नवउद्योजकांची भन्नाट कल्पना ‘हॉटेल चहा चपाती’ ।। पुण्यात सुरु झालेल्या ह्या आगळ्या वेगळ्या हॉटेलबद्दल तुम्ही ऐकले का? ।। जाणून घ्या मस्त माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

चहा चपाती साठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्वतंत्र हॉटेल उभा करण्यात आलेला आहे. गावातल्या घरांमध्ये आणि शहरातल्या मोठ्या इमारती पासून छोट्या वस्तूंमध्ये खाल्ला जाणारा आईच्या हातचा नाष्टा म्हणजे चहा चपाती.आपण आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी कधीही कुठल्याच हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये चहा चपाती हा मेनू नसेल,

पण म्हणतात ना ‘ पुणे तिथे काय उणे’ याच पुणे शहरात तीन अवलियांनी मिळून चक्क स्पेशल चहा चपातीसाठी हॉटेल उभारलेला आहे. या निमित्ताने कुठेतरी हरवत चाललेली चहा चपाती पुणेकरांच्या भेटीला आपलं नाव ग्लोबल रुप घेऊन परत आले आहे. करोना नंतर सर्वांवर आर्थिक संकट येऊन पडला.

उद्योगधंदे बंद झाले, असं असतानाही एक साहसी धाडस करत पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या अक्षय चव्हाण, धनश्री पाटील आणि अक्षय भैलुमे या तीन मित्रमैत्रिणी मिळून चहा चपाती नावाचं एक हॉटेल केलेल आहे. चहा चपाती या हॉटेलवर इतर हॉटेल पेक्षा खूप कमी दरामध्ये सर्वांसाठी परवडेल अशी पदार्थांची किंमती ठेवण्यात आलेली आहे.

नफा नाही झाला तरी चालेल पण बाहेरून गावाहून आलेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना, सर्वसामान्यांना आपल्या पोटाची भूक ही माफक दरात भागवता यावी यासाठी हे हॉटेल निर्माण केलेला आहे. अक्षय,धनश्री,अक्षय यांनी या स्वरूपात सविस्तर माहिती सुद्धा दिली.सर्वांच्या घरांमध्ये हल्ली खाल्ली जाणारी चहा चपाती कुठेतरी नाहीशी होत चालली आहे.

तिला नव्यानं ओळख मिळावी म्हणून पुण्यात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात सकाळचा पोटभर नाश्ता करता यावा आणि मराठी माणसाने उद्योजक म्हणून येणाऱ्या काळात पुढे यावं अशी त्या तिघांनी अपेक्षा व्यक्त केलेले आहे. एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून या तिघांनी हॉटेल सुरू केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लॉकडाऊननंतर अल्पावधीतच पुण्यातील एफ सी रोड वरती असलेल्या ‘चहा चपाती’ या हॉटेलचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्पेशल चहा चपाती साठी अस एक हॉटेल उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी चहा सोबत चपातीचे, चहा तूप चपातीचे, साखर चपाती, शेंगदाणा चपाती असे वेगवगळे प्रकार तुम्हाला खायला मिळतील.

का सुरू केली चहा चपाती ? : पुणे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागात रोज सकाळी चहाबरोबर चपाती खाल्ली जाते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची चहा-चपाती मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मिळेल ते खावे लागत होते. त्यानंतर आम्ही तिघांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता महाविद्यालायजवळ चहा-चपातीचे हॉटेल सुरू केले, अशी प्रतिक्रिया अक्षय भैलूमेने दिली.

दररोज 40 हून अधिक चपाती विकले जातात: चहा चपातीचा हा व्यवसाय दोन दिवसांपूर्वीच झाले सुरू असून 4 प्रकारच्या चपात्या ग्राहकांना दिल्या जातात. दररोज 40 हून अधिक चपात्या विकल्या जात आहेत. पुणेकर चहा चपाती खायला चांगला प्रतिसाद देत असून शहराच्या विविध ठिकाणांहून नागरिक या चहा-चपाती खाण्यासाठी येत आहेत. येणाऱ्या काळात 12 प्रकारच्या चपात्या करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अक्षय चव्हाण याने सांगितले.

खचून न जाता नवीन पर्याय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक तरुण हे बेरोजगार झाले तर काहीचे व्यवसाय हे डबघाईला आहे. मात्र, अशा परिस्थितीत नोकरी न करता मराठी माणसाने व्यवसायात पुढे जावे हा विचार करून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे. हाच व्यवसाय पुढे वाढणार असल्याचे अक्षय चव्हाणने सांगितले.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.