स्तनाचा कर्करोग बहुतेक वेळा स्तनाच्या गाठीशी संबंधित असतो. तथापि, तुमच्या विशिष्ट प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर अवलंबून तुमची लक्षणे बदलू शकतात. बऱ्याच रुग्णांना गाठी असतात हे खरे असले तरी, गाठ नसतानाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
अभिनेत्री हिना खानने तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचे सांगितले आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून वतीने या विषयी माहिती दिली. तिने इंस्टाग्राम शेअर करताना म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबत काही अफवा उठत आहेत. त्यामुळे हीना होलेक्स आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या याची काळजी करणाऱ्या सोबत एक महत्त्वाची माहिती शेअर करायची आहे.
असे म्हणत तिने तिला स्तनांचा कर्करोग झाला आहे याची माहिती दिली आणि पुढेही लिहिले की, स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले असतानाही मी उत्तम आहे. मी कणखर आहे आणि यातून बाहेर पडेल असा विश्वासही आहे. त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत यातून बाहेर पडण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व मी करेन, हे पोस्टमध्ये लिहिले आहे.
तर मग चला तर जाणून घेऊ की, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कशी ओळखायची? यामध्ये प्रामुख्याने स्तनामध्ये गाठ असणं हे ब्रेस्ट कॅन्सरच्या सामान्य लक्षणं पैकी एक आहे. तर स्तनामध्ये अशा प्रकारची गाठ जाणवली तर लगेच मेडिकल तपासणी असा सल्ला डॉक्टर देतात. स्तनात कुठल्याही प्रकारची सूज आढळून आली तर त्याविषयी बेजबाबदारपणा बाळगता कामा नये. ही सूज स्तनाच्या एका बाजूला किंवा पूर्ण स्तनाला असल्यास तर त्याची काळजी घेतली पाहिजे.
तसेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला म्हणजे त्या ठिकाणी जळजळ होणे, लाल होणे किंवा त्याच्याकडे त्वचेत बदल जाणवणे असे बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणे सांगितले जातात.
ज्यामध्ये त्वचा राठ होणं, खडी सदृश्य खाज, स्तनाच्या भोवतीची त्वचा तडकणं, स्तनामधून स्राव होणे, खाज येणं किंवा वेदना होणं, आक्रसले स्तन, अल्सरसारखी त्वचा होणं, त्वचा आकारातील कडक गाठ असं काही वेगळं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.