चाणक्यनीतीचे ४० प्रभावशाली विचार जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील ।। चंद्रगुप्त सारख्या साधारण व्यक्तीला भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट बनवणारे विचार !!

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

आचार्य चाणक्य हे एक असे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि क्षमतेच्या भरवश्यावर भारताचा इतिहास बदलून टाकला. चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त ही त्यांचीच नावे. चाणक्य हे एक साहित्यकार,अर्थशात्रज्ञ, शिक्षक, दर्शनशात्री, राजनीतीतज्ज्ञ आणि सल्लागार होते. त्यांनी चंद्रगुप्त सारख्या साधारण व्यक्तीला भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट बनवलं. एवढी वर्ष झाली तरी त्यांनी सांगितलेल्या नीती आणि विचार अजूनही प्रत्येक व्यक्तीला फायदेशीर ठरतील असे आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले ४० प्रेरणादायी विचार आपण जाणून घेऊ:

१.आवश्यकतेपेक्षा जास्त प्रामाणिक होऊ नका कारण लोक  सरळ झाडाला आधी कापतात. २.कधीच वाईट लोकांच्या चांगल्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण ते त्यांचा मूळ स्वभाव कधीच विसरत नाहीत. वाघ हिंसा करणे कधीच सोडत नसतो. ३.उंच इमारती वर कावळा बसला तर त्याला गरुड म्हणत नाहीत. तसेच व्यक्तीचा आदर हा त्यांचा गुणाद्वारे निच्छित केला जातो, त्याची उंची, स्थिती, आणि संपत्तीवरून नाही.

४.फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो पण चांगल्या व्यक्तीची कीर्ती सर्व देशांमध्ये पसरते. ५.सोन्याचे परीक्षण करण्यासाठी त्याला आगीत जाळले जाते, त्याचप्रमाणे माणसावर होणारे आरोप त्याच परीक्षण करत असतात. ६.आपल्या समस्या इतरांना कधीच सांगू नका कारण लोक आपल्या कमजोरीचा आनंद घेतात,त्यावर हसतात आणि फायदा घेतात. ७.आयुष्यात काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाज पूर्ण पणे सोडली पाहिजे.

८.एकदा एखादया गोष्टीवर काम सुरु केल्यानंतर अपयशाला कधीच घाबरू नका आणि ते काम कधीच अपूर्ण सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे आपले काम करून आपली स्वप्न पूर्ण करतात, तेच लोक नेहमी आनंदी राहतात. ९.नशिबात आलेली गरिबी काढून टाकता येते, स्वच्छ असतील तर साधे कपडे देखील सुंदर दिसतात, गरम असेल तर बेस्वाद जेवणही चवदार वाटते, त्याचप्रमाणे सौंदर्य, संपत्ती नसेल तरीही चांगले गुण असलेला व्यक्ती सर्वांना आवडतो.

१०.उच्च विचार नसलेल्या पत्नी सोबत राहणे, पाठीवर वार करणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करणे, नेहमी बोलत राहणाऱ्या लोकांसोबत काम करणे हे सर्व विषारी साप असलेल्या घरात राहण्या सारखे आहे. ११.जो मनुष्य कमाई पेक्षा जास्त खर्च करतो आणि महिलांवर वाईट नजर टाकतो, तो जास्त दिवस टिकत नाही. १२.घर गाडी पत्नी, मुले ,कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत नेहमी समाधानी रहा.परंतु ज्ञानाच्या बाबतीत कधीच संतुष्ट राहू नका.

१३.लाकडाला कापुन खंडित करणाऱ्या मधमाशीला, फुलांना इजा करण्याचे साहस होत नाही. यालाच प्रेम म्हणतात. १४.जो व्यक्ती फक्त खाण्याच्या वेळेला तोंड उघडतो त्या व्यक्तीला शंभर वर्षाचे सुख एकाच वर्षात मिळते. मौन एक महान शास्त्र आहे, मोठ्या युद्धाने न होणारे काम मौन युद्धाने होऊ शकते, जास्त बोलल्याने जास्त समस्या निर्माण होतात. १५.वेळ लोकांना कुशल बनवू शकते, शक्तिशाली बनवून शकते, त्याचप्रमाणे त्याला कमजोर बनवून मारू देखील शकते. वेळ कोणाच्याही हातात नसते, या जगात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र ही नाही. वेळ सगळ्यांना वेळेनुसार मित्र आणि शत्रू बनवते.

१६.इतरांच्या चुकांपासून शिका, कारण सर्व चूका स्वतः करून शिकायला आपल्याला कडे वेळ नाही, आयुष्य खूप लहान आहे. १७.तरुण स्त्री च सौंदर्य जगात सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे १८.सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की कधीच आपले रहस्य कुणाला सांगू नका, ते तुम्हाला नष्ट करु शकतात. १९.व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही तो त्याच्या कर्मामुळे महान होतो.

