आपल्या कुटुंबातील काही लोकांनी प्रश्न विचारला. सर जर आपला ब्रोकर पळून गेला तर? पळून गेला म्हणजे तो कर्जबाजारी झाला तर? किंवा कंपनी बंद करून गायब झाला तर? तर काय करायचं आपण घेतलेल्या शेअर्सच काय होणार? काही लोक विचारतात आपण जे डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करतोय ज्यामध्ये बॅंकेचे डिटेल्स असतात.
आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, मोबाईल नंबर सर्व काही असतं. त्याचा गैरवापर झाला तर! खूप प्रॉब्लेम पुढे होऊ शकतात, याची सविस्तर चर्चा पुढे करणार आहोत. आता डिमॅट अकाउंट कोण ओपन करून देतो ब्रोकर देतो जर शेअर मार्केट मध्ये काम करायच असेल तर ब्रोकर शिवाय पर्याय नाही.
डायरेक्ट स्वतः शेअर विकत घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी ब्रोकरकडे अकाउंट हे ओपन करावच लागत. सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर सांगतो “जर तुम्ही योग्य ब्रोकर निवडला नाही तर” तो चुकीचा ब्रोकर जरूर तुमच्या डॉक्युमेंट्सचा अयोग्य वापर करू शकतो तुमच्या शेअर चा अयोग्य वापर करू शकतो.
तुमच्या अकाउंट मध्ये असलेले पैसे तो वापरू शकतो, एवढं सगळं करू शकतो याचा अर्थ तो सर्व सर्व काही घेऊन पळूनही जाऊ शकतो. म्हणून योग्य ब्रोकन निवडणे खूप गरजेचे असते. आता तो कसा निवडायचा सुरुवातीला पाहू. काही ब्रोकर काय करायचे तुमच्या त्या डिमॅट अकाउंट मधून जे काही रक्कम असेल ती रक्कम वापरून ते स्वतः ट्रेड करायचे.
आता हे पैसे वापरले तर काय होणार जनता तर मूर्खच आहे. त्यांना आपण फसवू शकतो हा गोड गैरसमज त्यांचा होता, बरोबर ना !! त्यांनाही जेव्हा सीबी च्या निदर्शनास आले तेव्हा सीबी ने त्यांच्यासाठी कडक नियम बनवले. असं करणाऱ्या ब्रोकर विरोधात कारवाई सुद्धा केली.
या बेकायदेशीर मार्गातील पळवाट काढण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबला तो म्हणजे POA-Power Of Attorney म्हणजे काय असतं? ज्यावेळी डिमॅट अकाउंट ओपन करता त्याच्या पहिल्या दिवसापासूनच सकाळी उठल्या उठल्या POA नावानं घंटा वाजते रोज ई-मेल येतो या POA ची प्रिंट आउट घेउन त्यावर सही करायची असते
आणि तो पेपर घेऊन ब्रोकरकडे सुपूर्त करायचा असतो. यामध्ये काही असे नियम अटी ॲड केलेला असतात. ज्यामधून काही बेकायदेशीर कृत्य करायला त्यांना परवानगी सुद्धा मिळते. काही ब्रोकर अशा प्रकारचे फसवण्याचे काम करतात सगळेच करतात असे नाही म्हणून, योग्य ब्रोकर ची निवड करणे गरजेचे असते
जेव्हा तुम्ही योग्य ब्रोकर कडे अकाउंट ओपन करतात तेव्हा त्याच्या ॲप मधून किंवा वेबसाईट मधून लोगिन केल्यानंतर प्रत्येक क्षणाची माहिती तुम्हाला स्क्रीन वर दिसते. तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे शेअर्स तुमच्या अकाउंट मध्ये किती आहे “प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट डाउनलोड” करून तुमची सर्व हिस्टरी चेक करू शकतात.
यामध्ये सविस्तर माहिती मिळते दररोज किती शेअर्स तुम्ही बाय केले आणि सेल्स केले अकाऊंट मध्ये तुम्ही किती बॅलन्स ॲड केला किंवा विड्रॉ केला हा सर्व डाटा फक्त मोठ्या “रिपोर्टटेड ब्रोकन फ्रॉम प्रोवाईड” करतात जे छोटी ब्रोकन असतात, ते स्टेटमेंट लाईव्ह देत नाही हिडन चार्जेस सुद्धा अप्लाय करतात आता या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे.
