कॅशलेस मेडिक्लेम – काय खरं काय खोटं ?।। तुमचा मेडिक्लेम खरंच पूर्ण कॅशलेस असतो का? जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण पाहणार आहोत मेडिक्लेम मधील कॅशलेस ट्रीटमेंट बद्दल. अनेक लोक मेडिक्लेम घेतात कारण त्या मेडिक्लेम मध्ये कॅशलेस ट्रीटमेंट भेटते. एजंट देखील ज्यावेळी तुमच्याकडे येतो, आणि तुम्हाला मेडिक्लेम प्लान एक्सप्लेन करतो. त्यावेळेस सर्वात महत्वाचा मुद्दा तो सांगतो की आमच्या मेडिक्लेम प्लान मध्ये कॅशलेस ट्रीटमेंट आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की खरोखरच मेडिक्लेम प्लान हे जे कॅशलेस ट्रीटमेंट देतात हे 100% कॅशलेस असतात का? खरोखरच आपल्याला आपल्या खिषामधून एक ही पैसा खर्च करावा लागत नाही का? किंवा ट्रीटमेंट घेताना खरोखरच आपल्याला कधीच आणि कोणत्याच स्टेप किंवा स्टेजला कॅश भरावी लागत नाही का ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत.

तुम्ही ज्यावेळी कॅशलेस मेडिक्लेम विकत घेता त्यावेळी तुम्हाला एजंट सांगेल तेव्हा अस वाटत असेल की माझा मेडिक्लेम कॅशलेस आहे, कारण की मी कॅशलेस मेडिक्लेम घेतलेला आहे. म्हणजेच मला किंवा माझ्या फॅमिली मध्ये कोणत्या मेंबरला हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली तर त्यावेळी मला कोणतीही कॅश कुठेही भरायची गरज नाही आणि माझ्या खिशातून एकही पैसा खर्च होणार नाही. पण हे असं नाहीये. जर तुम्ही सत्यता पडताळून पहाल तर वेगळीच असते. याच संदर्भात आपण हे 4 मुख्य मुद्दे कॅशलेस ट्रीटमेंट बद्दल पाहणार आहोत.

1. नेटवर्क हॉस्पिटल :- कॅशलेस मेडिक्लेम तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. पण ती प्रत्येक हॉस्पिटल मध्ये करत नाही. तुम्ही ज्या कंपनीचा मेडिक्लेम प्लान घेतलेला आहे त्या कंपनीचे ज्या हॉस्पिटल बरोबर टायअप आहेत. जे हॉस्पिटल त्यांच्या नेटवर्क सिस्टीम मध्ये येतात.

त्याच हॉस्पिटल मध्ये आपल्याला कॅशलेस ट्रीटमेंट मिळते. त्या कंपनीमध्ये असलेले नेटवर्क हॉस्पिटल सोडून इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट सुविधा उपलब्ध नसेल. याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला क्लेम मिळत नाही, ज्याठिकाणी कंपनी नेटवर्क नाही अशा हॉस्पिटल मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आधी स्वतः पैसे भरावे लागतात. आणि तो खर्च नंतर कंपनी रीएम्बर्स करून देते.

2. हॉस्पिटलाइज होताना ऍडमिशन वेळी भरावयाचा सिक्युरिटी डिपॉझिट:- एखादा व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जर त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची वेळ आली. ज्यावेळी आपण व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये घेवून जातो अशा वेळी हॉस्पिटल सुरुवातीला तुमच्याकडून काही डिपॉझिट घेते. आणि त्यानंतरच तुम्हाला ऍडमिट करून घेते.

मग ते हॉस्पिटल तुमच्या पॉलिसीमध्ये असणाऱ्या नेटवर्क हॉस्पिटलपैकी असो किंवा नसो. तुम्हाला हे सिक्युरीटी डिपॉझिट भरावच लागत. जेव्हा हॉस्पिटल आपल्याकडून डिपॉझिट घेते याचा अर्थ असा होत नाही की आपला खर्च झाला. डिपॉझिट घेण्यामागे हॉस्पिटलचा उद्देश असा असतो की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे ठीक आहे.

पण जर तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर तुमच्या कंपनीने तुमचा मेडिक्लेम ॲप्रोव्ह केला नाही. त्यावेळी हॉस्पिटलला सुरक्षितता म्हणून हा डिपॉझिट तुमच्याकडून हॉस्पिटल घेते. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर कंपनीने एकदा का तुमचा क्लेम ॲप्रोव्ह केला की डिस्चार्ज होईपर्यंत तुमची ट्रीटमेंट ही कॅशलेस होते.

3. डिसअलौड एक्सपेंसेस :– असे खर्च जे नॉन मेडिकल खर्च असतात. आणि ते असे खर्च तुम्हाला तुमची कंपनी मेडिक्लेम पॉलिसी मध्ये देत नाही. ज्यावेळी आपण डिस्चार्ज घेतो त्यावेळी जे फायनल बिल बनते. आणि हॉस्पिटल ते मेडिक्लेम कंपनी मध्ये पाठवते. मेडिक्लेम कंपनी ते बिल पूर्णत चेक करतात. आणि असे एक्सपेंसेसे जे तुमच्या पॉलिसीत येत नाही ते खर्च डिसअलौड करते.

