कॉलम बांधकामाबद्दल महत्वाची माहिती ।। कॉलम ची साइज कमीतकमी किती असावी? कॉलम बांधकाम कसे करावे? त्याचे काय नियम असतात? कुठले स्टील वापरू नये, हे सविस्तरपणे या लेखात जाणून घेऊया !

लोकप्रिय शैक्षणिक

बांधकाम संबंधी कन्स्ट्रक्शन संबंधी एका महत्त्वाच्या टॉपिक ची माहिती घेऊया. यामध्ये आपण कॉलम संबंधी म्हणजे आपल्याला कॉलमच जर बांधकाम करायचं झालं, कॉलम तयार करायचं झाला तर त्यासाठी ज्या आवश्यक असणारी माहिती त्यासाठी जी काही बेसिक नियम असतात त्या संबंधित माहिती आपण घेऊया.

जेणेकरून आपल्याला सुपरविजनच काम करण्यासाठी, सेंट्रींग काम करण्यासाठी, गवंडी काम करण्यासाठी किंवा तुम्ही साइटवरती इंजिनीयर असाल तर या सर्वांसाठी ही माहिती खूप आपल्याला फायदेशीर ठरू शकते आता यामध्ये आपल्याला पहिला नियम आहे. कॉलम ची साइज म्हणजे आपल्याला कॉलम तयार करायचं जर झालं तर या कॉलमची कमीत कमी साइज ही ते २३ सेंटीमीटर बाय २३ सेंटीमीटर घ्यायची

म्हणजे कॉलम ची लांबी ही कमीत कमी २३ सेंटीमीटर असावी आणि कॉलमची रुंदी ही कमीत कमी तेवीस सेंटीमीटर असावी त्याच्या पेक्षा कमी साईज घ्यायची नाही. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. कॉलमची उंची जी काही आपलं बांधकाम असेल त्यावरती त्याचा जे आपलं बांधकाम किती उंच आहेत त्यानुसार ते कॉलम ची उंची असते म्हणजे, कॉलमची लांबी आणि कॉलमची रुंदी ही कमीत कमी २३ सेंटीमीटर घ्यायची, त्याच्यापेक्षा कमी घ्यायची नाही हा मुद्दा लक्षात ठेवा.

त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कॉलम साठी जी काही आपल्याला बार वापरायची असतात. कॉलम मध्ये आपल्याला ४ बार हे वापरायचे असतात कंपल्सरी चार बार आपल्याला वापरावेच लागतात त्या शिवाय आपला कॉलम तयार होत नाहीत आणि हे चारही बर आपल्याला १२mmचे वापरायचे असतात, त्यापेक्षा कमी साईज घ्यायची नाही.

म्हणजे कॉलम मध्ये जे आपण मेन बार वापरणार आहोत, चारही कोपऱ्यांमध्ये जे काही मेन बार वापरणार आहोत त्याची साईज कमीत कमी बारा एमएम असावी, बारा एमएम पेक्षा कमी साईजचा मेन बार कॉलम मध्ये वापरायचा नाही. जे मधले अधले बार तुम्ही वापरणार आहात ते १० एम एम ८ एम एम वापरले तरी चालेल. पण मेन बार हा कमीत कमी १२ एम एम चा पाहिजे.

त्याच्यापेक्षा कमी साईजचे वापरू नका शक्यतो दहा एम एम मधले बार आणि मेन बार हे बारा एम एम याच टाइपने कॉलम तयार करीत जावा. त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण पाहिला कॉलम मध्ये जे आपण जे स्टील बार वापरणार आहोत त्या स्टीलची ग्रेड कमीत कमी F500 असावी, F500 ग्रेडची म्हणजेच F500 ग्रेडची स्टील बार याला कॉलम मध्ये वापरायचे आहेत.

यानंतर पुढचा मुद्दा जर पाहिला आपण कॉलम मध्ये जे काही आपण रिंग वापरणार आहोत. म्हणजे जो आतला कॉलम असेल आयताकार कॉलम जर असल तर आपण आयता कार रिंग तयार करतो म्हणजेच आयताकृती शेप चे काय करतो आपण रिंग तयार करतो स्क्वेअर मध्ये जर कॉलम असेल स्क्वेअररिंग तयार करतो, सर्क्युलार असेल म्हणजेच गोल कॉलम असेल तर आपल्याला काय करावं लागतं गोलरींग तयार करावं लागतं.