२०.कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, मी या कामाला सुरुवात का केली?, मी या कामात यशस्वी होऊ शकतो का? या कामाचे फायदे आणि नुकसान काय होऊ शकतात. हे सर्व प्रश्न स्वतःला विचारावेत, समाधानकारक उत्तरे मिळाली तरच पुढे जाणे चांगले असते. २१.कामगारांची परीक्षा सुट्टीच्या वेळेत घ्यायला पाहिजे, मित्र आणि नातेवाईकांचे  परीक्षण संकटात करायला पाहिजे आणि पत्नी ची परीक्षा गरिबी आल्यावर घेतली पाहिजे.

२२.जे आपल्या मनात आहे ते कितीही दूर असले तरी ते नेहमी जवळ असते, आणि जे आपल्या मनात नसते ते कितीही जवळ असले तरीही दूरच असते. २३.प्रत्येक मैत्रीच्या मागे काही न काही स्वार्थ लपलेला असतो, बिना स्वार्थाची मैत्री नसते, हे एक कटू सत्य आहे २४.जो माणूस आपली निंदा शांतपणे ऐकू शकतो तो सर्व काही जिंकू शकतो २५.दान दारीदर्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्या नष्ट करते. ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते

२६.कष्टाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही, शिकार स्वतः वाघाच्या तोंडात येऊन पडत नाही. म्हणूनच तुम्हाला तुमची इच्छा पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. २७.शरीराने सुंदर असलेली स्त्री फक्त एक रात्र आनंद देऊ शकते, पण हृदयाने सुंदर असलेली स्त्री आयुष्यभर आनंदात ठेऊ  शकते. २८.साप जरी विषारी नसला तरी स्वतः च्या रक्षणासाठी त्याला विषारी असल्याचे दाखवावे लागते.

२९.ज्याप्रमाणे दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते, त्याचप्रमाणे आपणही चांगल्या लोकांची मैत्री करून चांगले बनू शकतो. ३०.जो राजा अधर्माच्या रस्त्यावर चालतो आणि प्रजेची काळजी घेत नसतो, तो राजा स्वतःच्या स्वार्थीपणा मुळे नष्ट होतो .३१.मोठ्या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी एक छोटी साखळी देखील पुरेशी असते, अंधार नष्ट करण्यासाठी एक छोटा दिवा पुरेसा असतो, मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पुरेशी असते. आपले सौंदर्य,आकार आणि शरिर महत्वाची नाही, फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.

३२.स्त्रियांवर वाईट नजर ठेवणारा व्यक्ती कधीच पवित्र असू शकत नाही, ते स्वतः चा नाश करतात. ३३.जन्मापासून येणारा स्वभाव बदलत नसतो, कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरी कडुलिंब कडू लिंब च राहणार, तो गूळ बनणार नाही. ३४.तुम्ही एखाद्या लोभी व्यक्तीला पैसे देऊन स्वतःच्या अधीन करू शकतो, परंतु जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीला अधीन करायचे असेल तर तुम्हाला सत्य बोलावं लागेल.

३५.ज्याप्रकारे दारू पिलेल्या माणसाला चूक किंवा बरोबर कळत नाही, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला योग्य किंवा अयोग्य कळत नाही. ३६.कायदा तोडणारी, दान न देणारी, कलाकारांना आदर न देणारी लोक असलेल्या शहरात किंवा गावात बुद्धिमान लोकांनी राहणं योग्य नाही. ३७.तुम्ही एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन एक नवीन शत्रू बनवत असतात. 

३८.आपल्याला जे हवं आहे ते आपल्या प्रयत्नातून साध्य करायला पाहिजे. ३९.एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे तसेच एका मूर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे. ४०.मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे, दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे, परंतु जेव्हा मुले सोळा वर्षाची होतात तेव्हा त्यांच्याबरोबर मित्रांसारखे वागले पाहिजे. हे आहेत चाणक्य यांचे विचार. हा लेख शेवट पर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. म्हणूनच आणखी दोन विचार जाऊन घेऊ.

४१.सिंहाला राजा घोषित करण्यासाठी सभा भरवावी लागत नाही, तो स्वतःच्या शक्तीने गुणाने आणि पराक्रमाने राजा बनतो. ४२.महासागरात पडेलला पाऊस वापरण्या योग्य नसतो, पोट भरलेल्या व्यक्तीला पुन्हा खाऊ घालणे व्यर्थ आहे, श्रीमंत लोकांना दिलेले दान व्यर्थ आहे. दिवसाच्या प्रकाशात जळणारा दिवा व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे दगडासारख्या हृदयावर प्रेम करणे व्यर्थ आहे. आयुष्यात जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी वर दिलेल्या चाणक्य यांच्या या तत्त्वांचा वापर करा.आणि नक्की यशस्वी व्हा.