नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
नुकताच जागतिक कॅन्सर दिवस झाला. कॅन्सर हा शब्दच मुळातच कुणालाही धडकी भरवण्यासाठी पुरेसा आहे. स्वत:च्या शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन शरीर पोखरणारा आजार म्हणजे कॅन्सर. अजूनही जगासमोर कॅन्सरसाठी ठोस औषधोपचार आले नाहीत. किंवा या कॅन्सरची अनेक कारणं अजूनही अज्ञात आहेत. त्यामुळेच दरवर्षी अनेक लोक कॅन्सरने जीव गमावतात. अनेकदा जीवनशैलीशी निगडीत बदलांमुळे देखील कॅन्सरसारखा नकोसा आजार शरीरात ठाण मांडून बसतो. कॅन्सरच्या कचाट्यात सर्वसामान्य लोकच नाही तर अनेक सेलिब्रिटीही अडकले आहेत. काहींनी या लढाईत प्राण गमावले तर काहींनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिला. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी.
सोनाली बेंद्रे- सोनालीला हाय ग्रेड कॅन्सरचं निदान झालं होतं. देखण्या अभिनेत्रीला कॅन्सरच्या कचाट्यात पाहणं तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी होतं. न्युयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया आणि काही महिने उपचारानंतर सोनाली भारतात परतली होती.
ताहिरा कश्यप – लेखिका निर्माता ताहिरा कश्यपने कॅन्सरशी दिलेला लढा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. ताहिराने ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वी लढा दिला होता.
अनुराग बासू- दिग्दर्शक अनुराग बासू यांनी कॅन्सरवर केलेली मात कौतुकास्पद आहे. 2004 मध्ये अनुराग यांना ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना 2-3 महिने आयुष्य बाकी आहे असंच सांगितलं होतं. या दरम्यानचे 17 दिवस ते व्हेंटिलेटरवर देखील होते. पण परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी दोन सिनेमेही लिहिले. जवळपास तीन वर्षं त्यांनी कॅन्सरशी जोरदार झुंज दिली.
मनीषा कोईराला – गोड चेह-याच्या या अभिनेत्रीनेही तिच्या आयुष्यात कॅन्सरशी चिवटपणे झुंज दिली आहे. मनीषाला 2012मध्ये गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. यानंतर सहा महिने तिने परदेशी उपचार घेतले. तिला यातून बरं होण्यासाठी जवळपास 2015 हे साल उजाडावं लागलं. तिच्या एकंदरीत प्रवासावर आणि बरं होण्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे.
ऋषी कपूर – एकीकडे कॅन्सरवर मात केलेले कलाकार आहेत तर कॅन्सरने काही गुणी कलाकारांना आपल्यातून नेलं. त्यापैकीच एक आहेत ऋषी कपूर. ऋषी कपूर यांना ल्युकेमिया झाला होता. त्यासोबत त्यांनी झुंज दिली पण अखेर कॅन्सरने त्यांना आपल्यातून नेलं.
इरफान खान – कॅन्सरने आपल्यातून नेलेला गुणी कलाकार म्हणजे इरफान खान. इरफानला दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर झाला होता. याच्यावर त्याने परदेशी उपचारही घेतले. पण अखेर कॅन्सरने इरफानला आपल्यातून कायमचं हिरावून नेलं.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.