आपण त्याला टेक्निकल भाषे मध्ये stirrups असे म्हणतो मग हे ज्या वेळेला हे रिंग तयार करतो या रिंग साठी जे काही बार वापरलेल्या असतात स्टील वापरतो आपण हे सुद्धा काय करायचं असतं आठ एम एम साईजचं घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी वापरू नयेत. काही ठिकाणी सहा एम एम चे सुद्धा वापरतात जर जास्त लोड नसेल तर त्या ठिकाणी ठीक आहे सहा एम एम पण शक्यतो आठ एम एम बार चा वापर करा. रिंग तयार करण्यासाठी काय करायचं आठ एम एम चा बारचा वापर करायचा.

त्यानंतर ज्या वेळी आपण या रिंग कॉलम मध्ये ऍड करतो या रिंग जे काही हूक असतात हे हूक कधीही एका रेषेत येऊ देऊ नका जे कॉलम मध्ये ज्या वेळी आपण या रिंग अडकवतो रिंग या कॉलम मध्ये जेव्हा लावतो त्यावेळी त्याच्या ज्या काही हूक असतात जे जॉइंट असतात जोड असतात त्या कधीही एका रेषेत आणायचे नाही हा मुद्दा इथे लक्षात ठेवा.

मागे पुढे किंवा रोटेशन मोड मध्ये काय करायचं आपल्याला ह्या रिंग कॉलम मध्ये अडकवयच्या असतात. एका रेषेत येऊ देयच्या नाही. यानंतर चा पुढचा मुद्दा आहे. जर आपण ह्या रिंग तयार करतो आणि ह्या रिंग कॉलम मध्ये ऍड करतो. त्यासाठी आपण काय करतो बाइंडिंग वायर चा वापर करतो. बाइंडिंग वायरच्या मदतीने या रिंग तयार करतो कॉलमला बांधतो मग हे बांधण्यासाठी आपण जे काही टाय तयार करतो म्हणजेच जे काही गाठ मारतो.

त्यासाठी आपल्याला क्राऊन टायचा वापर करायचा असतो म्हणजेच गाठ मारली जाते त्याला टाय म्हणले जाते,बरोबर मग या मध्ये कॉलम साठी आपल्याला क्राऊन टायचा वापर करायचा आहे. क्राऊन टाय कसा असतो. क्राऊन टायनेच काय करायचे कॉलम चे बांधकाम करायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ज्यावेळी आपण या रिंग बांधत असतो त्या वेळी दोन रिंगच्या मध्ये म्हणजेच ज्या वेळी आपण कॉलम मध्ये या रिंग अडकवतो.

पहिली रिंग दुसरी रिंग तिसरी रिंग चौथी रिंग अशा टप्प्याटप्प्याने या रिंग अडकवल्या जातात प्रत्येक रिंग मधला अंतर किंवा दोन रिंग च्या मधला अंतर हे जास्तीत जास्त दीडशे एम एम असावं, १५० एम एम पेक्षा म्हणजेच १५ सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतर २ रिंगच्या मध्ये नसावं. म्हणजेच आपल्याला इथं काय करायचे आहे.

स्पेसिंग दोन मधला स्पेसिंग हे जास्तीत जास्त मॅक्झिमम १५ सेंटीमीटर किंवा १५० एम एम ठेवायचं आहे तिच्या पेक्षा जास्त ठेवायचं नाही हे तुम्हाला चेकिंग करायचंय ज्यावेळी तुम्ही सुपर-विजनचं करत असाल तेव्हा तुम्हाला हा पॉईंट चेक करायचा असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो ज्यावेळी आपण हे स्टील बार तयार करतो कॉलमचा सापळा तयार करतो सांगाडा तयार करतो आणि त्यानंतर त्याला शेटरिंग करून काय करत असतो त्यामध्ये काँक्रिट होत असतो.

तुम्ही हे करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं असतं कॉलमची आपल्याला लेवल चेक करायचे असतं. ओलंब्याच्या मदतीनं आपल्या कॉलमची उभी लेव्हल चेक करायचे असते. यानंतरच आपण काय करतो काँक्रिट चे काम करतो तुम्ही शिट्रिंग केल्या नंतर म्हणजेच साईड का फळ्या लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय यामध्ये काँक्रीट ओतायचे मग हे कॉंक्रीटची ग्रेड कॉलम साठी आपण जे काही काँक्रीट तयार करणार.

त्या काँक्रीटची ग्रेड मिनिमम म्हणजे कमीत कमी m15 पाहिजे त्याच्या पेक्षा कमी ग्रेडचे कॉंक्रीट कॉलमसाठी वापरायचं नाही इथे मुद्दा लक्षात ठेवा. कॉलम साठी कॉंक्रीटची ग्रेड एम १५ असावी त्याचा रेशो आहे १:२:४ या पद्धतीचा आपल्याला काँक्रीट करायचंय आणि ते कॉलम साठी वापरायचे. त्यानंतर आपण काय करतो २४ ते ४८ तास नंतर हे कॉलमला जे काही फळ्या लावलेले आहेत शिट्रींग केलेले आहेत.

ते काढून टाकायचे आधी चेक करायचं व्यवस्थित बसले का आणि त्यानंतर ते काढायचे, काढल्यानंतर काय करायचे लगेच दुसरे बांधकाम त्याच्यावर चढवायचे नाही. त्यानंतर आपल्याला ७ ते १० दिवस त्याच्यावर क्युरिंग करायचं असतं क्युरिंग म्हणजे काय पाणी मारणे मराठी मध्ये आपण त्याला अभिसाधन असे म्हणतो आपल्याला त्या कॉंक्रिटच्या पृष्ठभागातवर सरफेस वर काय करायचं असतं सात ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस त्याच्या वरती पाणी मारायचं असतं.

जेणेकरून कॉंक्रीट मध्ये जे काही पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते ते तिथे भरून जाते. आतल्या कॉंक्रीट ला कॉलम ला टडे पडणार नाहीत भेगा पडणार नाही कॉलम ताकद चांगली राहील त्यासाठी आपल्याला सात ते दहा दिवस किंवा जास्तीत जास्त १५ दिवस आपल्याला त्याच्यावरती पाणी मारायचं असतं कंटिन्यू बांधकाम होईपर्यंत आपण त्याच्यावरती पाणी मारत राहतो जेणेकरून आपल्याला बांधकाम मध्ये जे काही सिमेंटची ताकद आहे काँक्रिट ची ताकद आहे ती जास्त काळ चांगली राहील त्यासाठी आपल्याला त्याच्या वरती पाणी मारवच लागत.

यासाठी बेसिक नियम आहेत या बेसिक नियमांचा वापर करून आपल्याला काँक्रिटचे काम करायचे असते. क्लिअर कव्हर काँक्रिटचा पृष्ठभाग आणि आतील स्टीलचे बार यांच्यामध्ये जे काही अंतर असतं स्पेसिंग असतो त्याला आपण क्लिअर कव्हर म्हणतो कॉलम मध्ये आपल्याला ४० एम एम चा क्लिअर कव्हर दयायचा आहे हा मुद्दा इथे लक्षात ठेवा, म्हणजे कॉलमचा स्टीलचा बार आणि कॉलमचा बाहेरचा पृष्ठभाग म्हणजे ज्यावेळी आपण या फळ्या लावणार आहेत.

कॉलमचे जे काही स्टील बार आहे या स्टील बार पासून ४० एम एम अंतरावर काय करायचे बाहेरून फळ्या मारायच्या. कॉलमच्या चारही बाजूला आपल्याला 40एम एम चा कव्हर दयायचा आहे. एकाच बाजूने नाही चारही बाजूने ४० एम एम कव्हर दयावा लागणार आहे, हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. हे बेसिक नियम आहेत किंवा हे महत्वाचे नियम आहेत

जेणकरून आपल्याला कॉलमचे काम करताना आपल्याला सुपर विजन करताना याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो ज्यावेळी आपण साईड वरती काम करत असतो तेव्हा आपल्याला इंजिनियर किंवा जे काही आर्किटेक्चर असतात त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळी प्लॅन भेटलेल्या असतो त्या प्लॅन मध्ये किंवा त्या डिझाईन मध्ये आपल्याला कॉलमची संपुर्ण माहिती दिलेली असते ती फक्त आपल्याला वाचता आलेली पाहिजे

आणि त्यानुसार आपल्याला ते काम काय करायचे असते ते करून घ्यायचा असतं यामध्ये आपल्याला रिंग मधले स्पेसिंग असतील कॉलमची साइज् असेल क्लिअर कव्हर असतील किंवा स्टील बार असतील याची संपुर्ण माहिती आपल्याला दिलेली असतील त्यानुसारच आपण ते काय करायचे असते ते काम करायचे असते.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.