“गॉड फादर म्हणजे NSE किंवा BSE”- “national stock exchange and Bombay stock एक्सचंगे” – जेव्हा आपण शेअर्सची खरेदी करतो तेव्हा ते शेअर्स NSE किंवा BSE मध्ये रजिस्टर होतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी CDSL नी उत्तम पर्याय शोधला. तो म्हणजे TPIN चा आता CDSL म्हणजे काय ते म्हणजे central Depository Services Limited यांनी एक नवीन नियम बनवला जर तुम्हाला शेयर्स विकायचे असतील तर, TPIN inter करावा लागेल आता हा TPIN काय आहे? याची माहिती तुमच्या ब्रोकरकडे नसते.
फक्त तुमच्याकडेच उपलब्ध असते त्यामुळे हा TPIN तुमच्या ब्रोकर सोबत कधी शेअर करू नका त्याच्यामुळे अजून जास्त सिक्युरीटी वाढते त्यांच्यापुढे काही महान ब्रोकर असतात. त्यांना पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही ट्रेड करायला हव आणि जेवढ तुम्ही ट्रेडिंग जास्त कराल तेवढ त्यांना जास्त कमिशन मिळत हे सोपं समीकरण आहे. मग ज्या लोकांना शेअर्स मार्केट बद्दल काहीच माहिती नसते. अश्या लोकांना हे ब्रोकर टीप घेऊन फसवण्याचे काम करतात.
आता टीप हि नेहमी कापडयाला मारली जाते, नाहीतर हॉटेल मध्ये मिळते. ती शेअर्स मार्केट मध्ये चालत नाहीत. तुम्हाला सांगतात आम्ही तुम्हाला टीप देऊ तुम्हाला सांगू कोणता शेअर्स कधी buy करायचा कधी सेल करायचा. फक्त तुम्ही आम्ही सांगेल तस करायचं. खूप पैसे तुम्हाला मिळू शकतात.
जर हा मूर्खपणा तुम्ही सुद्धा करत असताल, तर आजच सावध व्हा. जर तुम्हाला शेअर्स मार्केट मध्ये यशस्वी व्हायच असेल. तर स्वत: शेअर्स मार्केट मधील माहिती मिळवायला हवी. स्वतः ट्रेडिंग करायला हवं तरच या मधून प्रॉफिट मिळू शकत. दुसऱ्याच्या भरवश्यावर ट्रेडिंग करता येत नाही.
जर एखादा ब्रोकर तुमच्या इच्छे विरुद्ध टीप प्रोवाइड करत असेल. ट्रेडिंग करण्यासाठी प्रवृत्त करत असेल. त्याची तक्रार सेबीच्या वेबसाईट वर तुम्ही करू शकता. तुमच्या माहिती साठी सेबी अश्या लोकांन विरुद्ध लगेच ऍक्शन घेतो आणि कदाचित त्या ब्रोकरचे लायसन्स सुद्धा जप्त होण्याची शक्यता असते. सेबी ह्या सर्व ब्रोकरचे अकाउंट चेक करते.
ब्रोकरच्या फायनांस वर नजर ठेवते. त्या मूळे कोणीही उठून ब्रोकर बनू शकत नाही. त्यासाठी खुप काही कम्प्लाईन्टसना पूर्ण कराव लागत.सोबतच एक मोठी अमाऊंट डेपोसिट सुद्धा करावी लागते आणि हे डेपोसिट सेबी स्वतः कडे ठेवते. त्याचा वापर ब्रोकरला करता येत नाही. म्हणून कोणीही उठला आणि ब्रोकर बनला हे शक्य नसते.
जर यातुनच कोणी चुकीच काम करणारा ब्रोकर सापडला. तर त्याला कायमच बॅन करण्यापासून कायदेशिर कारवाई करण्या पर्यंत सेबी कडे अधिकार असतात. म्हणून योग्य ब्रोकर निवडण्यासाठी सर्वात पाहिलं एक गोष्ट पहा. ती म्हणजे ब्रोकर ची सेबी रेजिस्ट्रेशन आहे का ?
आता आपण उदाहरणं पाहणार आहोत “एन्जेल ब्रोकिंग” या कंपनीच आता हि सुद्धा एक ब्रोकिंग फॉर्म आहे. त्यांच्या वेबसाइट वर गेल्यावर सर्वात खाली सेबी रेजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळतो. आता हा नंबर खरा कि खोटा हे कस चेक करायच ? कोणीही कोणताही नंबर टाकेल. मग आपण काय करायच.
त्या साठी तुम्हाला जावं लागेल. सेबी च्या वेबसाइटवर ज्या रेजिस्ट्रेशन नंबर त्या सेबी च्या वेबसाइटवर पेस्ट कराल त्यावेळी संपूर्ण माहिती मिळते. ब्रोकर च नाव, एन्जेल ब्रोकिंग आता हे नाव आणि तुम्ही अकाउंट ओपन करणाऱ्या ब्रोकर च नाव दोन्ही एकच आहे का हे सुद्धा पाहणे खुप गरजेचे असते. कारण बऱ्याच कंपन्या काय करतात.
रेजिस्ट्रेशन एका नावाने आणि वर्क तिसऱ्याच नावाने त्या मुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. कदाचित काही कंपन्या दुसऱ्याचा रेजिस्ट्रेशन नंबर स्वतःच्य वेबसाइट वर ऍड करतात. त्यामुळे तुम्हाला खरंच वाटत हि कंपनी रेजिस्ट्रेर आहे. म्हणून हे चेक करण खुप गरजेचं असत.
त्याच्या हि पुढे जाऊन त्याचा हि ई-मेल ऍड्रेस असतो, कॉन्टॅक्ट नंबर असतो, रेजिस्ट्रेशन नंबर असतो. ऍड्रेस सुद्धा असतो. आणि एक्सचेज नेम सुद्धा असतो. अगदी याच प्रमाणे आपण झिरोधा कंपनीचा सुद्धा रेजिस्ट्रेशन नंबर चेक करू शकतो. झिरोधाच्या वेबसाइटवरुन त्याचा सेबी रेजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आणि सेबीच्या वेबसाइटवर पेस्ट करायचा.
सेम एन्जेल ब्रोकिंग प्रमाणेच तुम्हांला हिथे सगळी माहिती पाहायला मिळते. हि सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. ओक्स्टॉक असेल किंवा इतर कोणताही रेपुटेड ब्रोकर असेल त्याची माहिती तुम्ही बघू शकता. कारण हे सर्व रेपुटेड ब्रोकर आहेत. आता सर्वात मह्त्वाच असत तुमच्या कडून वसुल केले जाणारे पैसे.
वसुल म्हंटल कि मर्डर केल्या सारखं वाटतं ना. अकाउंट ओपनिंग चार्जेस असतील, ते तुमच्या कडून किती घेतले जातात. जेवढे तुम्हाला सांगितले तेवढेच घेतले जातात का? हे सुद्धा पाहणे खूप गरजेचे असते. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळेल. पेपर वर एक आणि अकाउंट वर एक, म्हणजेच सांगितलं जाते दोनशे रुपये आणि घेतले जातात पाचशे रुपये. असं घडतंय का हे सुद्धा पाहावं लागेल.आणि हो डिम्यान्ट अकाउंट सुद्ध् ओपन करू शकतो. त्यानंतर पाहावे लागतात.
ब्रोकिंग चार्जेस त्याला आपण ब्रोकरेज म्हणतो . तुम्ही करत असलेल्या क्रिएटिंग च्या बदल्यात काही रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाते. आता वसूल कशाला म्हणतात? जी रक्कम तुमच्या मनाविरुद्ध तुमच्याकडून काढून घेतले जाते त्याला आपण वसुली म्हणतो. जसे भाई लोक वसुली करतात बिलकुल सेम धंदा हे भाई मात्र तुम्ही जेवढं ट्रेडिंग कराल तेवढी परसेंटेज तुमच्याकडून वसूल करतात. म्हणून आपण त्याला वसुली म्हणतो. म्हणून तुमचं डिस्काउंट ब्रोकरकडे अकाउंट असणे गरजेचे असते.
