवहारांची माहिती देणे बंधनकारक आहे. RBI च्या मते, एका आर्थिक वर्षात $2.5 लाख (सुमारे 1 कोटी 95 लाख रुपये) चे विदेशी व्यवहार केले जाऊ शकतात. हा पैसा परदेशी शेअर बाजार, बाँड आणि ईटीएफमध्ये गुंतवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, भारतीय करदात्यांनी रिटर्न भरताना त्यांच्या परदेशी गुंतवणुकीची माहिती देणे आवश्यक आहे. 

भारत आणि स्विस सरकार मध्ये करार :

काळा पैसा रोखण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये काय व्यवस्था करण्यात आली आहे ते आता जाणून घेऊया. खरं तर, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात करविषयक माहितीची देवाणघेवाण 2018 पासून सुरू आहे. या अंतर्गत, 2018 पासून स्विस बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये खाती असलेल्या सर्व भारतीय रहिवाशांची संपूर्ण माहिती सप्टेंबर 2019 मध्ये प्रथम भारतीय कर अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. याव्यतिरिक्त, स्वित्झर्लंड सक्रियपणे भारतीयांच्या खात्यांचे तपशील सामायिक करत आहे ज्यांच्याकडे भारत सरकारला पुरावे आहेत की त्या व्यक्तीने चुकीच्या कृतीद्वारे पैसे कमावले आहेत आणि ते स्विस बँकेत जमा केले आहेत. आतापर्यंत शेकडो प्रकरणांमध्ये अशा माहितीची देवाणघेवाण झाली आहे. स्विस बँकेत पैसे असलेल्या टॉप टेन देशांच्या यादीत वेस्ट इंडीज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग, बहामा, नेदरलँड, केमन आयलंड आणि सायप्रस यांचा समावेश आहे. 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.