नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
पावसाळा जवळ आला आहे. अश्यामद्धे आपल्या वाहनांची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. आपण मागील काही वर्षांपासून पावसाचा थैमान अनेक व्हिडिओ मधून पाहिला असेलच. पावसाळ्यात पडणारा पाऊस, नद्यांची वाढणारी पातळी , शहरांमधून वाहणारे पाणी असे काहीसे चित्र दर वर्षी भारतात आणि महाराष्ट्रात दिसतच आहे. यामध्ये शेतीचे नुकसान होते, घरांचे नुकसान होते. सरकार द्वारे शेतकर्यांना मदत मिळाल्याचे आपण पाहिले आहे, गावा-शहरातील घरांचे नुकसान झाल्यावरही काही प्रमाणात सरकार कडून मदत मिळते. पण वाहनांचे काय? पुरामद्धे वाहून गेलेले वाहने, पुराचे पाणी इंजिन मध्ये जाऊन खराब झालेली वाहने, एखादे झाड गाडीवर पडून झालेले नुकसान यांचे काय? यांची नुकसान भरपाई कशी मिळेल ? हे आणि असे बर्याच प्रश्नांचे उत्तर आज आपण या लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न करू. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
एक काळ होता, जेंव्हा पावसाळ्यात मुंबई मधील रस्ते, घरे पाण्याखाली गेलेली दिसत असे. पण मागील काही वर्षांपासून पुराचे हे चित्र महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये डिसौन येत आहे. 2019 सालची सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थिती आपण सर्वांनीच पाहिली आहे. दर वर्षी पुराचे हे चित्र अधिक भयावह होत चालले आहे. अश्या महापूरामध्ये होणारे नुकसान हे कधीही न भरून निघणारे आहे.
शासन वाहनांची नुकसान भरपाई देते का? :
पावसाळ्यात पुराचे पाणी लोकवस्तीत पसरल्यानंतर शासन सर्वप्रथम त्या भागातील लोकांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहचवण्याचा प्रयत्न करते. अश्या परिस्थिती मध्ये लोकांचा जीव वाचवणे महत्वाचे असते. लोकांच्या गाड्या, घरातील सामान हे तसेच पुराच्या पाण्यात राहते. अश्यामद्धे वाहने खराब होणे, वाहने वाहून जाने असे प्रकार घडतात. या वाहनांसाठी सरकार कडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही.
कशी मिळू शकते नुकसान भरपाई? :
पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे, गाडीवर झाड पडल्यामुळे किंवा गाडीवर दरड कोसळल्यामुळे गाडीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गाडी मालकांकडे फक्त एकाच पर्याय आहे, तो म्हणजे ‘कार इन्शुरंस’ ( car insurance ) . वाहन मग ते कोणत्याही प्रकारचे असो, ( बाईक , कार , जीप, ट्रक , बस ) नुकसान भरपाई मिळवण्यासाठी गाडीचा विमा असणे अत्यावश्यक आसते. अन्यथा ते नुकसान आपल्यालाच सहन करावे लागते.
कारच्या आत पाणी गेल्यास, ते कारच्या आतील भागाला किंवा कारच्या इंजिनला खराब करू शकते. “कार इन्शुरन्स पॉलिसीचे Own Damage कव्हर कारच्या अपहोल्स्ट्री किंवा स्टिरिओ सिस्टीम सारख्या बिल्ट-इन इलेक्ट्रॉनिक्सच्या कोणत्याही नुकसानीसाठी भरपाई देईल, परंतु जर पॉलिसीधारकाने आपल्या वाहनात काही बदल करून ( जसे महागडे म्यूजिक सिस्टम बसवून घेणे ) घेतले असतील, आणि पुराच्या पाण्याने त्यामध्ये बिघाड झाला असेल तर तो क्लेम मंजूर होत नाही. यासाठी पॉलिसीधारकाने त्या महागड्या पार्टचा देखील अॅड-ऑन इन्शुरंस घेणे अपेक्षेत असते.
महाराष्ट्रातील बर्याच भागामद्धे दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. अनेक वेळा असे पाहण्यात येते की दरड कोसल्यामुळे वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरड कोसळणे, गाडीवर झाड पडणे हे एक अपघात मानला जातो, त्यामुळे ज्या गाड्यांचा Own Damage इन्शुरेंस कव्हर आहे त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. असा प्रकार घडल्यास त्याचा व्हिडिओ काढून घ्यावा, आणि इन्शुरेंस कंपनीला ताबडतोब कळवावे.
कोणतेही पार्क केलेले वाहन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले, अथवा इंजिन मध्ये पाणी गेल्यामुळे ते बंद पडल्यास नुकसान भरपाईसाठी Own Damage कव्हर खूप महत्वाचा ठरतो. आपल्या वाहनाचा थर्ड पार्टी इंसुरन्स असेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळत नाही.
जर एखाद्या वाहनामधून प्रवास करताना समोर पाणी दिसले, त्या पाण्याची पातळी आपल्या गाडीच्या इंजिन पर्यंत येत असेल आणि आपण त्या पाण्यामधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर पाणी इंजिन मध्ये जाऊन बिघाड होऊ शकतो. हा बिघाड वाहन चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे मानले जाते. अश्या परिस्थितीमध्ये मात्र इन्शुरेंस कंपनी नुकसान भरपाई नाकारू शकते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.