अनेकदा नॉन मेडिकल एक्सपेंसेसे ज्यांचा काहीही संबंध पॉलिसीत येत नाही ते खर्च डिसअलौड म्हणजेच रिजेक्ट करते. आणि असे खर्च तुम्हाला भरावे लागतात. हे खर्च जर तुम्हाला वाटत असेल की ते खर्च कंपनीने द्यावे तर तुम्ही तुमच्या क्लेम मध्ये कन्सुमेबल एक्स्पेंसेस आहेत की नाही ते चेक करून घ्या. कारण ज्या पॉलिसीत कन्सुमेबल एक्स्पेंसेस असतात, त्यात तुमचे एक्सपेंसेस बऱ्यापैकी कव्हर केलेले असतात.

4. डिस्चार्ज घेताना हॉस्पिटल जे डिपॉझिट ठेवून घेते त्याबद्दल :– अशी ही रक्कम हॉस्पिल आपल्याजवळ ठेवून घेते आणि आपल्याला 2 ते 3 महिन्यांनंतर परत करते. आता ह्यामध्ये असा मुद्दा येतो की जेव्हा ऍडमिट होताना अपणी त्यावेळी जे डिपॉझिट भरल होत तर त्या डिपॉझिटच काय झालं? तर त्या डिपॉझिट मधून तुमचे डिसल्लॉड केलेले एक्सपेंसेस वजा केलेले जातात. त्यानंतर हॉस्पिटला जो सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला द्यायचा आहे ती रक्कम वजा केली जाते.

आणि उरलेले पैसे तुम्हाला रिटर्न केले जातात. किंवा तुमच्याकडून जर जास्त रक्कम असेल तर ती घेतली जाते. उदाहरण पहायचं झालं तर, एक व्यक्ती ऍडमिट झाला त्यावेळी त्याने 25000 रुपये डिपॉझिट भरले होते. आणि बिल 2,15,000. रुपयेच झालं तर त्यातील 15 हजार डिसअलौड केले गेले. आणि 2 लाख रुपयाची कॅशलेस ट्रीटमेंट हॉस्पिटल मध्ये मिळाली.

आता हे जे 15000 रुपये डिसअलौड केले गेले ते अडजस्ट केले जातात त्या सुरुवातीला भरलेल्या 25000 रुपयामधून. म्हणजेच फक्त 10000 रुपये आता हॉस्पिटलकडे उरले. तुमचा क्लेम जो ॲप्रोव्ह झालेला आहे तो 2 लाख रुपयाचा ॲप्रोव्ह झालेला आहे. ते 2 लाख मेडिकल कंपनी लगेचच हॉस्पिटला देत नाही.

हे पैसे दिले जातात एक किंवा दोन महिने नंतर. मग ह्यावेळे मध्ये जर मेडिक्लेम कंपनीने कोणती क्वेरी काढून हॉस्पिटला हे 2 लाख रुपये नाही दिले किंवा पूर्ण नाही दिले. तर मग काय, तर ह्यासाठी तुमचं हॉस्पिटल डिस्चार्ज होताना देखील तुमच्याकडून काही रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवून घेते.

मग 2 लाख रुपयाचे 10 किंवा 15 टक्के रक्कम तुमच्याकडून सेक्युरीटी डिपॉझिट डिस्चार्ज वेळी ठेवून घेते. आपण अस मानल की ते हॉस्पिटल क्लेम अमाउंटच्या 15 टक्के डिपॉझिट म्हणून ठेवून घेते. तर 2 लाख चे झाले 30 हजार रुपये. आणि त्या व्यक्तींचे आधीचे 10 हजार रुपये उरलेले होते आणि त्या व्यक्तीला 30 हजार रूपयेचा सेक्युरीटी डिपॉझिट हॉस्पिटलकडे ठेवायचा आहे. आणि ही रक्कम त्या व्यक्तीला 1 किंवा 2 माहिण्यानंतर हॉस्पिटल रिटर्न करेल.

तर हे 4 मुद्दे आपण नीट पाहिले तर कळेल की कॅशलेस मेडिक्लेम किंवा ट्रीटमेंट ही कोणत्याही हॉस्पिटल मध्ये कधीही 100% नसते. आपल्याला एकतर पैसे खर्च करावे लागतात किंवा वापरावे लागतात. जे पैसे आपल्याला पुन्हा मिळतात. पण तोवर प्रोसेस मध्ये पैसे वापरावे लागतात. जर तुम्हाला एखादा एजंट सांगेल की आमच्या पॉलिसी मधे कॅशलेस ट्रीटमेंट मिळेल. तुम्हाला एक ही रुपया भरायची गरज नाही. तर ते साफ चुकीचं आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.