या सेलिब्रिटींनी उतरवला आपल्या बॉडी पार्ट्सचा विमा, यादी वाचाल तर आश्चर्य वाटेल
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
भविष्यातील किंवा आपल्यानंतरची सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपण विम्याकडे पाहतो. अनेकदा अतिशय मौल्यवान वस्तूंचाही विमा काढू शकतो. पण कुणी आपल्या शरिराच्या विशिष्ट अवयवांचाच विमा काढला तर……
हो असंही होऊ शकतं. यात अग्रेसर आहेत ते तुमचे आमचे लाडके सेलिब्रिटी. सेलिब्रिटींचं त्यांच्या स्वत:च्या लूक्सवर प्रचंड प्रेम असतं. एकप्रकारे एखाद्या अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी लूक्स हीच असेट असते. अशा वेळी त्यांना मौल्यवान वाटत असलेल्या गोष्टीचा विमा उतरवायला ते अजिबात मागे पुढे पाहात नाहीत. तुम्हाला माहिती आहे का, काही सेलिब्रिटींनी ऐकायला अतरंगी वाटणारे विमेही उतरवले आहेत. या लिस्टमध्ये कोण कोण सेलिब्रिटी आहेत पाहू.
प्रियांका चोप्रा – मिस वर्ल्ड आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या स्माईलवर अनेकजण फिदा आहेत. तुम्हाला माहिती आहे का प्रियांकाने आपल्या स्माईलचा विमा उतरवला आहे.
अमिताभ बच्चन – स्टार ऑफ द मिलेनियम म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरात आहेत. अभिनय आणि खास वजनदार आवाज यासाठी अमिताभ ओळखले जातात. तुम्हाला माहिती आहे का? अमिताभ यांनी आपल्या आवाजाचा विमा उतरवला आहे.
लता मंगेशकर – अलीकडेच भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते जगभरा आहेत. लता दीदींनी त्यांच्या स्वर्गीय आवाजाचा विमा उतरवला होता.
सनी देओल – ‘ढाई किलोका हात’ या डायलॉगने तुमच्या आमच्यात फेमस झालेला अभिनेता म्हणजे सनी देओल. उत्तम फिजिक असलेल्या या अभिनेत्याने स्वत:च्या आवाजाचा आणि डायलॉग डिलीव्हरीचा विमा उतरवला आहे.
रजनीकांत – थलैवा रजनीकांतच्या लोकप्रियतेच्या कथा प्रसिद्ध आहेत. दक्षिणेतील सिनेसृष्टीचा देव अशी उपमा असलेले रजनीकांत यांच्या स्टाईलचे अनेक फॉलोअर्स आहेत. या सुपरस्टारने त्याच्या आवाजाचा विमा उतरवला आहे.
मल्लिका शेरावत – आपल्या मादक अदा आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मल्लिकाने आजवर बोल्ड अंदाजाच्या भूमिकाच केल्या आहेत. मल्लिकाने तिच्या संपुर्ण शरीराचा विमा उतरवला आहे.
अदनान सामी – अदनान सामीच्या मलमली आवाजाला नापासंत करणारे लोक कमी असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, अदनान सामी केवळ उत्तम गातच नाहीत तर जवळपास 35 प्रकारचे वाद्य वाजवूही शकतात. फास्टेस्ट किबोर्ड प्लेअर म्हणून त्यांची जगभर ओळख आहे. त्यामुळे अदनान यांनी आपल्या बोटांचा विमा उतरवला आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.