कारण डिलेव्हरी त्यांच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट केली जाते इंटर आयडी साठी फक्त वीस रुपये चार्ज केली जाते. जर तुम्हाला जाणुन घेतलं नसेल कोणता ब्रोकर किती चार्ज करतो? डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय? यांच्यामध्ये काय फरक असतो ? तर ते लवकरात लवकर जाणून घ्या. ए.एम.सी ऍनिवल मेंटेनन्स चार्ज जो वर्षाला तीनशे रुपये प्लस जीएसटी चार्ज करतो. जे डिस्काउंट ब्रोकर आहेत ते ऑल मोस्ट याच रेट मध्ये तुम्हाला चार्ज करतात सोबतच डिलिव्हरी कम्प्लीट फ्री असते.
आता डिलिव्हरी म्हणजे काय? जर तुम्ही एखादा शेअर्स आज buy करून उद्या परवा किंवा दहा वर्षांनी सुद्धा विकणार असाल तर त्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी तुमच्याकडून पैसे घेतले जात नाही ब्रोकरेज घेतले जात नाही यालाच म्हणतात फ्री डिलिव्हरी. आता सर्व गोष्टी सांगता येत नाही आणि करता येत नाही असं जर होत असेल तर मात्र तुमचा ब्रोकर नक्कीच गडबड करतोय म्हणून, वेळोवेळी हे सर्व चेक करणे गरजेचे असते.
तुमचं लॉस आणि प्रॉफिट स्टेटमेंट असेल किंवा ट्रेडिंग डॅश स्पोर्ट वर दिसणाऱ्या अकाउंट डिटेल्स असतील त्या चेक करत रहाव्यात. कारण झिरोधा एंजल ब्रोकिंग याचं काय डेस्ट वाटतं त्यांचे सर्व रिपोर्ट प्रत्येक सेकंदाला अपडेट होतात, म्हणजेच आज ट्रेंडिंग केलं आणि महिन्यांनी त्याचा रिपोर्ट आला असे होत नाही. लाईव्ह सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्यामुळे फ्रॉड होणे खूप कठीण असते.
जर एखाद्या ब्रोकरने तुमची फसवणूक केली, तर काय करायचं तर सेबीकडे तुम्ही लवकरात लवकर तक्रार करू शकतात. ज्या बदल्यात पंधरा लाखापर्यंत त्याची परतफेड मिळू शकते. ज्याला इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड म्हटले जाते. पण ही तक्रार लवकरात लवकर करावे लागते.
जर तक्रार करण्यासाठी वेळ झाला. तर हे पैसे परत मिळण्यासाठी सेबीयाच्यावर विचार करून ठरवू शकते ,की ही रक्कम तुम्हाला परत करायची की, नाही एवढं सगळं करुन सुद्धा तुमची फसवणूक झाली, आणि डिमॅट अकाउंट या कंपनीकडे आहे. ती कंपनी बंद पडली तर काय करायचं कितीही चांगला ब्रोकर असला तरीही काही होऊ शकतो मग आशा वेळी काय होतं. तुमचे सर्व स्टॉक सी डी एस एल किंवा एन एस डी एल कडे सेव्ह केलेले असतात आता झिरोधा एंजल ब्रोकिंग या सर्व मोठमोठ्या कंपन्या त्यांचे स्टॉक सी.डी.एस.एल किंवा एन.एस.डी. एल कडे स्टोर करतात. त्यामुळे त्या शेरला कोणताही धोका नसतो. जरी हा ब्रोकर कंपनी बंद करून पळून गेला.
तरी हे सर्व शेअर्स एन एस डी एल कडून दुसऱ्या डिमॅट अकाउंट मध्ये म्हणजेच वेगळ्या ब्रोकरच्या डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर करता येतात.आता जर तुम्ही एखाद्या छोट्या ब्रोकरकडे जॉईन असाल जो कंपलाईंस फॉलो करत नाही किंवा ती कंपनी तुम्हाला सुरक्षित वाटत नाही.
अशा ब्रोकर कडून तुमचे शेअर्स ट्रान्सफर सुद्धा करता येतात. तेही वेगळ्या ब्रोकरकडे म्हणजेच एका ब्रोकर कडून दुसऱ्या ब्रोकरकडे आपण उडी मारू शकतो.ते कस हे जाणून घ्यायचं असेल तर त्यामुळे लवकरात लवकर रेपुटेड ब्रोकर कडे अकाउंट ओपन करा आणि ट्रेंडिंग करायला सुरुवात करा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.