नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
बोल्हाई मटन माहीत नाही असा व्यक्ती नाही.आपलं पुणे म्हणजे जग असत अस काही नसतं. पुणे जिल्हा आणि आजूबाजूचा भाग सोडला तर लोकांना बोल्हाई मटन नावांची भानगडच माहित नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लोक जेव्हा पुणेमध्ये येतात तेव्हा हॉटेलमध्ये त्यांना “बोल्हाई मटन भेटेल” अशी पाटी लावलेली दिसते.
मग ते चौकशी करतात मग त्यांना समजत की ही वेगळी कोणती तरी भानगड आहे. विशेष म्हणजे पुण्यातील लोक सोडली तर त्यांना बोल्हाई मटन काय असते ते माहीत नसतं. तर बोल्हाई म्हणजे मेंढीचे मटन. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये बोकड कापलं जात पण ज्यांना बोल्हाई असत ते बोकडाच मटन खात नाही. बोकडच मटन न खाण्यामागे ते सांगतात की त्यांना बोल्हाई आहे.
बोल्हाई हे देवीच मंदिर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई इथे प्रसिद्ध मंदिर आहे. ही देवी ज्यांना असते ते बोकडाचं मटन चालत नाही तर ते बोकडाच मटन ज्या भांड्यात केलं असेल अशी भांडी देखील ते वापरत नाहीत. कधी जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये बोकडाच मटन आणि मेंढीच मटन एकत्रित मिळत असेल तर अशा हॉटेलमध्ये देखील ह्या व्यक्ती जात नाहीत.
थोडक्यात काय तर बोकडाच मटन हा विषय फक्त न खाण्यापुरता मर्यादित नसतो तर तो विषय शिवाशिव असा प्रकार पाळण्यात येतो. पुणेच्या आसपासच्या भागात बोल्हाई नावावरून अनेक दुकान आहेत.बऱ्याच लोकांनी घराला सुद्धा बोल्हाई अस नाव दिलं आहे. बोल्हाई देवाचं प्रसिध्द स्थान वाडेबोल्हाई इथे आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तजन इथे दर्शनाला येतात. मंदिराच्या आवारात पांडव कालीन तळ असून त्याने हात पाय धुतल्याने त्वचेचे रोग विकार दुर होतात अशी श्रद्धा आहे.चुकून बोकडाच मटन कोणी खाल्ल तर अंगावर चट्टे उठतात त्यांनी या पाण्याने हाथ पाय धुतल्यावर मनोभावे माफी मागितल्यानंतर हे चट्टे दुर होतात अशी श्रद्धा आहे.
आश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरते. बोल्हाई पार्वतीचा अवतार समजली जाते त्यामुळे देवीला बोकड कापले जात नाही. या कारणाने भक्त गणांना बोकडाच मटन निशब्द असते. इथलं मंदिर पांडव कालीन आहे. बोल्हाई देवीचा ओरांडा इथे असतो.यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून त्यांचं माहेर घर असणाऱ्या डोंगरावरच्या मंदिराकडे वाजत गाजत पुजारी जातात तेव्हा आरती घेऊन पुजाऱ्यांना त्याला ओलांडून जाणे ही प्रथा असते.
दोन्ही बाजूने रस्त्यावर लोटांगण घालतात व पुजारी त्यांना ओलांडून जातात त्याला देवीचा ओरांडा म्हंटले जाते. देवीला बोकडाच मटन चालत नाही.त्यामुळे भक्तगनसुद्धा बोकडाच मटन खात नाहीत. ही प्रथा नेमकी कशी आली असेल? आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना भेटलो, ज्यांना देवी आहे व ज्यांना देवी नाही या लोकांना भेटलो.
तर प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की,ही एक प्रथा आहे आणि आम्ही ती पाळतो. एखादया दुसऱ्या व्यक्तीला बोकडाच मटन खाल्ल्यानंतर त्यांच्या अंगावर उठलेल्या चट्ट्यानबद्दल सुद्धा सांगितलं गेलं. अनेकांनी प्रयोग म्हणून बोकडाच मटन खाल्ल पण चट्टे उठल्यानंतर देवीचा प्रकोप समजला आणि माफी मागितल्याची कबुलीदेखील दिली.म्हणून हा विषय काही प्राध्यापकांना, जेष्ठ पत्रकार यांना विचारल्यानंतर त्यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या.
1.भौगोलिक परिसरचा अभ्यास करता, पूर्वीच्या काळी इथे मेंढ्यांचे प्रमाण जास्त असावे आणि शेळ्या कमी असाव्यात. शेळी ही गरीबाची गाय समजली जाते.हा परिसर मुख्यतः डोंगराळ आहे.इथे शेळी वाचली तर एका संसाराचा गाडा हाकला जाऊ शकतो.अनेक प्रथा परंपरांचा संबंध हा मानवाच्या जीवनात तयार होतात.त्याची गरज म्हणून ही काळाची गरज म्हणून समोर आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत, पण हा एक अंदाज आहे.
2.दुसरी शक्यता अशी पण सांगता येते की आनुवंशिक जीन्स तयार होतात. त्या त्या भागामुळे त्या त्या परिसरातील व्यक्तींना एलार्जी असू शकते.तिथल्या वातावरणामुळे सर्व लोकांच्या जीन्समध्ये असे बदल घडून येतात. बोकडाचे मटण खाल्ल्यामुळे तिथेल परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उठतात,याच दुसर काहीतरी कारण असावं ही पण एक शक्यताच होती. याच ठोस कारण कोणाला सापडलं नाही.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.