नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
टेलिव्हिजन सेलिब्रिटींवर चाहते भरभरुन प्रेम करत असतात. त्यांच्याशी सोशल मिडिया किंवा इतर शोच्या माध्यमातून कनेक्ट होण्याची संधी चुकवताना दिसत नाहीत.
या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यात चाहते कायमच उत्सुक असतात.
विशेषत: सेलिब्रिटी आणि त्यांच्या लव्ह इंटरेस्टबाबत जाणून घेण्यात उत्सुक असतात. अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटीं चाहत्यांच्या समोर एंगेज होताना दिसतात. अशाच सेलिब्रिटी जोड्यांची लिस्ट आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.
यातील काही जोड्या अजून सोबत आहेत तर काहींनी वेगळे मार्ग निवडले. पाहुयात कोण कोण आहेत या जोड्या.
अंकिता – सुशांत :
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अंकिता आणि सुशांत. या जोडीचे चाहते आजही आहेत. सुशांतने ‘झलक दिखला जा’ च्या सेटवर अंकिताला प्रपोज केलं होतं. दुर्दैवाने हे लव्हबर्डस लग्नाआधीच वेगळे झाले. सुशांत आज या जगात नाही तर अंकिताने या वर्षी विकी जैनसोबत लग्न गाठ बांधली.
शोएब – दीपिका :
‘ससुराल सिमर का’ या मालिकेत ही जोडी दिसली होती. या दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर ‘नच बलिये’ च्या सेटवर शोएबने दीपिकाला प्रपोज केलं. त्याचवेळी त्याने तिच्याशी साखरपुडाही केला. ही जोडी त्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकली.
करिश्मा – उपेन :
‘बिग बॉस’ च्या घरात ही जोडी प्रेक्षकांना भेटली. या दोघांची बाँडिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. इतरांप्रमाणेच ही जोडीही ‘नच बलिये’ च्या सेटवर एंगेज झाली. ही जोडी लग्न करेल असं वाटत असतानाच वेगळी झाली.
देबीना – गुरमीत :
स्ट्रगलच्या दिवसापासून ही जोडी एकत्र आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांची लाडकी आहे. गुरमीतने नॅशनल टि व्हीवर देबिनाला प्रपोज केलं. तिनेही अजिबात उशीर न लावता. ‘पती, पत्नी और वो’ या शो दरम्यान त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
रवी – सरगुन :
रवी दुबे आणि सरगुन मेहता ही जोडी ‘नच बलिये’ च्या 5 व्या सिजनमध्ये दिसली होती. या शो दरम्यानच रवीने सरगुनला प्रपोज केलं. शोच्या फिनालेनंतर 2013 मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.
तेजस्वी – करण :
‘बिग बॉस’ च्या घरात बनलेली आणखी एक जोडी म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. करणने रोमॅंटिक अंदाजात तेजस्वीला नॅशनल टि व्ही वर प्रपोज केलं होतं. याचदरम्यान तेजस्वी बिग बॉसची विनर ही बनली. सध्या ही जोडी अनेकदा एकत्र दिसते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा