कॉंक्रिट म्हणजे काय ? कॉंक्रिटच्या ग्रेड म्हणजे काय असतात? ह्या ग्रेड कोणत्या आहेत? ग्रेड कश्या ठरवल्या जातात? कॉंक्रिटच्या ग्रेडचे महत्वाचे उपयोग काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

कन्स्ट्रक्शन मध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे कॉंक्रिटकडे पाहिलं जातं. तुम्ही जर प्राक्टिकली काम बघायला गेलात तर कॉंक्रिटचा वापर महत्वाचा असतो हे दिसून येते. तर 80 टक्के काम हे कॉंक्रिट मध्येच केली जातात. सुपरविझन असेल किंवा जेव्हा तुम्ही प्राक्टिकली काम कराल त्या वेळी तुम्हाला हे कॉंक्रिटच काम माहिती असणे किंवा त्याच काही बेसिक ऍडव्हान्स माहिती आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

तर आपण कॉंक्रिटच्या ग्रेड संबंधित माहिती घेणार आहोत. ग्रेड म्हणजे काय असतात? किंवा ह्या ग्रेड कोणत्या आहेत? किंवा ग्रेड कश्या ठरवल्या जातात. त्या ग्रेडचे उपयोग काय आहेत. कॉंक्रिटच्या ग्रेडचे महत्वाचे उपयोग काय आहेत. हे आपण पाहूया तर सर्वात प्रथम कॉंक्रिट म्हणजे काय ? कॉंक्रिट म्हणजे सिमेंट, वाळू, आणि खडी, सिमेंटला पण बायनडिंग मटेरियल असे टेकनिकल भाषेत म्हणतात.

त्या नंतर वाळू ज्याला आपण इंग्रजी भाषे मध्ये सॅड किंवा टेकनिकल भाषेत फाईन ऍग्रीगेट असे म्हंटले जाते. तिसरा घटक म्हणजे खडी ज्याला कोल्ट ऍग्रीगेट असे म्हंटले जाते. हे जे कॉंक्रिटचे घटक आहेत. हे घटक एकत्र करून त्याचे पाण्यासोबत केलेले जे काही प्रमाणबद्ध मिश्रण असते. प्रमाणबद्ध हा शब्ध महत्वाचा आहे. प्रमाणबद्ध म्हणजे ठराविक आकार किंवा ठराविक एकका मध्ये घेऊन त्याच जे काही मिक्सिन्ग केलं जातं.

जे काही मिश्रण केलं जाते त्यालाच आपण कॉंक्रिट असे म्हणतो. आता ह्या कॉंक्रिटच्या ग्रेड काय आहेत? त्याचा वापर आपण कुठे करायचा. हे पाहूया.तर कॉंक्रिटचा ग्रेड याचा अर्थ काय, आपण जे काही साहित्य कॉंक्रिट तयार करण्यासाठी घेणार आहोत त्यामध्ये सिमेंट असेल, वाळू असेल, किंवा खडी असेल याचे जे पाण्यासोब मिश्रण करणार आहोत.

ते मिश्रण करण्यासाठी जे आपण साहित्य घेतोय त्याच एक ठराविक असं आकारमान असते, म्हणजे असं नाही कि किती हि सिमेंट घ्या किती हि वाळू घ्या असं आपल्याला करून चालत नाही. एक ठराविक रेशो असतो. एक ठराविक प्रमाण असत आणि त्या प्रमाणांतच आपल्याला ते साहित्य घ्यावं लागत आणि त्या नुसार ते कॉंक्रिट कराव लागत. हे जे काही प्रमाण आपण ठरवतो. ह्यालाच ग्रेड असं म्हटलेल आहे.

आता ग्रेड का म्हटले आहे, तर ज्या प्रमाणांत आपण साहित्य एकत्र करतो त्या पासून ती कॉंक्रिट तयार करतो. त्याला एक विशिष्ट्य अशी ताकत प्राप्त होते. तसे जर बघायला गेलो तर हे प्रत्येक कामासाठी जे कॉंक्रिट असत. आरसीसी स्लाप असेल, कॉलम असेल, किंवा इतर पीसीसी वर्क असेल. हि अशी जी वेगवेगळी कामे आहेत. अश्या प्रत्येक कामाला कॉंक्रिट हे वेगवेगळ्या प्रकारचे करावे लागते एकसारखच कॉंक्रिट हे प्रत्येक कामासाठी लागत नाही.

त्या कामाच्या ताकदीनुसार जर समजा आपल्याला आरसीसी स्लाप टाकायचा असेल, तर त्याची ताकद आपल्याला जास्त करावी लागेल. त्या ठिकाणी आपल्याला जास्त ताकदीच कॉंक्रिट तयार करावे लागेल. समजा आपल्याला फुटिंग करायचं आहे, म्हणजे जमिनीवरती आपल्याला बेड कॉंक्रिट टाकायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त ताकदीची आवशक्यता नाही.

मग अश्या ठिकाणी आपण कमी ताकदीचे कॉंक्रिट तयार करू शकतो. मग आता हि ताकत कशी ठरवायची? कमी ताकदीचे कॉंक्रिट आणि जास्त ताकदीचे कॉंक्रिट हे कसे ठरवायचे, तर हे कॉंक्रिटच्या ग्रेड वरूनच ठरलं जातं. तर ह्या कॉंक्रिटच्या ग्रेड कोणत्या आहेत. याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूया.आपण ज्या वेळेस कॉंक्रिट साठी जे काही साहित्य एकत्रित करतो.

ते जर आपण प्रमाणानुसार घेतले तर ते ठराविक ताकदीचे कॉंक्रिट तयार होते. ह्याच प्रमाण जर चुकलं किंवा साहित्य कमी जास्त झालं. त्यापासून होणारे कॉंक्रिट हे कमी ताकदीचे होऊ शकत किंवा जास्त ताकदीचे होऊ शकते . त्या मुळे आपल्याला ज्या त्या कामासाठी ठराविक अश्या प्रमाणामध्ये, ठराविक अश्या ग्रेड मध्ये बनवावे लागते. आता ह्या ग्रेड कोणत्या आहेत, ह्या कश्या ओळखायच्या, किंवा याचा वापर प्रत्यक्षात कसा करायचा. हे आपण बघू.

तर कॉंक्रिटच्या जेवढ्या टोटल ग्रेड आहेत. त्या जास्त ताकदी पासून जेवढ्या जास्त ताकदीच कॉंक्रिट आहे त्या पासून ते कमी ताकदीच्या कॉंक्रिट पर्यंत त्याचा जो ग्रेड आहे व त्याचा अभ्यास आपण करूया. मिक्स ग्रेड – सर्वात प्रथम आपण कॉंक्रिटची जी टॉप ,जी ग्रेड आहे ती प्रत्यक्षात वापरली जाते ती म्हणजे M-25 म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये एम पंचविस. आत्ता एम चा अर्थ काय, मिक्स ग्रेड म्हणजे आपण जे साहित्य मिक्स करतो त्याला मिक्स म्हंटल जाते.

मिक्स ग्रेड M-25 , पंचविस याचा अर्थ असा होतो कि, एखादे कॉंक्रिट आपण बनवलं तर लगेच आपण दुसऱ्या दिवशी पासून त्याचा वापर करत नाही. अठ्ठावीस दिवस, एकविस दिवस त्याला आहे त्या कंडिशन मध्ये ठेवावं लागत. म्हणजे समजा आपण एखादा स्लॅप टाकला आणि स्लॅप टाकल्यावर दुसऱ्या दिवशी पासून आपण स्लॅपचा वापर करत नाही.

अठ्ठावीस दिवस किंवा एकविस दिवस आपण आहे त्या कंडिशन मध्ये स्थिर ठेवतो. हि अशी कॉंक्रिटची स्ट्रेन्थ ठेवण्याचा कालावधी असतो. आता आपण अठ्ठावीस दिवस ग्राह्य धरलेल आहे. अठ्ठावीस दिवसांनंतर त्या कॉंक्रिटची ताकद M-25 N/mm2. आपल्या भाषेत बघायला झाले तर अढीशे किलो (२५० किलो ) पर सेंटी मिटर स्क्वेअर ला एवढी त्याची क्वालीटी म्हणजे स्टेन्थ असते.

तेवढ्या वजनाच कॉंक्रिट म्हणजे तेवढ्या वजनाचा लोड ते कॉंक्रिट पेलू शकत, 250 kg/cm2 M-25. आता हे कॉंक्रिट एम पंचविस आपल्याला जर एम पंचविस याच कॉंक्रिट बनवायच असेल तर ते कस बनवायचा त्या मध्ये वेगळं काय आहे किंवा M-25 च कॉंक्रिट बनवायच झालं तर त्या मध्ये कोणता रेशो ,कोणत्या प्रमाणामध्ये हे साहित्य एकत्रित कराव लागेल हे आपण बघूया.

आता आपण सुरुवातीला पाहिलं कि कॉंक्रिट बनवायच असेल तर सिमेंट, वाळू, खडी हे विशिष्ट्य प्रमाणात पाण्यात मिक्स कराव लागत. तर M-25 च कॉंक्रिट बनवायच झाल तर आपल्याला M-25 चा रेशो दिलेला आहे, 1:1:2 म्हणजेच एकास एकास दोन . म्हणजे आपण जे काही कॉंक्रिट बनवणार आहे. तर हा रेशो ह्या रेशोचा अर्थ आपण बघू. तर हा रेशो काय असतो, एकास एकास दोन आत्ता आपल्याला एकूण तीन अंक दिले आहेत.

तीन अंक काय करत असतात. तर सिमेंट :वाळू : खडी हे तीन साहित्याच प्रमाण दाखवत असतात . पहिला अंक हा सिमेंट दाखवत असतो. तर मुद्दा लक्ष्यात ठेवा पहिला अंक हा सिमेंट चा असतो. तर येणारा दुसरा अंक हा वाळू चा असतो आणि येणारा तिसरा अंक हा खडी चा असतो. म्हणजेच आपण जो रेशो पहिला 1:1:2 तर त्या नुसार आपल्याला काय बघायच आहे.

एक अंक हा सिमेंटाचा आहे म्हणजे जेवढं आपण सिमेंट घेतलंय. दुसरा अंक काय आहे एकच म्हणजेच आपल्याला तेवढीच वाळू घ्यायची आहे. तिसरा अंक काय दाखवला आहे. 1:1:2 म्हणजे तिसरा अंक 2 आहे. तर जेवढ सिमेंट घेतलेल आहे त्याच्या दोन पटीने खडी घ्यायची आहे. म्हणजेच कोल्ट ऍग्रीगेट घ्यायच आहे. म्हणजे जेवढ सिमेंट आहे तेवढच आपल्याला वाळू घ्यायची आहे, व सिमेंट आहे त्याच्या दोन पटीने खडी घ्यायची आहे.

म्हणजे सिमेंटच्या डबल खडी घ्यायची. हा त्याचा रेशो झाला तर या ताकदीच जर आपण कॉंक्रिट केलं तर त्याच कोम्प्रेसिव्हि स्ट्रेन्थ किती असणारे, 250 kg/cm2 आणि जर न्यूटन मध्ये बघायला गेलं तर आपल्याला 25 N/mm2 एवढी कोम्प्रेसिव्हि स्ट्रेन्थ असणारे. हे झालं M-25. आता M-25 चा उपयोग कोठे होतो? तर हि जी ग्रेड आहे. हि ताकादवान ग्रेड आहे. तर ह्याची किळकोळ पीसीसी साठी वापरण्याची गरज नाही.

कारण ह्या साठी खर्च पण खूप येणार आहे. म्हणजे जेवढी आपण वाळू वापरु तेवढच आपल्याला हिथे सिमेंट वापराव लागणार आहे. आपल्या कडे बेसिक म्हणजे जे मिस्तरी वैगरे जे कॉंक्रिट तयार करत असतात. तर माहिती नुसार जर समजा जेवढं सिमेंट वापरलय त्याच्या कमीत कमी तीन ते चार पटीने वाळू वापरली जाते. सिमेंट पेक्षा तीन ते चार पटीने जास्त वाळू वापरली जाते.

तर इथे तुम्ही विचार करा जेवढं सिमेंट वापरलय तेवढीच वाळू वापरायची आहे. किंवा जेवढी वाळू इथे वापरताल तेवढच सिमेंट वापराव लागणार आहे. म्हणजे हिथे खर्च जास्त येणार. तर सर्वात महाग कॉंक्रिट मध्ये सिमेंटच असणार आहे. त्यामुळे हे जे कॉंक्रिट असणार आहे ते हेवी लोड साठी म्हणजे जसं कि अंडर वॉटर कंट्रक्शन जे असणार आहे.

म्हणजे पाण्याच्या आत मधील कंट्रक्शन जे आहे, पाण्याची टाकी असेल, पाण्याचे पाईप असतील किंवा हेवी लोड चे काही कंट्रक्शन असतील. त्या साठी तुम्ही हे वापरू शकता. जेव्हा अश्या मोठ्या बिल्डिंग पंचविस मजली 30 मजली अश्या ज्या मोठ्या बिल्डिंग असतात त्याच्या फौंडेशन साठी किंवा कॉलम बीम, आरसीसीचे स्ट्रकचर असतात त्या स्ट्रकचर साठी तुम्ही हि कॉंक्रिट वापरू शकता.

आता दुसरी जी ग्रेड आहे ती आहे M-20. तर M-20 म्हणजेच एम वीस आता याचा रेशो जो इथून पुढे कॉंक्रिटची ग्रेड आहे ती जसं जशी कमी कमी होत जाईल त्याचा रेशो तसा वाढत जातो. रेशो वाढतो याचा अर्थ काय होती सिमेंटच प्रमाण कमी होत. कॉंक्रिट मध्ये जे सिमेंट असते त्याच प्रमाण कमी होणार आणि वाळू व जी खडी आहे त्याच प्रमाण वाढत जाणार.म्हणजे सिमेंट कमी आणि वाळू व खडीच प्रमाण वाढत जाणार.

आता M-20 ग्रेडचा जर आपण अभ्यास केला तर त्याचा रेशो येतो, 1:1.5:3 म्हणजे एकास दीडास तीन. जेवढं सिमेंट घेतलं त्याच्या दीड पट वाळू घ्यायची. म्हणजे समजा आपण कंट्रक्शन मध्ये कॉंक्रिट करण्याकरिता जी पाटी वापरतात. म्हणजे गवंडया कडे जी पाटी असते त्याच उदाहरणं घेऊ, समजा तुम्ही जर एक पाटी सिमेंट घेतलं, तर तुम्हाला दीड पाटी वाळू घ्यावी लागणार आहे, आणि तीन पाटी खडी घ्यावी लागणार आहे.

पहिल्या रेशो मध्ये आपण सिमेंट घेतलं, एक पाटीच वाळू घेतली आणि तीन पाट्या खडी घेतली.तर ह्या मध्ये आपण काय केलं दुसऱ्या ग्रेड मध्ये M-20 मध्ये एक पाटी सिमेंट ला दीड पाटी वाळू घेतली, आणि तीन पाटी खडी घेतली, म्हणजेच काय झालं सिमेंटच आकारमान कमी झालं आणि वाळू आणि खडीच आकारमान वाढलं.

M-20 च कॉंक्रिट सुद्धा मजबूत आहे. हे काय हलक्या दर्ज्याच नाही पण हे स्ट्रॉंग कॉंक्रिट आहे ह्याचा वापर सुद्धा हेवी लोड कॉंक्रिट साठी म्हणजेच आरसीसी स्ट्रकचर असेल, कॉलम असेल, फूटिंग च कामं असेल, स्लॅप असेल किंवा पाण्यातील कॉंक्रिट असेल, पाण्याच्या टाक्या असतील ह्या सारख्या हेवी लोडसाठी याचा वापर केला जातो

किंवा मोठ्या ज्या बिल्डिंग असतात दहा मजली, वीस मजली किंवा त्याच्या पेक्षा मोठ्या तर ह्याच्या कंट्रक्शन कामासाठी सुद्धा याचा M-20 ग्रेडचा वापर केला जातो.शक्यतो अंडर वॉटर कंट्रक्शन असत पाण्यातील कॉंक्रिट या साठी याचा वापर केला जातो. कारण सिमेंटच प्रमाण जास्त असल्यामुळे हे कॉंक्रिट सहजा सहजी लवकर खराब होत नाही.

ह्याची जी काही स्ट्रेन्थ, ताकद असते हि खुप जास्त असते. तर ह्या ताकदीचा जर विचार केला तर पर सेंटीमिटर स्क़ेवरला कमीत कमी 2०० किलो तरी वजन पेलन्याची क्षमता असते. न्युटन मध्ये जे बघायला गेलं तर 20 न्युटन पर एम एम स्क़ेवरला (20 N/mm2) ह्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते.

तर तिसरा जो ग्रेड आहे तो म्हणजे M-15: M-15 हि सर्वात जास्त आपल्याकडे आरसीसी कामासाठी वापरली जाणारी ग्रेड आहे. म्हणजेच आपल्याकडे जे बंगले असतात, फ्लॅट असतात किंवा छोटी छोटी कंट्रक्शन असतात किंवा मोठी जरी कंट्रक्शन धरली, एक मजली, दोन मजली, तीन मजली, चार मजली इथं पर्यंत जी कामं असतात. या कामासाठी M -15 चा वापर केला जातो

आपल्याला एक नियम आहे कोणताही आरसीसी कामं लेंग्थ फोर्स मेन्ट सिमेंट कॉंक्रिट हे M-15 पेक्षा कमी ग्रेड मध्ये करून देतात. म्हणजेच M-15 चा रेशो काय आहे ? एकास दोनस चार म्हणजेच 1:2:4 म्हणजे जेवढं तुम्ही सिमेंट घेतलंय त्याच्या डबल आपल्याला वाळू घ्यायची आणि जेवढं सिमेंट घेतलंय त्यांच्या चार पट खडी घ्यायची आहे.

म्हणजे इथे पहिल्या रेशो वाढला म्हणजेच सिमेंटच आकारमान कमी झालं , वाळू आणि खडी हे जे साहित्य आहे त्यांचं आकारमान् वाढलं.या ठिकाणी आपल्याला काय करायचंआहे,एकास दोनस चार ह्या रेशो नुसार आपल्याला कॉंक्रिटच साहित्य घ्यायच आहे आणि त्या नुसार हे कॉंक्रिट बनवायच आहे. M -15 चा वापर कुठे केला जातो तर सर्व आरसीसी कामासाठी याचा वापर करण कम्पलसरी आहे.

M-15 पेक्षा कमी ग्रेडच कॉंक्रिट आरसीसी कामासाठी वापरायच नाही. M-15 म्हणजेच काय तर अठाविस दिवसा नंतर कॉंक्रिटची स्ट्रेन्थ किती असणार आहे ? म्हणजेच M-15 असणार आहे , पंधरा न्यूटन पर एम एम स्क़ेवर(15 N/mm2 ) असणार आहे किंवा एकशे पन्नास किलो पर सेंटीमिटर स्क़ेवर असणार आहे.

त्या नंतर पुढची जी ग्रेड आहे ती म्हणजेच M-10: आता हि जरा कमी दर्ज्याची ग्रेड आहे. M-10 चा रेशो काय असणार आहे. एकास तीनास सहा, 1:3:6 म्हणजे जेवढं तुम्ही सिमेंट घेणार आहात त्याच्या तीन पटीने वाळू घ्यायची आहे, आणि जेवढं सिमेंट घेणार आहे त्याच्या सहा पटीने खडी घ्यायची आहे. हे पण जे M-10 च कॉंक्रिट आहे हे शकतो आरसीसी म्हणजे कमी दर्जाच जे आरसीसी काम असेल , आणि जे किळकोळ काम असतील त्या साठी तुम्ही वापरू शकता.

शक्यतो पीसीसी साठी याचा वापर केला जातो किंवा लीन कॉंक्रिट म्हणजे आपल्याला फारशी खालील कॉंक्रिट बनवायच वैगरे असेल, फारशीची खालची जमीन बसवायची असेल, किंवा इतर कोणती बेसिक काम असतील तर त्या साठी तुम्ही हे कॉंक्रिट वापरू शकता.आणि हे सर्वात स्वस्त मिळत.

आणि ह्याच्या नंतर जे सर्वात कमी दर्जाच जे कॉंक्रिट आहे M-7.5:M-7.5 याचा जो रेशो आहे हा येतो एकास चारास आठ 1:4:8, म्हणजे जेवढं सिमेंट घेतलंय त्याच्या चार पटीने वाळू घ्यायची आणि जेवढं सिमेंट घेतलंय त्याच्या आठ पटीने खडी घ्यायची आहे. या नुसार आपल्याला ते साहित्य जमवायच आहे. त्या नुसार ते कॉंक्रिट बनवायच आहे. ह्याची ताकद पण कमी असते शक्यतो याचा वापर पीसीसी कामासाठी जास्त केला जातो.

आरसीसी कामासाठी चुकून सुद्धा M-10, M-7.5 किंवा त्याच्या खालची जी ग्रेड आहे ती चुकून सुद्धा वापरायची नाही. त्या नंतर सर्वात लास्ट जी ग्रेड आहे M-5 शक्यतो याचा वापर कोणी करत नाही. पण किळकोळ कामासाठी म्हणजे समजा आपल्याला एखाद्या जमिनीवरती ग्रीड कॉंक्रिट करायचं असेल म्हणजे आपल्या घरासमोरच अंगण वैगरे तयार करायच असेल.

किंवा जमिनीवरती आपल्याला म्हणजेच कठीण जमीन करायची असेल घराच्या शेजारी किंवा मोकळ्या जागेत करायची असेल तर अश्या ठिकाणी आपण M–5 चा म्हणजेच M-5 ग्रेडचा वापर करू शकतो. याचा रेशो आहे एकास पाचास दहा 1:5:10 मग विचार करा हिथे सिमेंटच प्रमाण किती कमी असणार आहे, सर्वात पहिला रेशो आपण ज्या वेळी बघितला त्या वेळी त्याचा रेशो होतो 1:1:2 म्हणजे जेवढं सिमेंट आहे तेवढीच वाळू.

जेवढ सिमेंट आहे त्याच फक्त डबल आपल्याला खडी घ्यायची होती. M-5 च्या जर ग्रेडचा आपण विचार केला 1:5:10 म्हणजे जेवढं सिमेंट घेतलय त्याच्या पाच पटीने वाळू घ्यायची आहे आणि दहा पटीने खडी घ्यायची आहे. जर आपण त्या पाटीचा विचार केला गवंडया कडे किंवा मिस्तरी कडे जी पाटी असते त्याचा विचार केला तर एका पाटी मागे दहा पाट्या आपल्याला खडी वापरायची आहे.

पाच पाट्या वाळू वापरायची आहे. मग विचार करा. एक पाटी सिमेंट एवढं पाच पाट्या वाळू आणि दहा पाट्या खडीला एकत्र बॉण्डिंग करू शकत का? मग त्याची ताकद किती असणारे ? हा इथे आपण विचार करू, बेसिक कामासाठी किंवा जमीन वैगरे करण्यासाठी बेड कॉंक्रिट याचा वापर पीसीसी कामासाठी केला जातो. मोठ्या कामासाठी चुकून सुद्धा ह्या M-5 चा वापर आपल्याला करायचा नाहीये. तर M-25 , M-20, M-15 ,M-10, M-7.5 ,M-5 ह्या आहेत कॉंक्रिटच्या ग्रेड.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.